पाझ्झी षड्यंत्र हे इटलीमधील फिरेंझे शहरातील मेदिची कुटुंबाला सत्तेवरून दूर करण्यासाठीचे तेथील पाझ्झी कुटुंबातील काही सदस्य आणि इतरांनी केलेला डाव होता. रिनैसाँ कालीन फिरेंझेत रचलेल्या या कटाला पोप सिक्स्टस चौथ्याची संमती होती. अंती हा कट फसला आणि त्यापश्चात षडयंत्रकारांना मोठी किंमत मोजावी लागली.

२६ एप्रिल, १४७८ रोजी गिरोलामो रियारियो, फ्रांचेस्को साल्व्हियेती आणि फ्रांचेस्को दे पाझ्झी यांनी फिरेंझेमधील कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे या चर्चमध्ये शहराचा अनभिषिक्त शासक लॉरेन्झो दे मेदिची आणि त्याचा भाऊ जुलियानो यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यात जुलियानो जागेवरच मारला गेला तर लॉरेंझोने जखमी अवस्थेत तेथून पळ काढला.

त्यानंतर कट रचणाऱ्यांना आणि संशयितांना मृत्युदंड देण्यात आला. यातील काहींना तर पलाझ्झो देल्ला सिन्योरियासारख्या उंच इमारतींच्या खिडक्यांमधून फाशीला लटकाविण्यात आले. अशा एकूण ८० व्यक्तींना मृत्युदंड दिला गेला आणि उरलेल्या पाझ्झींना फिरेंझेमधून हद्दपार करण्यात आले.

हल्ला

संपादन

हल्ल्याच्या दिवशी सकाळी कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे मध्ये मिसा सोलेमिस ही प्रार्थना सुरू असताना झाले. त्या दिवशी अनपेक्षितपणे लॉरेंझो आणि जुलियानो दोघेही तेथे उपस्थित होते. हल्लेखोरांना दोघांवर एकाक्षणी हल्ला केला.[] याकोपो पाझ्झीच्या दोन हस्तकांनी लॉरेंझोवर हल्ला चढवला परंतु त्यांना हुकवून तो चर्चच्या गर्भगृहाकडे निसटला. तेथून मागच्या दाराने त्याने आपला महालाकडे पळ काढला. बेर्नार्दो बँदिनी दै बारोंचेल्ली आणि फ्रांचेस्को दे पाझ्झी यांनी जुलियानोला घेरले आणि त्याला १९ वेळा भोसकून तेथेच ठार केले. यानंतर फ्रांचेस्को साल्व्हियेती पाझ्झी हस्तकांसह पलाझ्झो देल सिन्योरियाकडे गेला पण हा महाल हस्तगत करण्यास त्याला अपयश आले. पाझ्झींना वाटले होते की या घटनेनंतर फिरेंझेचे लोक त्यांना मिळून मेदिचींच्या विरुद्ध उठाव करतील पण प्रत्यक्षात असे झाले नाही. नागरिकांनी फ्रांचेस्को दे पाझ्झी आणि इतरांना पकडले व त्याच दिवशी पलाझ्झो देल सिन्योरियाच्या खिडक्यांना टांगून त्यांना फाशी दिली..[]:140[]

यानंचक अनेक कारस्थान्यांना आणि संशयितांना पकडण्यात आले आणि अशा सुमारे ३० लोकांना फारशी चौकशी न करताच ठार केले गेले.[] रेनातो पाझ्झीला रस्त्यातून फरपटत नेउन फाशी देण्यात आले. पाझ्झी कुटुंबप्रमुख याकोपोने फिरेंझेमधून पळ काढला परंतु त्याच पाठलाग करून त्याल शहरात परत आणले गेले. त्याचा छळ करून पलाझ्झो देल्ला सिन्योरियावरून लटकावले गेले. तेथे फाशी दिलेल्या साल्व्हियेतीचा मृतदेह अद्याप कुजत आणि लटकतच होता. त्याला सांता क्रोचे येथे पुरण्यात आले परंतु संतप्त नागरिकांनी त्याचा मृतदेह खणून काढून खड्ड्यात टाकला. याने समाधान न होता हा मृतदेह रस्त्यावरून फरपटत नेउन पलाझ्झो पाझ्झीच्या दाराशी उभा केला गेला व त्याचे कुजलेले डोके दार खटखटवण्यासाठी असल्याची व्यवस्था केली गेली. शेवटी त्याला आर्नो नदीत फेकले पण तेथूनही काही मुलांनी काढून झाडावर टांगले आणि झोडले. शेवटी त्याला परत आर्नोमध्ये समाधी मिळाली.[]:141

या धामधुमीत लॉरेंझोने चौथ्या सिक्स्टसचा पुतण्या, कार्डिनल रफायेल रिआरियोला वाचविण्यात यश मिळवले. हा बुहतेक कारस्थान्यांनी पुढे केलेला निर्दोष मोहरा होता. याशिवाय त्याने कारस्थान्यांच्या दोन नातेवाईकांनाही वाचवले २६ एप्रिल या हल्ल्याचा दिवस आणि २० ऑक्टोबर, १४७८ दरम्यान एकूण ८०लोकांना फाशी देण्यात आली..[]:456 बँदिनी दै बारोंचेल्ली पळून इस्तंबूलला गेला पण तेथे सुलतान मेहमेद दुसऱ्या ने अटक केली आणि बेड्या घालून फिरेंझेला पाठविले. तेथे अजून तुर्की पोशाखातच असलेल्या बारोंचेल्लीला २९ डिसेंबर, १४७९ रोजी पलाझ्झो देल कापितानो देल पोपोलोच्या खिडकीतन टांगण्यात आली.[]:142[] ६ जून १४८१ रोजी या प्रकरणात आणखी तीन लोकांना फाशी देण्यात आली.[]:456

या प्रकारानंतर मेदिचींची फिरेंझवरील पकड अधिक मजबूत झाली व लगेच चौथ्या सिक्स्टसने घेतलेल्या सूडात त्यांनी लॉरेंझोची साथ दिली.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Ingeborg Walter (2009). Medici, Lorenzo dei (in Italian). Dizionario Biografico degli Italiani, volume 73. Roma: Istituto dell'Enciclopedia Italiana. Accessed June 2021.
  2. ^ a b c Christopher Hibbert (1979 [1974]). The Rise and Fall of the House of Medici. Harmondsworth, Middlesex: Penguin. आयएसबीएन 0140050906.
  3. ^ a b Nicholas Scott Baker (2009). For Reasons of State: Political Executions, Republicanism, and the Medici in Florence, 1480–1560. Renaissance Quarterly 62 (2): 444–478. doi:10.1086/599867. साचा:Subscription required.
  4. ^ Guido Pampaloni (1963). Bandini dei Baroncelli, Bernardo (in Italian). Dizionario Biografico degli Italiani, volume 5. Roma: Istituto dell'Enciclopedia Italiana. Accessed August 2017.

चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "cronin" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "daniels" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "marcello" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "marta" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "martines" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "rub" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "trecc3" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "trecc4" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.

चुका उधृत करा: <references> ह्या मध्ये टाकलेला <ref> "trecc5" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.