लुक्रेझिया तोर्नाबुओनी

लुक्रेझिया तोर्नाबुओनी (२२ जून, १४२७ [] - २८ मार्च, १४८२ [] ) ही एक इटालियन खानदानी स्त्री होती. ही फिरेंझच्या अनभिषिक्त शासक पिएरो दि कोसिमो दे मेदिचीची पत्नी[] आणि राजकीय सल्लागार होती. लुक्रेझियाचा तिच्या पतीच्या आणि नंतर तिचा मुलगा लॉरेंझो इल मॅग्निफिकोच्या शासनकाळात लक्षणीय राजकीय प्रभाव होता, तोर्नाबुओनीने अनेक संस्थांमध्ये गुंतवणूक केली आणि गरीबांना मदत केली. हिने अनेक कविता आणि नाटके लिहिल्या आणि कलावंतांना आश्रय दिला.

प्रारंभिक जीवन

संपादन

लुक्रेझियाचा जन्म २२ जून, १४२७ रोजी इटलीतील फिरेंझे शहरात फ्रांचेस्को दि सिमोन तोर्नाबुओनीच्या घरी झाला. तिच्या आईचे नाव अनिश्चित आहे.[] लुक्रेझियाचा भाऊ जियोव्हानी बँकर आणि मुत्सद्दी झाला.

लुक्रेझिया तिच्या काळाच्या मानाने सुशिक्षित स्त्री होती. तिला गणित आणि अर्थशास्त्रात चांगली गती होती. ही साहित्य, वक्तृत्व आणि धर्मशास्त्रात पारंगत होती. तिने इटालियन[] व्यतिरिक्त लॅटिन आणि ग्रीक दोन्ही भाषेतील अनेक ग्रंथ वाचले होते.

लुक्रेझियाचे लग्न ३ जून, १४४४ रोजी फिरेंझेमधील श्रीमंत बँकर आणि राजकारणी कोसिमो दे मेदिचीचा मुलगा पिएरो दि कोसिमो दे मेदिचीशी झाले. [] तिचे वडील कोसिमोचे समर्थक होते. [] या लग्नाने आणि आणि तिच्या १,२०० फ्लोरिनच्या हुंड्यांने त्यांच्या कुटुंबांमधील संबंध घट्ट झाले. [] लुक्रेझिया आणि पिएरो यांचे चांगले संबंध निर्माण झाले आणि एकमेकांपासून दूर असताना त्यांच्यात पत्रव्यवहार होत असे. [] लुक्रेझियाने जियोव्हानीशी सुद्धा चांगली मैत्री केली. []

लुक्रेझिया आणि पिएरो यांनी आपल्या मुलांना साहित्य, संस्कृती आणि ललित कलांमध्ये गोडी लागेल याकडे लक्ष दिले. त्यांना राजकारण, व्यवसाय, लेखा, आणि तत्वज्ञान यांसारख्या विषयांचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी जेंतिले दे बेक्की आणि क्रिस्तोफोरो लांदिनो सारखे शिक्षक नेमले.[] या जोडप्याला किमान ६ मुले झाली. यांपैकी दोन लहानपणीच मृत्यू पावली: []

जीवनकार्य

संपादन

राजकीय

संपादन

लुक्रेझिया राजकीय बाबींमध्ये लक्षणीय रीत्या जाणकार आणि चतुर होती. तिचे सासरे, कोसिमो दे मेदिची, जे फिरेंझेचे पहिले अनभिषिक्त शासक होते, तिच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा करत. [११] लुक्रेझियाचा पती पिएरो संधिवाताने अंथरुणातच असे. त्याने १४६४ मध्ये शासन हाती घेतल्यानंतर लुक्रेझिया आणि पिएरोची खोली पिएरोचे कार्यालय आणि पर्यायाने फिरेंझेच्या शासनाचे केंद्र बनले. पिएरो शासनात गुंतल्यावर लुक्रेझियाला मोकळीक मिळाली. अनेक लोक तिला आपल्या वतीने पिएरोकडे भलावण करण्याची विनंती करीत. [१२] त्या काळात एकट्या स्त्रीने प्रवास करणे आणि पोप आणि इतर प्रभावशाली अधिकाऱ्यांना भेटणे हे असामान्य होते. समकालीन लोकांनी लुक्रेझियाच्या अशा वागण्यावर टिप्पण्याही केल्या होत्या. [] अनेक उच्चस्थानस्थ आणि सामान्य लोकांनी लुक्रेझियाकडून सल्ला मागितला. [१३] १४६९मध्ये पिएरोच्या मृत्यूनंतर लुक्रेझिया त्यांच्या मुलांची अधिकृत सल्लागार झाली. तिच्या मृत्यूनंतर लॉरेंझोने कबूल केले की त्याची आई लुक्रेझिया त्याच्या सर्वात महत्त्वाच्या सल्लागारांपैकी एक होती. [१४]

आर्थिक

संपादन

लुक्रेझियाला उच्चकुळात जन्मलेली असल्याने तिला मालमत्तेची मालकी असण्यास आणि व्यवसाय करण्यास इतर स्त्रीयांपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते. तिने पिसा आणि फिरेंझेच्या आसपास घरे, दुकाने आणि शेतं विकत घेतली. [१५] तिची दुकाने वेगवेगळ्या व्यवसायांना भाड्याने दिली जात आणि त्याद्वारे तिची आश्रयस्थाने वाढत जात. [] १४७७मध्ये, तिने व्होल्तेरा जवळ सार्वजनिक न्हाणीघर भाडेतत्त्वावर घेउन त्याचे नूतनीकरण केले व त्याला फायदेशीर व्यवसाय केले[१०] [१६] फ्लोरेन्सच्या आसपासच्या गावांमध्ये तिच्या गुंतवणुकीमुळे मेदिचींचा प्रभाव पसरण्यास मदत झाली. [१६]

मुत्सद्देगिरी

संपादन

फिरेंझेतील नागरिक आपली गाऱ्हाणी लुक्रेझियाकडे घेउन जात. यात हद्दपारी संपवणे, तुरुंगातून सुटका करणे किंवा सैनिकांचा त्रास थांबवण्याच्याही विनंत्या असत. [१७] तिला वीस वर्षे सुरू असलेले दोन कुटुंबांमधील भांडणात मध्यस्थी करण्यास आवाहन केले गेले. [] असे करताना तिला शत्रूही तयार झाले. ऑक्टोबर १४६७मध्ये, पिएरो आणि लुका पिट्टी यांच्यातील असलेल्या वैरामुळे लुक्रेझिया आणि तिचा मुलगा जुलियानो यांच्यावर हत्येचा निष्फळ प्रयत्न झाला. [१८]

लुक्रेझिया उच्चकुळात जन्मलेली असल्याने तिने मेदिची कुटुंबाचेही स्थान उंचावले 1१४५०मध्ये, ती आणि तिचा नवरा पोप निकोलस पाचव्याला भेटायला रोमला गेले आणि आपल्या त्यांच्या कौटुंबिक चॅपलमध्ये प्रार्थनावेदी बांधण्याची परवानगी मिळवली. [१९] १४६७ च्या वसंतात तिने एकटीनेच पुन्हा पोपला भेट दिली आणि तिचा मुलगा लॉरेंझोसाठी स्थळ सुचविण्यास विनंती केली.[२०] [] मेदिची कुटुंबाचे सामाजिक स्थान अधिक उंचावण्यासाठी लुक्रेझियाने जून १४६९ मध्ये लॉरेंझोचे लग्न क्लॅरिचे ओर्सिनीशी ६,००० फ्लोरिन हुंडा घेउन ठरवले. [] लॉरेंझोला सुरुवातीस क्लॅरिचे फारशी आवडत नसे. []

सांस्कृतिक

संपादन

कलाश्रय

संपादन

लुक्रेझियाने अनेक कलावंतांना आश्रय दिला. यांत बेर्नार्दो बेलिंचियोनी आणि अँजेलो पॉलिझियानो [२१] यांच्या समावेश होता. हे दोघे नंतर तिच्या नातवंडांचे शिक्षिक होते. [] फिरेंझमधील अनेक धार्मिक संस्था लुक्रेझियाच्या आश्रयित होत्या. [२२] येथील सान लॉरेंझोच्या बॅसिलिकामधील अनेक चित्रे तिने लावली [२३] आणि अनेक शिल्पे चर्चना दान केली. [२२]

लुक्रेझियाने धार्मिक कथा, नाटके आणि कविता लिहिल्या. तिने तिच्या वर्तुळातील कवींशी चर्चा व शिफारस करीत असे. [१०] तिचे बरेचसे लिखाण स्वतःच्या नातवंडांच्या शिक्षणासाठी होते[] तिने तिच्या काही कविता प्रसिद्ध कवींना वाचून दाखवल्या आणि त्यांच्या रचनांशी तुलना केली [२४] लुक्रेझियाची काही कविता छापल्या गेली आणि तिच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी प्रकाशित झाल्या. तिच्या काही कवितांना लोकप्रिय चाली लावून सार्वजनिकरित्या सादर केल्या गेल्या. [२५]

मृत्यू

संपादन

लुक्रेझिया तोर्नाबुओनीला संधिवात आणि एक्झिमाचा त्रास होता, ज्यामुळे तिला तोस्कानाच्या आसपासच्या स्नानगृहात उपचार घ्यावे लागले. [] आजीवन आजाराने ग्रासल्यानंतर, लुक्रेझियाचे वयाच्या ५४ व्या वर्षी २५ मार्च १४८२ रोजी फिरेंझे येथे निधन झाले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Pernis & Adams 2006, पान. 1.
  2. ^ Tomas 2003, पान. 65.
  3. ^ Milligan 2011.
  4. ^ a b c d e f Pernis & Adams 2006.
  5. ^ Pernis & Adams 2006, पाने. 4–5.
  6. ^ a b c d e f g h i j k Tomas 2003.
  7. ^ Pernis & Adams 2006, पाने. 61–62.
  8. ^ Pernis & Adams 2006, पान. 29.
  9. ^ a b c d e Tomas 2003, पान. 7.
  10. ^ a b c d Pernis & Adams 2006, पान. xi.
  11. ^ Pernis & Adams 2006, पान. x.
  12. ^ Tomas 2003, पान. 49.
  13. ^ Robin, Larsen & Levin 2007, पान. 368.
  14. ^ Tomas 2003, पान. 26.
  15. ^ Tomas 2003, पान. 27.
  16. ^ a b Tomas 2003, पान. 90.
  17. ^ Tomas 2003, पाने. 49, 54, 58.
  18. ^ Pernis & Adams 2006, पाने. 70–71.
  19. ^ Tomas 2003, पान. 23.
  20. ^ Pernis & Adams 2006, पान. 72.
  21. ^ Tomas 2003, पान. 93.
  22. ^ a b Tomas 2003, पान. 64.
  23. ^ Pernis & Adams 2006, पान. 42.
  24. ^ Tomas 2003, पान. 29.
  25. ^ Tomas 2003, पान. 28.