व्हर्गीज कुरियन

(वर्गीस कुरियन या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. वर्गीज कुरियन (लेखनभेद:व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, १९२१; कोळ्हिकोड - सप्टेंबर ९, २०१२; नडियाद) हे भारतीय अभियंते तथा उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण (इ.स. १९९९) तसेच जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

डॉ वर्गीज कुरियन
जन्म वर्गीज कुरियन
नोव्हेंबर २६, इ.स. १९२१
कोळीकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू ९ सप्टेंबर, २०१२ (वय ९०) सप्टेंबर ९, इ.स. २०१२
नडियाद, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.इ. (यंत्र अभियांत्रिकी),
एम.एस्सी. (यंत्र अभियांत्रिकी)
प्रशिक्षणसंस्था लायोला कॉलेज, चेन्नई,
मिशिगन विद्यापीठ
पेशा अभियांत्रिकी, उद्योग (दुग्धप्रक्रिया)
पदवी हुद्दा संस्थापक चेरमन (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, आनंद)
धर्म ख्रिस्ती
जोडीदार मॉली
अपत्ये निर्मला
पुरस्कार  • मॅगसेसे पुरस्कार (१९६३),
 • पद्मश्री पुरस्कार (१९६५),
 • पद्मभूषण पुरस्कार (१९६६),
 • पद्मविभूषण पुरस्कार (१९९९)

त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते.

बालपण व शिक्षण

संपादन

वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान भारताच्या केरळ राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला.

वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले.

कार्य

संपादन

भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच "खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड" [टीप १] ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.

वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. "गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड" [टीप २] या पालक संस्थेने १४ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून "आणंद मिल्क युनियन लिमिटेड" [टीप ३] असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन [टीप ४] ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले इंडिया ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते.

याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वर्गीस यांच्या हस्ते १६ जुलै १९६५ रोजी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना करण्यात आली.[]

मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. सप्टेंबर ९, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार ०११५ वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले[].

पुरस्कार

संपादन

इस. २०१४ मध्ये, देशातील सर्व प्रमुख डेअरी गटांनी, इंडियन डेअरी असोसिएशनसह, कुरियन यांचा वाढदिवस, २६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला.[] [][][][][] मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस यांनी त्यांना मानद पदवी प्रदान केली होती.[]

वर्ष पुरस्कार किंवा सन्मान पुरस्कार देणारी संस्था
१९९९ पद्मविभूषण[][१०] भारत सरकार
१९९७ ऑर्डर ऑफ ॲग्रिकल्चरल मेरिट कृषी मंत्रालय, फ्रान्स
१९९३ वर्षातील आंतरराष्ट्रीय व्यक्ती वर्ल्ड डेअरी एक्सपो
१९८९ जागतिक अन्न पुरस्कार[][११] वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन
१९८६ वाटलर शांतता पुरस्कार[११] कार्नेगी फाउंडेशन (नेदरलँड)
१९८६ कृषीरत्न भारत सरकार
१९६६ पद्मभूषण[][१२] भारत सरकार
१९६५ पद्मश्री[][१३] भारत सरकार
१९६३ रॅमन मॅगसेसे पुरस्कार[]

[१४][१५]

रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रतिष्ठान

कुरियन एकतर अनेक सार्वजनिक संस्थांचे प्रमुख किंवा सदस्य होते. तसेच त्यांनी जगभरातील विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती. [१६] [१७] प्रख्यात वक्त्यांची व्याख्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "डेअरी क्षेत्रातील धडे" त्यांच्या कार्याद्वारे [१८] "डाळीसाठी अमूल मॉडेल", [१९] ग्रामीण भारतातील सामाजिक व्यवस्थापन धोरणे पार पाडण्यासाठी चालू असलेल्या ग्रामीण समस्यांना लागू करण्यासाठी आयोजित केली जातात. संस्था, [२०] किंवा "न्यायासह वाढ" साठी निधी उभारण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कार्याचा वापर करणे. [२१] कुरियन यांना रेड अँड व्हाईट लाइफटाइम अचिव्हमेंट्स नॅशनल अवॉर्ड (आता गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड म्हणून ओळखले जाते) देखील प्रदान करण्यात आले. [२२]

तळटिपा

संपादन
  1. ^ खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड (रोमन लघुरूप: KDCMPUL, के.डी.सी.एम.पी.यू.एल.)
  2. ^ गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (रोमन लघुरूप: GCMMF, जी.सी.एम.एफ)
  3. ^ आणंद मिल्क युनियन लिमिटेड (रोमन लघुरूप: AMUL, अमूल)
  4. ^ लोकसहभागातून व्यवस्थापन (इंग्लिश: Participatory Management, पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट)

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Gupta, Sharad (26 November 2019). "Remembering Verghese Kurien – India's first milkman" (इंग्रजी भाषेत). businessline. ३ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. वर्गीस कुरियन यांचे निधन". ९ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "National Milk Day on Kurien's birth anniversary". The Times of India. 25 November 2014.
  4. ^ "National Milk day". The Times of India. 26 November 2016.
  5. ^ "National Milk Day celebrated". The Hans India. 27 November 2015. 28 August 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Milma to Celebrate National Milk Day". 24 November 2014. 2016-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 August 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "India Celebrates National Milk Day". businesswireindia.com. 24 November 2014. 28 August 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Verghese Kurien's birth anniv to be held as National Milk Day". www.dailypioneer.com. 25 November 2014. 28 August 2016 रोजी पाहिले.
  9. ^ a b c d e f "Verghese Kurien: Father of the White Revolution" (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 16 December 2019. 10 March 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  11. ^ a b "Dr. Verghese Kurien – The World Food Prize". World Food Prize. 12 August 2016 रोजी पाहिले.
  12. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  13. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  14. ^ "Amul remembers Tribhuvandas on his birth anniversary". Indian Cooperative. 23 October 2019. 10 March 2021 रोजी पाहिले.
  15. ^ The Ramon Magsaysay Award Foundation. "Kurien, Verghese • Community Leadership – India – 1963". rmaward.asia (इंग्रजी भाषेत). 23 August 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 September 2017 रोजी पाहिले.
  16. ^ Indian Dairy Association. "The Legend Lives On" (PDF). 2023-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 May 2020 रोजी पाहिले.
  17. ^ Verghese Kurien. "Dr. Verghese Kurien: Honorary Degrees". 14 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2014 रोजी पाहिले.
  18. ^ Institute of Rural management, Anand. "First Dr. Verghese Kurien Memorial Lecture – 2012" (PDF). 2023-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-02-15 रोजी पाहिले.
  19. ^ "Arvind Subramanian moots 'Amul model' for pulses". Business Standard. 21 November 2015. 25 November 2015 रोजी पाहिले.
  20. ^ Institute of Rural management, Anand. "Second Dr. Verghese Kurien Memorial Lecture – 2013" (PDF). 2023-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-02-15 रोजी पाहिले.
  21. ^ Jhimli Mukherjee Pandey (9 September 2014). "XLRI holds Dr. Verghese Kurien memorial oration on sustainable development". Times of India.
  22. ^ "Godfrey Phillips Bravery Award (Social Bravery) for KIIT & KISS Founder". Achyuta Samanta (इंग्रजी भाषेत). 21 September 2011. 7 January 2020 रोजी पाहिले.