शेत (अनेकवचन : शेते) म्हणजे धान्ये, कडधान्ये, भाजी, फुले, कोंबडीची अंडी इत्यादी शेतमालाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा जमिनीचा तुकडा होय. शेते ही व्यक्ती, कुटुंब, समूह, तत्सम सहकारी संस्था, धार्मिक संस्था, ट्रस्ट, शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मालकीची असू शकतात. भांडवलशाही देशात शेते मोठ्या प्रमाणावर खासगी आस्थापनांच्या मालकीची असतात, तर साम्यवादी देशात बहुतांश शेते सरकारच्या मालकीची असतात . शेते अत्यंत छोटा आकारात ते मोठ्या आकारात असू शकतात.

नामोद्भव

संपादन

शेत या शब्दास हिंदीत खेत आणि संस्कृतात क्षेत्र असे शब्द आहेत . क्षत (तोडणे/तुटणे) आणि शत (मोजणी) हे उच्चारांनी जवळचे शब्द आहेत. संस्कृत आणि प्राकृतस आणि श उचारांची आदलाबदल करताना दिसतात. निजलेल्या अवस्थेकरता संस्कृतात शयन[] आणि शव असे शब्द आहेत, ज्यातील शयन पासून हिंदी झोपणे या अर्थी सोना येते.[].(मराठी भाषेतील शेज शब्द इथे उल्लेखनीय ठरतो). येथे प्रोटो-इंडो-युरोपीय भाषासमूहात PIE root *se- (cf. लॅटीन sero, past tense sevi, pp. satum "to sow;" Old Church Slavonic sejo, sejati; Lithuanian seju, seti "to sow");semen, season (n.), seed, इत्यादी शब्दांचा सुद्धा स्रोत असावा. [].

डॉ रामविलास शर्मा यांच्या मतानुसार सी अद्याक्षरापासून संस्कृतात सीता हा शब्द आहे, ज्याचा अर्थ शेतात नांगरल्यानंतर तयार होणारा चर होय. [][] पुढे ते मोनियर विल्यम्सचे सीता या शब्दाचे अशुद्ध उच्चारण शीता असे सुद्धा केले जात असे हे उद्धृत करून मांडणी करतात की जे मराठीतील शेत, हिंदी खेत आणि संस्कृत क्षेत्र या शब्दाच्या जवळचे आहे.( मराठी भाषेतील सिंचन, (रक्त) वाहिनी या अर्थाने वापरले जाणारे शीर, शेत अर्थाने शिवार, सीमा आणि त्याच अर्थाचा शींव, शेजार, शीग, शीधा इत्यादी शब्द इथे उल्लेखनीय ठरतात.)


इंग्रजीत Farm हा शब्द वापरला जातो जो 'करार' या अर्थाच्या firma या शब्दावरून येतो.

शेतकरी आणि शेतसारा हे आणि इतरही शब्द शेत या शब्दापासून तयार होतात.

इतिहास

संपादन

मानवी समूहांकडून नद्यांच्या काठी ठरवून केलेली वनस्पती लागवड,सोप्या शिकारींकरिता जंगले जाळून मैदानांची निर्मिती, पाळीव प्राण्यांचे संगोपन, प्रागैतिहासिक काळात सुरू झाले असावे. इ.स.पू. ९००० पासून बोर, जव आणि गहू इत्यादीचे भारतीय उपखंडात ठरवून उत्पादन घेण्यास सुरुवात झाली असावी. त्यापाठोपाठ मेंढीपालन आणि हत्तींचे पालन करण्यास सुरुवात झाली असावी. इ.स.पू ८०००-५००० निओलिथिक काळात मानवी समुदायांनी पिके घेण्यास सुरुवात केली असावी. मेहरगढ (सध्या पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात) येथील उत्खननानुसार इ.स.पू. ८०००-६००० या काळात जव आणि गहू यांचे उत्पादन आणि प्राण्यांना पाळणे चालू झाले असावे.

शेतांचे प्रकार

संपादन
  • मळा
  • बागायती
  • जिरायती
  • कोरडवाहू
  • बारमाही पाणी पुरवठा असलेली जमीन
  • बारमाही पाणी पुरवठा नसलेली पण वर्षातून फक्त एका पिकासाठी खात्रीचा पाणी पुरवठा असलेली जमीन
  • नैसर्गिक साधनांपासून एका पिकासाठी पाटाचे पाणी मिळणारी पण खात्रीचा पाणी पुरवठा नसलेली जमीन.

विशेष प्रकारची शेते

संपादन

कुक्कुटपालन

संपादन

मालकीहक्क व शेतमालक

संपादन

भारतातील शेते

संपादन

हद्द,निशाण्या,मोजणी

संपादन

देशातील जमिनींची मोजणी १९२९-३० मध्ये ब्रिटिशांनी केलेली होती. []

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६

संपादन

महाराष्ट्रात जमीन महसूलासंबंधी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अस्तित्वात आहे. या अधिनियमान्वये महसूल अधिनियम १८७९ व महसूल न्यायाधीकरण अधिनियम १९५७ हे व इतर काही आनुषंगिक कायदे संपुष्टात आणले असून, त्यांमधील महसूल अधिनियम व न्यायाधीकरण यासंबंधीचे नियम जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये सुधारणा करून अंतर्भूत केले आहेत. महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ याद्वारे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या जमीन महसूलासंबंधीच्या नियमांमध्ये सुसूत्रता आणून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.[]

जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरिता जे रेकॉर्ड्स ठेवले जातात त्यांना भूमी अभिलेख म्हणतात. सर्व प्रकारचे गाव नमुने उदा. सात-बारा, सहा व आठ नंबरचे उतारे, तसेच गाव नकाशे, चौकशीचे कागदपत्र, निर्णय व आदेश यांचा भूमी अभिलेखांत समावेश होतो.[]

महाराष्ट्र जमीन महसूल (भूमी अभिलेखाच्या प्रतींचे निरीक्षण, शोध व पुरवठा )नियम १९७० या नियमांतर्गत, या सर्व भूमिअभिलेखांच्या प्रतींचे महसूल कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करता येते.[] महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. प्रत्येक नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो. मिळकतींच्या बाबतीत तलाठी कार्यालयाकडून माहिती मिळवली जाऊ शकते. [१०][११]

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+%09%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87&trans=Translate&direction=AU
  2. ^ "ऐतिहासिक भाषाविज्ञान और हिंदी भाषा"(लेखक-डॉ रामविलास शर्मा ) पान क्रमांक १००/१०१ हे गुगलबुक्स संकेतस्थळावर दिनांक ३१ जानेवारी २०१३ रोजी भाप्रवे रात्रौ २० वाजून ३० मिनिटांनी जसे दिसले
  3. ^ एटीमऑनलाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ दिनांक ३१ जानेवारी २०१३ रोजी भाप्रवे रात्रौ २० वाजून ३० मिनिटांनी जसे दिसले
  4. ^ "ऐतिहासिक भाषाविज्ञान और हिंदी भाषा"(लेखक-डॉ रामविलास शर्मा ) पान क्रमांक १००/१०१ हे गुगलबुक्स संकेतस्थळावर दिनांक ३१ जानेवारी २०१३ रोजी भाप्रवे रात्रौ २० वाजून ३० मिनीटांनी जसे दिसले
  5. ^ http://pustak.org:4300//bs/home.php?mean=88266[permanent dead link]
  6. ^ "संग्रहित प्रत". 2017-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-02 रोजी पाहिले.
  7. ^ http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10485
  8. ^ http://www.landsofmaharashtra.com/bhumiabhilekh.html
  9. ^ http://www.landsofmaharashtra.com/bhumiabhilekh.html
  10. ^ तुमच्या मालमत्तेच्या नोंदीविषयी जाणा लेखक: ऍड. नारायण नाईक Archived 2016-03-05 at the Wayback Machine.इसकाळ संकेतस्थळ दिनांक २ फेब्रुवारी २०१३ रोजी भाप्रवे सायं १६.५१ वाजता जसे दिसले
  11. ^ http://www.landsofmaharashtra.com/bhumiabhilekh.html

बाह्य दुवे

संपादन