लक्झेंबर्ग शहर (लक्झेंबर्गिश: Stad Lëtzebuerg, फ्रेंच: Ville de Luxembourg, जर्मन: Luxemburg Stadt) ही पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रँक लोकांनी मध्य युगात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते ब्रसेल्सपासून २१३ किमी (१३२ मैल), पॅरिसपासून ३७२ किमी (२३१ मैल), क्योल्नपासून २०९ किमी (१३० मैल) तर फ्रान्सच्या मेसपासून ६५ किमी (४० मैल) अंतरावर स्थित आहे.[]

लक्झेंबर्ग
Lëtzebuerg
लक्झेंबर्ग देशाची राजधानी


चिन्ह
लक्झेंबर्गचे लक्झेंबर्गमधील स्थान

गुणक: 49°36′42″N 6°7′48″E / 49.61167°N 6.13000°E / 49.61167; 6.13000

देश लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
जिल्हा लक्झेंबर्ग
क्षेत्रफळ ५१.४६ चौ. किमी (१९.८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३१९ फूट (४०२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९३,८६५
  - घनता १,७२१ /चौ. किमी (४,४६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
vdl.lu

२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.[] बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे.

चित्र दालन

संपादन
 
लक्झेंबर्गची सर्वात प्रसिद्ध खुण - अडोल्फी पूल
लक्झेंबर्गची सर्वात प्रसिद्ध खुण - अडोल्फी पूल  
 
एकेकाळी लक्झेंबर्गच्या तटबंदीचा भाग असलेला किल्ला
एकेकाळी लक्झेंबर्गच्या तटबंदीचा भाग असलेला किल्ला  
 
लक्झेंबर्ग रेल्वे स्थानक
लक्झेंबर्ग रेल्वे स्थानक  
 
१६२१ साली बांधले गेलेले लक्झेंबर्ग नोत्र देम कॅथेड्रल
१६२१ साली बांधले गेलेले लक्झेंबर्ग नोत्र देम कॅथेड्रल  

संदर्भ

संपादन
  1. ^ "Great Circle Distances between Cities". United States Department of Agriculture. 2005-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-07-23 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2015-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: