लवलिना बोर्गोहेन

(लव्हलिना बोर्गोहैन या पानावरून पुनर्निर्देशित)

लवलिना बोर्गोहेन (२ ऑक्टोबर, १९९७) ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मेरी कोम आणि विजेंद्र सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मुष्टीयुद्धात पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय आहे. [१] तिने २०१८ आणि २०१९ साली एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.[२][३]

लवलिना बोर्गोहेन
वैयक्तिक माहिती
Full name लवलीना बोरगोहेन
Nationality भारतीय
जन्म २ ऑक्टोबर, १९९७
गोलाघाट,आसाम,भारत
उंची साचा:Convinfobox/sec3
वजन साचा:Convinfobox/pri3
Sport
Weight class वेल्टरवेट

बोर्गोहेनने नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि ६९ किलो वेल्टरवेट श्रेणीत तिने तिसरे स्थान मिळवले.[१]

लवलिना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिसाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. आणि शिवा थापा यांच्यानंतर राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करणारी दुसरी मुष्टियोद्धा आहे.[४] 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी ती आसाममधील सहावी व्यक्ती ठरली.[५]

वैयक्तिक आयुष्य संपादन

लवलिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. ती मूळची आसामच्या गोलाघाटमधील आहे. [६]तिचे पालक टिकेन बोरगोहेन आणि मॅमोनी बोरगोहेन आहेत. तिचे वडील टिकेन यांचा लघुउद्योग आहे. मुलीच्या क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरीच आर्थिक कसरत केली. लवलिनाच्या मोठ्या जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यासुद्धा राष्ट्रीय स्तरावर किकमुष्टियुद्ध खेळलेल्या आहेत.

लवलिना हिनेसुद्धा किकबॉक्सर म्हणूनच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण संधी मिळताच ती मुष्टियुद्धाकडे वळली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने लवलिनाच्याच बारपाथर कन्या विद्यालयात चाचणी शिबीर भरवले, त्यामध्ये ती सहभागी झाली. त्यात प्रशिक्षक पदुम बोरो यांनी तिची निवड केली. २०१२मध्ये त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले आणि कालांतराने महिलांचे मुख्य प्रशिक्षक शिव सिंह यांनी तिला प्रशिक्षण दिले.[७]

व्यावसायिक यश संपादन

बोर्गोहेनला कारकिर्दीतली सर्वात मोठी संधी २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळाली. या स्पर्धेत तिची वेल्टरवेट श्रेणीत भाग घेण्यासाठी निवड झाली. तेथे ती उपांत्यपूर्व फेरीत ती युनायटेड किंग्डमच्या सँडी रायनकडून पराभूत झाली. [८]

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या इंडिया ओपन या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिनाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर तिची २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. इंडिया ओपनमध्ये तिने वेल्टरवेट श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले होते.

नोव्हेंबर २०१७ मध्ये व्हिएतनाम येथे आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले, आणि जून २०१७ मध्ये तिने अस्ताना येथे प्रेसिडेंट्स कप स्पर्धेतही कांस्य पदक जिंकले.[९]

लवलिनाने नंतर जून २०१८ मध्ये मंगोलियाची राजधानी असलेल्या उलानबातारमध्ये उलानबातार चषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि सप्टेंबर २०१८ मध्ये पोलंडमधील १३व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.[१०]

नवी दिल्लीत झालेल्या एआयबीए महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 23 नोव्हेंबर २०१८ रोजी वेल्टरवेट (६९ किलो) श्रेणीत तिने कांस्य पदक जिंकले. [११]

बोर्गोहेनची २०१९ मध्ये ३ ते १३ ऑक्टोबर २०१९ दरम्यान उलन उडे, रशिया येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी विना चाचणी थेट निवड झाली.[१०] उपांत्य फेरीत तिचा चीनच्या यांग लिऊ हिने ६९ किलो श्रेणीत २-३ अशा अंतराने पराभव केला आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

मार्च २०२० मध्ये आशिया-ओशनिया मुष्टियुद्ध ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत लवलिनाने उझबेकिस्तानच्या माफ्टुनाखोन मेलीवाचा ५-० असा पराभव केला, आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो श्रेणीत तिचे स्थान पक्के केले. यासोबतच ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी आसामची पहिली महिला खेळाडू बनली.[१२]

ऑक्टोबर २०२० मध्ये लवलिनाला  कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि क्वारंटाईन व्हावे लागले. यामुळे तिची राष्ट्रीय मुष्टियुद्ध टीमसोबतची इटलीला जाण्याची हुकली. त्यावेळी तिने ऑलिंपिक स्पर्धेसाठीच्या सरावावर लक्ष केंद्रित केले.[१३]

टोकियो ऑलिम्पिक संपादन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोर्गोहेनने ६९ किलो वजनी गटात जर्मन मुष्टीयोद्धा नादिन अपटेझ हिला पहिल्या फेरीत हरवले तर उप-उपांत्य फेरीत माजी जागतिक विजेत्या तैवानच्या चेन नीन-चीनला हरवून ऑलिंपिकमध्ये पदक निश्चित केले.[१४]

पुरस्कार संपादन

  • अर्जुन पुरस्कार (२०२०)
  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२०२१)[१५]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Tokyo Olympics: Lovlina Borgohain settles for bronze after losing semi-final". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-08-04. 2021-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Women's Boxing World Championships: India's Mary Kom Enters Final, Lovlina Borgohain Takes Home The Bronze Medal | Boxing News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ Nov 22, Devadyuti Das / TNN / Updated:; 2018; Ist, 21:55. "Mary Kom storms into World Boxing Championships final, Lovlina Borgohain gets bronze | Boxing News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "Lovlina Borgohain's Tokyo qualification big boost to boxing: AABA Official". www.telegraphindia.com. 2021-07-31 रोजी पाहिले.
  5. ^ "'It is what it is…': Boxer Lovlina Borgohain on getting her Arjuna Award over a video call". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-08-29. 2021-07-31 रोजी पाहिले.
  6. ^ Jul 30, TIMESOFINDIA COM / Updated:; 2021; Ist, 10:45. "Lovlina Borgohain - Everything you need to know about India's new Olympic medallist | Tokyo Olympics News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  7. ^ Mar 16, Arnab Lall Seal / TNN / Updated:; 2018; Ist, 16:40. "High hopes for Lovlina | Guwahati News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  8. ^ Releases, Press (2018-04-08). "Why Lovlina Borgohain is a part of the renaissance in Indian women's boxing". thebridge.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  9. ^ "https://www.mid-day.com/sports/other-sports/article/boxing--lovlina-assures-india-a-bronze-at-astana-18318160". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2017-06-08. 2021-07-31 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  10. ^ a b "Ulaanbaatar Cup: Mandeep Jangra Wins Gold, Four Others Grab Silver | Boxing News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  11. ^ "Women's Boxing World Championships: India's Mary Kom Enters Final, Lovlina Borgohain Takes Home The Bronze Medal | Boxing News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  12. ^ "Lovlina Borgohain's Tokyo qualification big boost to boxing: AABA Official". www.telegraphindia.com. 2021-07-31 रोजी पाहिले.
  13. ^ Sarangi, Y. b (2020-11-10). "Lovlina fighting to remain focused" (इंग्रजी भाषेत). Kolkata. ISSN 0971-751X.
  14. ^ "Tokyo Olympics: Lovlina Borgohain assures India of 2nd medal after reaching boxing welterweight semifinals". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  15. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.