ऋषी सुनक

(रिशी सुनाक या पानावरून पुनर्निर्देशित)

ऋषी सुनक (Rishi Sunak; जन्म १२ मे १९८०)[] हे एक ब्रिटिश राजकारणी आहेत. २५ ऑक्टोबर २०२२ पासून ते युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान आणि २४ ऑक्टोबर २०२२ तेथील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत.[] सुनक हे युनायटेड किंग्डमचे पहिले ब्रिटिश आशियाई आणि पहिले हिंदू पंतप्रधान आहेत.[] २०२० ते २०२२ पर्यंत ते युनायटेड किंग्डमचे अर्थमंत्री आणि २०१९ ते २०२० पर्यंत कोषागाराचे मुख्य सचिव होते.[] २०१५ पासून ते रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघाचे खासदार आहेत.[]

ऋषी सुनक

विद्यमान
पदग्रहण
२५ ऑक्टोबर २०२२
सम्राट चार्ल्स तिसरा
उपपंतप्रधान डोमिनिक राब
मागील लिझ ट्रस

जन्म १२ मे, १९८० (1980-05-12) (वय: ४४)
साउथहँप्टन, हँपशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष कंझर्व्हेटिव्ह पक्ष
पत्नी अक्षता मूर्ती (ल. २००९)
नाते एन.आर. नारायण मूर्ती (सासरे)
सुधा मूर्ती (सासू)
अपत्ये २ मुली
निवास 10 डाउनिंग स्ट्रीट, लंडन

चेकर्स, आयलेसबरी किर्बी सिगस्टन मनोर, किर्बी सिगस्टन, नॉर्थ यॉर्कशायर

शिक्षण विंचेस्टर कॉलेज
गुरुकुल लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड (बी. ए)
स्टॅनफोर्ड विद्यापीठ (एम. बी. ए)
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदु
संकेतस्थळ https://www.rishisunak.in/

१९६० च्या दशकात पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या पालकांमध्ये सुनकचा जन्म साउदम्प्टन येथे झाला. त्यांचे शिक्षण विंचेस्टर कॉलेजमध्ये झाले, त्यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि फुलब्राइट स्कॉलर म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. स्टॅनफोर्डमध्ये असताना, त्यांनी त्यांची भावी पत्नी अक्षता मूर्ती, भारतीय अब्जाधीश इन्फोसिसचे एन.आर. नारायण मूर्ती यांची मुलगी भेटली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर, सुनकने गोल्डमन सॅक्ससाठी आणि नंतर द चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजमेंट आणि थेलेम पार्टनर्स या हेज फंड फर्ममध्ये भागीदार म्हणून काम केले.

सनक हे २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंडसाठी हाउस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले, विल्यम हेग यांच्यानंतर. सुनकने २०१६ च्या युरोपियन संघ सदस्यत्वावरील सार्वमतामध्ये ब्रेक्झिटला पाठिंबा दिला होता. २०१८ च्या फेरबदलामध्ये थेरेसा मे यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये स्थानिक सरकारचे संसदीय अंडर-सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मेच्या ब्रेक्झिट माघारी कराराच्या बाजूने तीन वेळा मतदान केले. मे यांनी राजीनामा दिल्यानंतर, सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह नेते होण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला. जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर सुनक यांची ट्रेझरीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी २०२० च्या मंत्रिमंडळ फेरबदलात जाविद यांच्या राजीनाम्यानंतर सुनक यांनी साजिद जाविद यांच्या जागी राजकोषाचे कुलपती म्हणून नियुक्ती केली. कुलपती या नात्याने, कोविड-१९ महामारीला सरकारच्या आर्थिक प्रतिसादात आणि कोरोनाव्हायरस जॉब रिटेन्शन आणि इट आउट टू हेल्प आउट योजनांसह त्याचे आर्थिक परिणाम यामध्ये सुनक प्रमुख होते. त्यांनी जुलै २०२२ मध्ये कुलपतीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर सरकारी संकटात जॉन्सन यांनी राजीनामा दिला.

जॉन्सनची जागा घेण्यासाठी सनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या निवडणुकीत उभे राहिले आणि सदस्यांचे मत लिझ ट्रस यांना गमावले. सरकारी संकटात ट्रसच्या राजीनाम्यानंतर, सनक यांची २४ ऑक्टोबर २०२२ रोजी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. किंग चार्ल्स III यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली, त्यांच्या कारकिर्दीत प्रथम नियुक्ती करण्यात आली, एका दिवसानंतर, ते पहिले ब्रिटिश बनले. आशियाई आणि हिंदू हे स्थान धारण करतील

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

संपादन

ऋषी सुनक यांचे आईवडील मुळचे भारतीय वंशाचे आहेत. सुनक हे पंजाबी खत्री कुटुंबातील आहेत.[][] फाळणीपूर्वी त्यांचे आजी-आजोबा सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या गुजराणवाला या गावी राहत असत. त्यांचे आजोबा, रामदास सुनक हे १९३५ मध्ये लिपिक म्हणून काम करण्यासाठी नैरोबी येथे गेले होते. फाळणीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये सुनक कुटुंबीयांनी पाकिस्तान सोडून दिल्लीत आश्रय घेतला होता. १९३७ मध्ये रामदास सुनक यांच्या पत्नी सुहाग राणी सुनक आणि त्यांच्या आई यादेखील दिल्लीहून केनियाला गेल्या. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच सुनक यांचे आजी आणि आजोबा भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. सुनक यांचे आजी-आजोबा आफ्रिकेत जाण्यापूर्वी गुजराणवाला हा भारताचा भाग होता. परंतु फाळणीनंतर गुजराणवाला पाकिस्तानात गेला. त्यानंतर १९६० च्या दशकात ते त्यांच्या कुटुंबासह पूर्व आफ्रिकेतून इंग्लंडलामध्ये स्थलांतरित झाले.[][] सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. त्यांचे आजोबा (आईकडील), रघुबीर सैन बेरी हे लुधियाना जिल्ह्यातील जसोवाल सुदान गावचे होते (आता पंजाब, भारत). त्यांच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. त्यांचे वडील डॉक्टर होते तर आई फार्मसी चालवायच्या. १९८० मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.[][१०][]

त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिंकन कॉलेज मधून तत्त्वज्ञान (philosophy), राजकारण (Politics) आणि अर्थशास्त्रात (Economics) या विषयात पदवी प्राप्त केली. २००६ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पुर्ण केले.[]

कारकीर्द

संपादन

व्यवसायिक

संपादन

राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी २००१ ते २००४ दरम्यान इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅक्ससाठी विश्लेषक (analyst) म्हणून काम केले.[११] त्यानंतर त्यांनी हेज फंड मॅनेजमेंट फर्म 'चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजमेंट'साठी काम केले आणि सप्टेंबर २००६ मध्ये त्यामध्ये भागीदारही बनले.[१२] २००९ मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली आणि कॅलिफोर्नियात गेले.[१३] तेथे त्यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्यांसोबत २०१० मध्ये थेलेम पार्टनर्स नावाचे नवीन हेज फंड फर्म सुरू केले होते.[१४][१५][१६] या दोन्ही हेज फंड्स मध्ये, पॅट्रिक डेगॉर्स हेच त्यांचे बॉस होते.[१७] २०१३ ते २०१५ दरम्यान त्यांनी त्यांचे सासरे, भारतीय उद्योगपती एन.आर. नारायण मूर्ती यांच्या मालकीच्या कॅटामरन व्हेंचर्स या गुंतवणूक फर्मसाठी संचालक म्हणून काम पाहिले.[११][१८]

राजकीय

संपादन

ऑक्टोबर २०१४ साली ते पहिल्यांदा कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून रिचमंड (यॉर्क्स) या मतदार मतदारसंघातून संसंदेवर (हाऊस ऑफ कॉमन्स) निवडून गेले. ऋषी सुनक यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. २०१७ आणि २०१९ मध्येही ते या मतदारसंघातून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत काॅन्झर्व्हेटिव्ह पक्षाला सरळ बहुमत मिळाले आणि बोरिस जॉन्सन हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. सुरुवातील बोरिस जॉन्सन यांच्या सरकार मध्ये ऋषी सुनक हे कोषागाराचे मुख्य सचिव (Chief Secretary to the Treasury) होते त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये ते बोरिस जॉन्सन यांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री (Chancellor of the Exchequer) झाले. अर्थ मंत्रीपद हे ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय वंशाचे राजकारणी आहेत. परंतु २०२२ मध्ये राजकीय वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.[]

युनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री

संपादन

बोरिस जॉन्सन यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी चुरस सुरू झाली होती.[१९] त्यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री राहिलेले ऋषी सुनक हे त्यात सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. पण यामध्ये शर्यतीत लिझ ट्रस यांनी मारली. मात्र, लिझ ट्रस यांनी आणलेली नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनीही अवघ्या ५० दिवसातच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.[२०]

त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले. बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली, त्यानंतर कॅबिनेट मंत्री पेनी मॉर्डॉन्ट यांनीही माघार घेतली. त्यामुळे ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली.[२१] किंग चार्ल्स तिसरा यांनी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून सुनक यांची नियुक्ती केली[२२], युनायटेड किंगडमचे ते पहिले ब्रिटिश आशियाई पंतप्रधान आहेत तसेच हे पद धारण करणारे पहिले बिगर ख्रिश्चन आणि पहिले हिंदू बनले.[][२०]

वैयक्तिक जीवन

संपादन

ऑगस्ट २००९ मध्ये, त्यांनी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक, भारतीय अब्जाधीश एन.आर. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी विवाह केला. स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना सुनक आणि मूर्ती यांची भेट झाली; त्यांना अनुष्का आणि कृष्णा नावाच्या दोन मुली आहेत. अक्षता ही उद्योगपती, फॅशन डिझायनर आणि उद्यम भांडवलदार आहे. तिची इन्फोसिसमध्ये ०.९३% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे ती यूकेमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक बनली आहे, तसेच यूके व भारतामधील इतर अनेक व्यवसायांमध्ये तिचे शेअर्स आहेत. 'द संडे टाईम्स रिच लिस्ट २०२२' मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार सुनक आणि मूर्ति यांचा ब्रिटनमधील श्रीमंत कुटुंबांमध्ये २२२ वा नंबर लागतो, त्यांची अंदाजे एकत्रित संपत्ती £७३० दशलक्ष आहे, ज्यामुळे सुनक "श्रीमंतांच्या यादीत सामील होणारे पहिले आघाडीचे राजकारणी" बनले आहेत.[][२३]

साऊथ हॅम्पटनमध्ये हिंदू समुदायाचं वैदिक सोसायटी टेम्पल नावाचं खूप मोठं मंदिर आहे. या मंदिराच्या संस्थापकांमध्ये ऋषी सुनक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. याच मंदिराच्या अवती भोवती ऋषी सुनक यांचं बालपण गेलं.[] सुनक हे हिंदू आहेत आणि त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भगवद्‌गीतेला साक्ष ठेवून शपथ घेतली.[२४]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Paul, Anna (2022-10-25). "Find out more about Rishi Sunak as he becomes the new PM". Metro (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
  2. ^ a b टीम, एबीपी माझा वेब (2022-10-24). "भारतीय वंशाचे ऋषि सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, कोण आहेत ऋषि सुनक?". marathi.abplive.com. 2022-10-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Rishi Sunak to become first British PM of colour and also first Hindu at No 10". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2022-10-24. 2022-10-27 रोजी पाहिले.
  4. ^ "The Rt Hon Rishi Sunak MP". GOV.UK (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e f "ऋषी सुनक : बँकर ते पंतप्रधान, भारतीय वंशाच्या व्यक्तीची सर्वोच्च पदी झेप". BBC News मराठी. 2022-07-19. 2022-10-27 रोजी पाहिले.
  6. ^ "डेस्‍क पर भगवान गणेश की प्रतिमा रखने वाले और गाय की पूजा करने वाले ब्रिटेन के पीएम ऋषि सुनक के बारे में 10 रोचक बातें". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-10-28 रोजी पाहिले.
  7. ^ Service, Tribune News. "What is Rishi Sunak's 'Pakistan' link? For Hindu-Punjabi, it may be the 'Barack Obama moment', neighbour too lay claim to 'proud moment'". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-10-28 रोजी पाहिले.
  8. ^ a b Desk, India com News. "कोण आहेत ऋषी सुनक? जाणून घ्या इंग्लंडच्या नव्या भारतीय वंशाच्या पंतप्रधानांविषयी सर्वकाही". www.india.com. 2022-10-27 रोजी पाहिले.
  9. ^ Marathi, TV9 (2022-10-24). "ऋषी सुनक यांच्या विजयाचे फटाके, पाकिस्तानतही फुटले..." TV9 Marathi. 2022-10-27 रोजी पाहिले.
  10. ^ "Who is Rishi Sunak? Everything you need to know about Britain's next prime minister". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2022-10-25. 2022-10-27 रोजी पाहिले.
  11. ^ a b "Quite positive that Rishi will do well as a MP, says Murthy". Business Standard. 8 May 2015. 2 January 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2019 रोजी पाहिले.
  12. ^ Hutchings, William (24 January 2007). "TCI adds four partners". Financial News. 25 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2019 रोजी पाहिले.
  13. ^ "Mr Rishi Sunak". FCA. 9 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 April 2022 रोजी पाहिले.
  14. ^ "Ex-TCI star emerges at rival". Financial Times. 7 February 2012. 21 September 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2019 रोजी पाहिले.
  15. ^ "Star analyst's new fund raises $700m". Financial Times. 25 October 2010. 25 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2019 रोजी पाहिले.
  16. ^ "Tomorrow's Titans" (PDF). The Hedge Fund Journal. p. 9. 9 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 1 October 2019 रोजी पाहिले.
  17. ^ Partington, Richard (14 February 2020). "New chancellor Rishi Sunak challenged over hedge fund past". The Guardian. 6 August 2022 रोजी पाहिले.
  18. ^ Sood, Varun (12 February 2019). "Narayana Murthy far behind Azim Premji in family office stakes". Livemint. 9 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2019 रोजी पाहिले.
  19. ^ "बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची 'ही' आहेत 5 कारणं".
  20. ^ a b "युकेच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा". BBC News मराठी. 2020-02-14. 2022-10-27 रोजी पाहिले.
  21. ^ "#1 Rishi Sunak, 145 MP Backed Rishi Sunak To Become UK PM Today If… » THE FOXY NEWS". THE FOXY NEWS (इंग्रजी भाषेत). 2022-10-24. 2022-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-27 रोजी पाहिले.
  22. ^ "Rishi Sunak reshuffle: Braverman named home secretary, Gove returns as levelling up secretary, Mordaunt not promoted – as it happened". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2022-10-25. 2022-10-27 रोजी पाहिले.
  23. ^ "Rishi Sunak and Akshata Murty make Sunday Times Rich List". The Independent (इंग्रजी भाषेत). 2022-05-21. 2022-10-27 रोजी पाहिले.
  24. ^ Puri, Anjali (2015-08-07). "Next UK PM Rishi Sunak on being British, Indian and Hindu at the same time". www.business-standard.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-27 रोजी पाहिले.