जुलियानो दि पिएरो दे मेदिची (२८ ऑक्टोबर, १४५३ - २६ एप्रिल, १४७८) हा चौदाव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचा शासक होता. पिएरो दि कोसिमो दे मेदिची आणि लुक्रेझिया तोर्नाबुओनी यांचा हा दुसरा मुलगा असून लॉरेंझो दे मेदिचीचा लहान भाऊ होता. त्याने लॉरेंझोबरोबर फिरेंझेचा सह-शासक म्हणून काम केले. 1१४७८मध्ये पाझ्झी षडयंत्रात त्याची हत्या झाली.

जुलियानो अतिशय देखणा होता. अनेक चित्रकार आणि शिल्पकारांना त्याला समोर ठेवून चित्रे काढलेली होती. जुलियानोचा फिओरेत्ता गोरिनी पासून एक अनौरस मुलगा होता. [] जुलियो दि जुलियानो दे मेदिची नंतर क्लेमेंट सातवा नावाने पोप झाला. []

मृत्यू

संपादन

जुलियानो पाझ्झी षडयंत्राचा पहिला बळी होता. २६ एप्रिल, १४७८ रोजी फिरेंझेच्या कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे या चर्चमध्ये फ्रांचेस्को दे पाझ्झी आणि बेर्नार्दो बारोंचेल्ली[] यांनी प्रार्थना सुरू होताच हल्ला चढवला. जुलियानोवर डोक्यावर आणि शरीरावर १९ वेळा भोसकून ठार मारण्यात आले. तो तेथे चर्चमध्येच मरण पावला.[] [] हल्लेखोरांनी लॉरेंझोवरही हल्ला केला परंतु तो पलाझ्झो मेदिची येथे पळून गेला. त्याला अनेक तास आपल्या भावाच्या मृत्यूबद्दल कळले नव्हते. []

 
१४७५-७८मध्ये आंद्रेआ देल व्हेरोक्कियोने तयार केलेले चिनी मातीचे शिल्प . []

३० एप्रिल, १४७८ माफक अंत्यसंस्कारानंतर, [] जुलियानोला बासिलिका दि सान लॉरेन्झोमध्ये त्याच्या वडिलांशेजारी पुरण्यात आले. कालांतराने त्याचा भाऊ लॉरेन्झोसह कपेल्ली मेदिची मध्ये त्यांचे दफन केले गेले. त्यांच्या वर मिकेलेंजेलोने तयार केलेले मॅडोनाचे शिल्प आहे. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ Penny (12 September 2011). "The true son of the Devil, an Antichrist and abominable tyrant – or just unable to make up his mind?". Beyond the Yalla Dog. 20 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ Sannio, Simone (6 December 2016). "Inside the Medici Chapels, the "Masters of Florence"'s Mausoleum". L'Italo-Americano. 25 September 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 October 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Smedley, Edward; James, Hugh James; Rose, Henry John (1845). Encyclopaedia Metropolitana; Or, Universal Dictionary of Knowledge on an Original Plan Comprising the Twofold Advantage of a Philosophical and an Alphabetical Arrangement, with Appropriate Engravings. B. Fellowes. p. 272.
  4. ^ a b Koestler-Grack, Rachel A. (1974). Joseph, Michael (ed.). Leonardo Da Vinci: Artist, Inventor, and Renaissance Man. Infobase Publishing. p. 152. ISBN 978-0791086261. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "HRW" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ Poliziano, Angelo (2012). Coniurationis Commentarium. Florence: Firenze University Press.
  6. ^ Bernier, Olivier (1983). The Renaissance Princes. Chicago, IL: Stonehenge Press. p. 24. ISBN 978-0-86706-083-6.
  7. ^ "Giuliano de' Medici". National Gallery of Art. 19 March 2016 रोजी पाहिले.
  8. ^ Simonetta, Marcello (2008). The Montefeltro Conspiracy. United States: Doubleday. p. 117. ISBN 978-0-385-52468-1.
  9. ^ Barenboim, Peter; Shiyan, Sergey (2006). The Sacred Feminine and the Triads of Michelangelo and Botticelli. Moscow. ISBN 5-85050-825-2.