राठी किंवा राठ हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः राजस्थान आढळतो. बहुतेक ठिकाणी राठी आणि राठ असे दोन वेगवेगळे उपप्रकार गणले जातात. हा गोवंश राजस्थान मधील बिकानेर जिल्ह्यातील राठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळतो. येथील राठ नावाच्या भटक्या मुस्लिम जमाती ने याचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले आहे, त्यामुळे या गोवंशाला 'राठी' किंवा 'राठ' असे नाव पडले.

राठी गोवंश
राठी गाय
स्थिती पाळीव
मूळ देश भारत
आढळस्थान बिकानेर, गंगानगर, जैसलमेर, हनुमानगढ (राजस्थान)
मानक agris IS
उपयोग दुहेरी हेतूचा गोवंश
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    ३५० किलो (७७० पौंड)
  • गाय:
    २९५ किलो (६५० पौंड)
उंची
  • बैल:
    १४२ सेंमी
  • गाय:
    ११४ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
डोके मोठे डोके, रूंद आणि विस्तृत कपाळ
पाय मध्यम आखूड
शेपटी लांब, शेपुटगोंडा मोठा, झुपकेदार आणि काळा
तळटिपा
राठी आणि राठ अशा दोन उपप्रकारात मोडणारा गोवंश

अंदाजे ७०-८० वर्षांपूर्वी राठ समाजाने थारपारकर, लाल सिंधी तथा साहिवाल आणि धन्नी या भारतीय गोवंशाचे संकर करून 'राठी' या गोवंशाची निर्मिती केली.[]

यातील लाल-तांबड्या रंगाच्या गोवंशाला राठी आणि पांढऱ्या रंगाच्या गोवंशाला राठ असे म्हणतात. 'राठ' हा गोवंश एकदम दुधाळ गोवंश म्हणून ओळखला जातो.

शारीरिक रचना

संपादन

या गोवंशाचा आकार मध्यम असून अंग भरीव असते. या गोवंशाचे डोके मोठे असून कपाळ रूंद आणि पसरलेले असते. डोळे काळे आणि पाणीदार असतात. कान छोटे असून आतील बाजूस लालसर तपकिरी असतात. या गोवंशाची मान थोडी आखूड असून गळकंबळ किंवा पोळी थोडी मोठी आणि आखीव असते. पाय सामान्य आकाराचे असून खुर मात्र मोठे आणि काळे असतात. शेपटी लांब असून शेपुटगोंडा झुपकेदार, केसाळ आणि काळ्या रंगाचा असतो. या गोवंशाचा रंग लाल-तांबडा असून त्यावर पांढरे डाग असतात आणि पोटाशी रंग फिक्कट होत गेलेला असतो.

वैशिष्ट्य

संपादन

राजस्थान मधील उगम असल्यामुळे हा उष्ण आणि प्रतिकूल हवामानात सुद्धा चांगला टिकतो. तसा याचा भारतभर प्रसार झालेला असून, विशेष करून कर्नाटक राज्यातील बेल्लारी, गुलबर्गा, दावणगेरे, इत्यादी ठिकाणी चांगलाच वापरला जातो.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा 'दुहेरी हेतूचा गोवंश' म्हणून ओळखला जातो.[] थोडी चांगली काळजी घेतली असता हा डेरी साठी उत्तम दुधारू गोवंश ठरू शकतो.

भारतीय गायीच्या इतर जाती

संपादन

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "राठ मुस्लिम परिवार पाल रहे राठी नस्ल की गायें, पालन-पोषण कर दे रहे बढ़ावा" (हिंदी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Breeds | nddb.coop" (हिंदी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.