योजेफ ग्यॉबेल्स
डॉ. पाउल योजेफ ग्यॉबेल्स [१] (जर्मन: Joseph Goebbels; २९ ऑक्टोबर, इ.स. १८९७:म्योन्शनग्लाडबाख, प्रशिया - १ मे, इ.स. १९४५:बर्लिन, जर्मनी) हा एक जर्मन राजकारणी होता. इ.स. १९३३ ते १९४५ दरम्यान तो नाझी जर्मनीमधील एक महत्त्वाचा मंत्री होता. ॲडॉल्फ हिटलरच्या सर्वात विश्वासू व आंतरिक गोटामधील एक असलेल्या ग्योबेल्सने नाझी पक्षाची धोरणे व विचार सामान्य जर्मन नागरिकांपर्यंत पोचवण्याची भूमिका पार पाडली. त्याच्या कट्टर ज्यूविरोध व प्रभावी भाषणशैलीसाठी तो ओळखला जात असे.
योजेफ ग्यॉबेल्स | |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ ३० एप्रिल, इ.स. १९४५ – १ मे, इ.स. १९४५ | |
मागील | हिटलर |
---|---|
पुढील | लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक |
जनता माहिती व मतप्रचार मंत्री
| |
कार्यकाळ १३ मार्च, इ.स. १९३३ – ३० एप्रिल, इ.स. १९४५ | |
जन्म | २९ ऑक्टोबर १८९७ म्योन्शनग्लाडबाख, प्रशिया |
मृत्यू | १ मे, १९४५ (वय ४७) बर्लिन |
इ.स. १९२१ साली हायडेलबर्ग विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवल्यानंतर ग्योबेल्सने अनेक व्यवसाय आजमावले व इ.स. १९२८ सालापर्यंत तो राजकारणात शिरून बर्लिनमधील एक प्रभावशाली पुढारी बनला. इ.स. १९३३ साली नाझी पक्ष सत्तेवर आल्यानंतर ग्योबेल्सने जर्मनीमधील प्रसारमाध्यमांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले व हिटलरच्या राजकीय व सामाजिक धोरणांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. १९३५ साली न्युर्नबर्ग कायदे मंजूर झाल्यानंतर ज्यू लोक चालवत असलेले व्यवसाय व उद्योग बंद पाडण्याची व ज्यूंचे पूर्ण खच्चीकरण करण्याची योजना त्याने आखली. ग्योबेल्सने अनेक ज्यूविरोधी चित्रपट बनवले. त्याच्या योजनेनुसार इ.स. १९३८ साली जर्मनीमध्ये अनेक सिनेगॉग जाळण्यात आले व शेकडो ज्यूंची कत्तल करण्यात आली.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ग्योबेल्सने नाझी राजवटीमधील आपले राजकीय सामर्थ्य बळकट केले. ज्यू व जर्मनेतर लोकांसाठी नाझी छळछावण्या उभारण्यात व त्यानंतरच्या होलोकॉस्टमध्ये ग्योबेल्सचे मोठा वाटा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात अक्ष राष्ट्रांचा पराजय निश्चित झाल्यानंतरही त्याने नाझी मतप्रचार चालूच ठेवला. ३० एप्रिल, इ.स. १९४५ रोजी हिटलरच्या आत्महत्येनंतर ग्योबेल्स जर्मनीचा चान्सेलर बनला. परंतु केवळ १ दिवस ह्या पदावर राहिल्यानंतर ग्योबेल्सने १ मे, इ.स. १९४५ रोजी पत्नी व सहा मुलांसह आत्महत्या केली.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "जर्मन उच्चार" (जर्मन व बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |