जेंतिले दे बेक्की (१४२०/१४३० - १४९७) हा इटालियन बिशप, मुत्सद्दी, वक्ता आणि लेखक होता. हा फिरेंझेच्या शासक लॉरेंझो इल मॅग्निफिको तसेच त्याचा मुलगा जियोव्हानी दे मेदिची, जो नंतर पोप लिओ दहावा झाला, यांचा शिक्षक होता. याने लॅटिनमध्ये कविता आणि प्रार्थना लिहिल्या.

जेंतिलेचा जन्म उर्बिनो येथे झाला. त्याच्या जन्माचे वर्ष आणि त्याच्या सुरुवातीच्या अभ्यासाचे ठिकाण दोन्ही अज्ञात आहेत.

१४७३ लॉरेंझो दे मेदिची त्याला अरेझोचा बिशप म्हणून प्रस्तावित केले. इतिहासकार सेसिल ग्रेसन यांच्या मते फिरेंझेचे मुख्य बिशप आणि पोप सिक्स्टस चौथा या दोघांनीही त्यांची श्रद्धा, त्यांचे ज्ञान, क्षमता आणि चारित्र्य यांच्याबद्दल उच्च आदर होता.

१९५४मध्ये, पिएरो दि कोसिमो दे मेदिचीने जेंतिलेला लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानो या आपल्या मुलांचे शिक्षक म्हणून नेमले. १४६६मध्ये, तो पोप पॉल दुसऱ्याच्या दरबारात लॉरेंझोबरोबर राजनैतिक मोहिमेवर गेला. पुढच्या वर्षी जेंतिले लॉरेंझोचीआई लुक्रेझिया तोर्नाबुओनी सोबत क्लॅरिचे ओर्सिनी आणि लोरेंझोच्या लग्नाची जुळणी करण्यासाठी रोमला, गेला. तेथे त्याने ओर्सिनी कुटुंबाशी लग्नाची बोलणी केली.

१४८९मध्ये लॉरेंझोने आपला दुसरा मुलगा जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिचीचा शिक्षक म्हणून जेंतिलेला नेमले. लॉरेंझोने पोप इनोसंट आठव्याशी केलेल्या करारानुसार त्याला धर्मगुरू करणे अपेक्षित होते. जियोव्हानीला तेराव्या वर्षी कार्डिनल बनवण्यात आले आणि अडतीसव्या वर्षी तो पोप जुलियस दुसऱ्या नंतर पोप लिओ दहावा म्हणून पोपपदी बसला. []

पाझ्झी षडयंत्र

संपादन

पाझ्झी षडयंत्राला प्रतिसाद म्हणून फिरेंझेच्या लोकांनी पाझ्झी आणि पोप सिक्स्टस चौथ्याचा हस्तकांना रस्त्यात ठेचून मारल्यावर पोपने लॉरेंझो आणि फिरेंझे शहराला वाळीत टाकले. तरीही अरेझ्झोचा बिशप असलेल्या जेंतिलेने लॉरेंझोची बाजू घेतली आणि त्याच्याशी व फिरेंझेशी संबंध कायम ठेवले. त्याने आर्चबिशप रिनाल्दो ओर्सिनी सोबत त्यांनी स्थानिक धर्मगुरुंची एक सभा बोलावली. या सभेत जेंतिलेने पोपने निर्बंधांसाठी मांडलेल्या सर्व युक्तिवादांचे खंडन केले आणि फिरेंझेला आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी हा हल्ला झाला व त्यामागे पोप सिक्स्टस असल्याचा आरोप केला. us भाषण निक्कोलॉ देल्ला मान्या यांनी लगेच छापले आणि प्रसारित केले. बहुतेक या कारणास्तव जेंतिले दे बेक्कीचा कार्डिनल होण्याचा प्रस्ताव पोपने नंतर नाकारला. []

राजदूत

संपादन

जेंतिले दे बेक्कीच्या वक्तृत्व कौशल्यामुळे त्याला फिरेंझेच्या प्रजासत्ताकने आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले. 1483मध्ये फ्रांसच्या चार्ल्स आठव्याला त्याच्या राज्याभिषेकानंतर अभिवादन करण्यासाठी जेंतिले फ्रांसला गेला. १४८५मध्ये तो पोप इनोसंट आठव्याशी आरागॉनच्या फर्डिनांड दुसऱ्याशी झालेल्या शत्रुत्वा बद्दल वाटाघाटी करण्यासाठी गेला. १४९२मध्ये त्याला पिएरोने नवनिर्वाचित पोप अलेक्झांडर सहाव्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवले होते. १४९३ आणि १४९४ मध्ये त्याने आणि पिएरो सोदेरिनीने फिरेंझे आणि चार्ल्स यांच्यात शांततेची वाटाघाटी केली, जो इटलीवर आक्रमण करण्याचा विचार करत होता. []

फिरेंझेमधून मेदिचींची हकालपट्टी झाल्यानंतर जेंतिले तेथे गेला नाही. तो व्हिला ॲले बोत्ते येथे त्याच्या मृत्यूपर्यंत जगला. १४९७मध्ये तो अरेझ्झो येथे मरण पावला त्याला अरेझ्झो कॅथेड्रलमध्ये पुरण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ Ilan Rachum, The Renaissance: an Illustrated Encyclopedia, Octopus (1979) आयएसबीएन 0-7064-0857-8
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Grayson नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Palazzo नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही