जनावरांचा चारा

पाळीव प्राण्यांना खाण्यासाठी वापरण्यात येणारे कृषी खाद्यपदार्थ

जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढवयण्यासाठी,शरीराची वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा व शरीराला लागणारी प्रथिने,क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्त्वे  यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात.

आवश्यक पशुखाद्य

संपादन
  • चारा- हिरवा व वाळलेला
  • खुराक - यामध्ये कडधान्ये(मका, ज्वारी, बटाटा, टॅपी ओका) व कारखान्यातील उपउत्पादने(मळी, पेंड)

हिरवा चारा

संपादन

हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हिरवा चारा  जनावरांना चिवस्ट लागतात. खुराकामध्ये अन्नघटक व उर्जा जास्त प्रमाणत असल्यामुळे याचा दुधावर चांगला परिणाम होतो. पशुला खाद्य देताना खालील बाबीचा विचार करावा :

  1. खाद्यातील पाण्याचा अंश किती आहे.
  2. पचन होईल अशा खाद्यचा अंश:- चारा : ४०-५५%, पेंड :८०-९०% ,धान्य :७०-९०%
  3. पौष्टिक गुण, आवश्यक असणारी पोषकतत्त्वे  पहावे.
  4. चव व स्वाद कि ज्यामुळे जनावरांना खाद्य आवडेल.
  5. विशिष्ट प्रथिने,जीवनसत्त्वे इ. ने त्यांची प्रकृती सुधारेल /आरोग्य राखले जाईल.

हिरवा चारा बनविन्याच्या पद्धती

संपादन
  • मुरघास तयार करणे.
  • ॲझोला खाद्य तयार करणे.
  • हायड्रोपोनिक्स-

हायड्रोपोनिक्स पद्धतीने बनवलेला हिरवा चारा हा जनावरांसाठी खुपच उपयुक्त असे खाद्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान व रासायिनक द्रव्यांंचा वापर करून पाण्यात तयार केलेले खाद्य जनावरांसाठी जास्त फायदेशीर व किफायतशीर ठरते. या खाद्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे मिळतात व त्याचा परिणाम दुध उत्पादन वाढीवर होतो. वाळलेल्या सुक्या चाऱ्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो. ओला चारा पोषण आहार व उत्पादन आहार दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो. खुराकामध्ये ऊर्जा भरपूर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास, हिरवा मका, गवत, उसाचे वाढे इत्यादी या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. ही खाद्ये जनावरांना खाण्यासाठी चविष्ट लागतात. तसेच खुराकात म्हणजेच साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड, भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात. यामुळे दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो व दुधाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच विशिष्ट प्रथिने, जीवनसत्त्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ राखले जाते.

वाळलेला(सुका) चारा

संपादन

डोंगराळ व वनांसाठी आरक्षित जागेमध्ये वाळलेले डोंगरी गवत, भाताचा पेंढा किंवा गव्हाचे काड कापून साठवून ठेवले जातात. काही ठिकाणी कडबा साठवून ठेवला जातो. हे गवत मुखत्वे हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या सुरुवातीला वापरण्यात येते. ह्या वाळलेल्या गवतात पोषकतत्त्वे कमी प्रमाणात असतात. अश्या चाऱ्याला युरिया, मिठ, मिनरल मिक्शर, व गुळ याची प्रक्रिया करून त्याचे पोषण मूल्य सुधारले जाऊ शकतात. ज्यामुळे जनावरांना ज्यावेळी हिरवा चार उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टिक चारा मिळेल व चा-याची कमतरता भासणार नाही.

सुक्या चा-यावरती प्रक्रिया करण्याची गरज

संपादन
  • सुक्या चाऱ्याला चव नसल्यामुळे जनावरे बराचसा भाग खात नाहीत व तो वाया जातो.
  • काही चा-यास बारिक धारदार काटे असतात ते जनावरांना खाताना तोंडाला कापतात व तोंडातील सुक्ष्म भागांना जखमा होतात.
  • पावसाळा संपल्यानंतर जनावराना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते,अश्यावेळी सुक्या चा-यावरती अवलंबुन रहावे लागते.परंतु या चा-यामध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषकतत्त्वे,प्रथिने,जीवनसत्त्वे पाहीजे त्याप्रमाणात मिळत नाहीत.

खुराक

संपादन

खुराकामध्ये ऊर्जा भरपूर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास ,हिरवी मका,गवत, उसाचे वाढे या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ही खाद्ये जनावरांना खाण्यासाठी चिवस्ट लागतात.तसेच खुराकात म्हणजेच साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड,भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात, यामुळे दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो व दुधाच्या उत्पादनत वाढ होते. तसेच विशिष्ट प्रथिने,जीवनसत्त्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ राखले जाते. जनावरांना चाऱ्याची गरज दोन कारणासाठी असते .शारीरिक वाढीसाठी आणि उत्पादनासाठी किंवा कार्यशाक्तीसाठी. जनावरांना आपण जो चारा देतो  त्या सर्वाचेच पचन होते असे नाही त्यामध्ये असणाऱ्या घटकांनुसार व प्रकारानुसार पचनयोग्य घटक वेगवेगळे असतात.

खाद्य व्यवस्थापन

संपादन

जनावरांना शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी खाद्याची गरज असते. ज्या आहारातून शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी आवश्यक अन्नद्रव्ये पाचक स्वरूपात मिळतात व भूक भागते त्या आहारास‘समतोल आहार’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १० लिटर दुध देणाऱ्या गाई/ म्हशीस(वजन अंदाजे ४०० किलो) ६-८ किलो वाळलेला चारा,२५ किलो हिरवा चारा व ५-६ किलो खुराक खाद्य आवश्यक असते. वाळलेला चारा व हिरव्या चाऱ्याची कुट्टी केल्यास २५ % खाद्याची बचत होते. सर्वसाधारण जनावरांना त्यांच्या वजनाच्या २ ते २.५ % वाळलेला चारा लागतो.वाळलेला चारा नसेल तर वजनाच्या ४ ते ६ % हिरवा चारा लागतो. म्हणजे साधरण पूर्ण वाढलेल्या जनावराला ८ ते १० किलो वाळलेला चारा व २० ते ३० किलो हिरवा चारा लागतो.

फायदे

संपादन
  • पशुखाघ वापरल्याने जनावराच्या स्वास्थ्यामध्ये जलद सुधारणा दिसून येते.
  • पशुखाद्यामधून योग्य व आवश्यक प्रमाणात जनावरांना शरीरासाठी व दुध उत्पादनासाठी प्रथिने देता येतात.
  • जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • जनावराची प्रजनन क्षमता मजबूत होवून प्रजनन काळात त्याचे स्वास्थ उत्तम राखले जाते.
  • जनावरांपासून मिळणा-या उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. उदा : दुधाचे उत्पादन वाढते,वासरे सुधृढ होतात

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ[]

संपादन
  1. ^ Nursery and Agriculture Techniques (2015). Marathi_Gardaning ,Nursery and Agriculture Techniques.