रशियन गेज
रशियन गेज हा लोहमार्गांवरील अनेक रेल्वे गेजपैकी एक आहे. ह्या गेजमध्ये लोहमार्गाच्या दोन रूळांमधील अंतर १५२० मिमी किंवा ५ फूट इतके असते. ब्रॉड गेजमध्ये गणन्यात येणारा हा गेज प्रामुख्याने रशिया, मंगोलिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, बेलारूस, मोल्दोव्हा, युक्रेन, एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, व फिनलंड ह्या देशांमध्ये वापरला जातो. ह्यांपैकी बहुतेक सर्व देश भूतपूर्व सोव्हिएत संघाची गणराज्ये होती.
इ.स. १८४० च्या दशकामध्ये रशियन साम्राज्याने मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वेसाठी ५ फूट गेजची निवड केली. त्यानंतर रशिया व भोवतालच्या भागांमध्ये झपाट्याने रेल्वेचे जाळे पसरले. हे सर्व मार्ग रशियन गेज वापरून बांधले गेले. आजच्या घडीला जगभरात रशियन गेजचे एकूण २,२५,००० किमी लांबीचे लोहमार्ग आहेत.