बेसिलिका दि सान लॉरेन्झो (फिरेंझे)

बेसिलिका दि सान लोरेन्झो (सेंट लॉरेन्सचेी बॅसिलिका) हे इटलीच्या फिरेंझे शहरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या चर्चांपैकी एक आहे. हे शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. हे चर्च मेदिची घराण्याच्या सर्व प्रमुख सदस्यांचे दफनस्थान आहे. येथे कोसिमो इल व्हेक्कियो पासून तिसऱ्या कोसिमोपर्यंत सगळ्यांच्या समाध्या आहेत. या चर्ची बांधणी इ.स. ३९३मध्ये संपली.[] त्यावेळी ते शहराच्या भिंतीबाहेर होते.

आतील दृष्य

बेसिलिका दि सान लॉरेंझो हे मेदिची घराण्याच्या कुलाचारांचे चर्च होते. १४१९ मध्ये जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीने येथील उभ्या असलेल्या ११व्या शतकातील रोमन बांधणीच्या इमारतीच्या जागी नवीन चर्च बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे चर्च फिरेंझेच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या चर्च संकुलाचा भाग आहे. याच्या जवळच अनेक महत्त्वाच्या वास्तुशिल्प आणि कलात्मक कामांचा आहेत. यांत ब्रुनेलेस्कीने रचलेली आणि दोनातेल्लोने सजावट केलेली साग्रेस्तिया व्हेक्किया (जुनी सॅक्रिस्टी), साग्रेस्तिया नुओव्हा (नवी सॅक्रिस्टी) मिकेलेंजेलो रचित लॉरेन्शियन लायब्ररी, कपेल्ली मेदिची, कपेल्ला दै प्रिन्सिपी, इ. इमारती आहेत.

अंत्यसंस्कार स्मारके

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Haegen, Anne Mueller von der; Strasser, Ruth F. (2013). "San Lorenzo". Art & Architecture: Tuscany. Potsdam: H.F.Ullmann Publishing. p. 240. ISBN 978-3-8480-0321-1.