थारपारकर गाय

भारतीय गोवंश

थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने पण ओळखले जाते. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

थारपारकर गाय
थारपारकर बैल

शारीरिक वर्णन

संपादन

पांढरा रंग, मांसल, मध्यम ते उंच शरीर. पाठीवर/खांद्यावर राखाडी रंग किंवा राखाडी पट्टे, लांब कान, लांब काळी झुपकेदार शेपटी, मध्यम आकाराचे डोके आणि छोटी शिंगे, ही या जातीची वैशिष्ट्ये. यांची दूध देण्याची क्षमता उत्तम असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.[] भारतातील उत्तम दूध देणाऱ्या गाईंमध्ये थारपारकर गाईची गणना होते. उष्ण व शुष्क वातावरणात अधिवास, मध्यम खुराक अशा प्रकारच्या परिस्थितीत सुद्धा ही गाय सहज टिकते. यामुळे या गाईला दुधारू गाईंची कामधेनू असे म्हणतात. यांची उंचपुरी आणि मोठी देहयष्टी, चांगली रोगप्रतिकारक शक्ती, यामुळे थारपारकर गाई विदेशात पण मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या गेल्या.

वैशिष्ट्ये

संपादन

या जातीच्या गायी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा उत्तम दूध देतात. सामान्यपणे रोज १० ते १३ लिटर दूष देतात.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.
  2. ^ डॉ. नितीन मार्कंडेय, अमित गद्रे (२००७). देशी गोवंश. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. ४१. ISBN 978-93-86204-44-8.