मुळशी पॅटर्न
मुळशी पॅटर्न हा २०१८ सालचा प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिजीत भोसले, अस्सल प्रॉडक्शन आणि पुनित बालन एंटरटेनमेंट निर्मित गुन्हेगारी वर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात ओम भुतकर, मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मुळशी, पुणे येथे घडलेल्या घटनांवर आधारित असून शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध यांचे चित्रण आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला.[१] चित्रपटाचा हिंदी भाषेतील रिमेक अंतिमः द फाइनल ट्रुथ हा २६ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना, सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमये यांनी भूमिका साकारल्या आहेत.[२][३][४]
मुळशी पॅटर्न | |
---|---|
दिग्दर्शन | प्रवीण तरडे |
निर्मिती |
अभिजीत भोसले पुनीत बालन |
कथा | प्रवीण तरडे |
पटकथा | प्रवीण तरडे |
प्रमुख कलाकार |
ओम भुतकर |
संवाद | प्रवीण तरडे |
संकलन |
रमीझ दलाल |
छाया | महेश लिमये |
संगीत | नरेंद्र भिडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २३ नोव्हेंबर २०१८ |
वितरक |
अभितीत भोसले जेन्युईन प्रोडक्शन एल.पी.जी. किरण दगडे पाटील प्रोडक्शन |
अवधी | १४७ |
|
कथानक
संपादनगुंड राहुल पाटील उर्फ राहुल्या त्याच्या लहानपणीचा मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार गणेश उर्फ गन्या, त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीच्या हातून त्याची हत्या केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना दृष्याने चित्रपटाची सुरुवात होते. दया आणि पित्याच्या नेतृत्वाखाली प्रतिस्पर्धी टोळी पुण्याच्या रस्त्यांवरून राहुल्याचा पाठलाग करते. फ्लॅशबॅकच्या मालिकेद्वारे, हा चित्रपट दाखवतो की राहुल्या कसा गँगस्टर बनला.
शेतकरी सखाराम पाटील (राहुलचे वडील) यांना त्यांची जमीन विकावी लागते. राहुलला वाटतं की शेती विकून आपल्या कुटुंबाने आपली प्रतिष्ठा गमावली आहे. सखाराम नंतर एका बिल्डरच्या बंगल्यावर चौकीदार म्हणून काम करतो पण चुकून त्याच्या कारचे नुकसान झाल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले जाते आणि त्याचा अपमान केला जातो. राहुलचा मित्र गन्यासोबत हे कुटुंब मजूर म्हणून मुळशीला राहायला जाते. राहुल काम करण्यास नकार देतो कारण त्याला असे वाटते कि आपल्या कौटुबिक परिस्थितीसाठू आपले वडिलच जबाबदार आहेत. पुढे राहूल दिपालीच्या प्रेमात पडतो, ति मजुरांचा प्रमुख शिरप्याची मुलगी असते. एका सकाळी राहुल रागाने वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या एका ठेकेदाराला मारहाण करतो आणि ठार करतो, स्थानिक गुंड नान्या भाईचे लक्ष वेधून घेतो जो राहुलला त्याच्यासाठी काम करण्यासाठी आमंत्रित करतो. राहुल आणि गन्या दोघेही भाई साठी काम करतात. त्यानंतर राहुलला कळते की नान्याभाईनेच राहुलच्या वडिलांना जमीन गमावण्यास भाग पाडले. बदला म्हणून, राहुल त्याला मारतो आणि टोळीचा ताबा घेतो. नान्याभाईच्या हत्येने टोळीतील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात.
मुळशीतील जमिनींवर कॉर्पोरेट्सनी बांधलेल्या सर्व जमिनी आणि व्यवसायांवर राहुल ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे इतर टोळ्यांना राग येतो. नवीन नोकरीवर रुजू झालेले इन्स्पेक्टर विठ्ठल कडू (उपेंद्र लिमये) गुन्हेगारी कमी करण्यासाठी टोळ्यांना एकमेकांची हत्या करू देण्याचा निर्णय घेतात. राहुल एका लहान मुलाशी मैत्री करतो आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी बंदूक देतो. त्यानंतर राहुल दिपालीशी लग्न करण्याचा प्रयत्न करतो, पण ती गुंड असल्यामुळे ती नकार देते. राहुल त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आल्यावर, त्याला कळते की इतर कुटुंबातील सदस्य घरगुती कामे करून प्रामाणिकपणे जीवन जगत आहेत आणि तो गुन्ह्यातून नफा मिळवत आहे. जेव्हा राहुल सखारामला पुन्हा हसायला सांगतो तेव्हा त्याचे वडील उत्तर देतात की तुझ्या या गुण्हेगारीमुळे त्याचा आनंद हिरावून घेतला आहे, त्याला गण्हेगारी सोडण्यास सांगतात. अखेर, प्रतिस्पर्धी टोळ्या राहुलचा पराभव करण्यासाठी एकत्र येतात. राहुलची टोळी कमकुवत होत जाते आणि गन्यासह त्याच्या टोळीतील अनेकजण मारले जातात.
चित्रपट वर्तमान काळात बदलतो जिथे राहुल प्रतिस्पर्धी टोळ्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने ज्या मुलाशी मैत्री केली त्याच्याकडून मदत मागितली असता, तोच मुलगा मन्या त्याच्यावर अचानक गोळ्या झाडतो. राहुलचा मृत्यू होताच, त्यावेळी राहुलला कळते की मुलाच्या कुटुंबाने त्यांची जमीन राहुलच्या टोळीमुळे गमावली आणि त्या मुलाने त्याच्या हत्येची योजना आखली होती. राहुलच्या मृत्यूची बातमी ऐकून शेवटी त्याच्या वडिलांना हसू फुटले, शेवटी आपला मुलगा आता गुंड नाही हे कळल्याचा आनंद त्यांना मिळाला.[१]
कलाकार
संपादन- ओम भुतकर - राहुल पाटील उर्फ "राहुल्या"/बकासुर च्या भूमिकेत
- क्षितीश दाते - गन्या राहुलचा जोडीदार
- मोहन जोशी - राहुलचे वडील सखाराम पाटील यांच्या भूमिकेत
- सविता मालपेकर - धुरपी पाटील, राहुलच्या आईच्या भूमिकेत
- दिप्ती धोत्रे - राहुलची बहीण मंगल पाटीलच्या भूमिकेत
- प्रवीण तरडे - नन्या विठ्ठल तरडे उर्फ नन्याभाईच्या भूमिकेत
- उपेंद्र लिमये - इन्स्पेक्टर विठ्ठल कडू च्या भूमिकेत
- महेश मांजरेकर - शिरप्या दामू शेडगे, दिपालीच्या वडिलांच्या भूमिकेत
- मालविका गायकवाड - दिपालीच्या भूमिकेत, राहुलची आवड
- सुनील अभ्यंकर - वकीलाच्या भूमिकेत
- सुरेश विश्वकर्मा - उदयच्या भूमिकेत
- देवेंद्र गायकवाड - दयाभाई च्या भूमिकेत
- रमेश परदेशी - पिट्याभाई भाईच्या भूमिकेत
- अजय पुरकर - बिल्डर शिंदेच्या भूमिकेत
- ? - मन्या उर्फ मनोहर धोंडीराम कांबळेच्या भूमिकेत
संगीत
संपादनगीत | गायक | संगीत | गीतकार | अवधी | |
---|---|---|---|---|---|
१ | आराराss राss राss | आदर्श शिंदे | नरेंद्र भिडे | प्रनीत कुलकर्णी | ३ः५१ |
२ | ऊन ऊन व्हटातून | अवधुत गुप्ते, वैशाली माडे | नरेंद्र भिडे | प्रनीत कुलकर्णी | ४ः४९ |
३ | पाणी पाणी | सायली खारे | नरेंद्र भिडे | प्रनीत कुलकर्णी | २ः५८ |
४ | आभाळा | सौरभ साळुंके | नरेंद्र भिडे | प्रनीत कुलकर्णी | २ः५६ |
एकूण | १४ः१४ |
निर्मिती
संपादनया चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत अभितीत भोसले जेन्युईन प्रोडक्शन एल.पी.जी. आणि पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा.ली. तर प्रस्तुकर्ते आहेत अभितीत भोसले जेन्युईन प्रोडक्शन एल.पी.जी. आणि किरण दगडे पाटील प्रोडक्शन.
प्रदर्शन
संपादनमुळशी पॅटर्न २३ नोव्हेंबर २०१८ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट सध्या झी५ (ZEE5) वर इंग्रजी सबटायटल्ससह उपलब्ध आहे.
प्रतिसाद
संपादनपहिल्या आठवड्यात चित्रपटाचे ३५८ हून अधिक चित्रपटगृहात ७५५ पेक्षा जास्त प्रयोग होते, सिनेमाने ३ दिवसातच ५ कोटींचा पल्ला गाठला होता. पहिल्या ११ दिवसात या सिनेमाने ११ कोटींची कमई केली होती. त्यावेळी रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाही ‘मुळशी पॅटर्नला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.[५]
पुन निर्मिती
संपादन२०२० मध्ये, तरडे यांनी हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांमध्ये रिमेक केला जात आहे आणि ते अभिनेता देव गिलसोबत काम करत असल्याचे उघड केले.[६] अँटिम: द फायनल ट्रुथ या नावाने हा चित्रपट हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला आणि 2021 मध्ये रिलीज झाला. अंतिमः द फाइनल ट्रुथ या नावाने हिंदी भाषेतील रिमेक २६ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना, सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमये यांनी भूमिका साकारल्या आहेत.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "मुळशी पॅटर्न". Maharashtra Times. 2022-04-18 रोजी पाहिले.
- ^ a b "अरे हा तर बुरशी पॅटर्न... 'अंतिम' चा ट्रेलर पाहून नेटकरी सुसाट, भन्नाट मीम्स वायरल". Maharashtra Times. 2022-04-18 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2021-11-26). "Antim : The Final Truth Review | 'मुळशी पॅटर्न' इतकाच मसाला सोबत सलमान भाईची दमदार अॅक्शन, वाचा कसा आहे 'अंतिम: द फायनल ट्रुथ'". TV9 Marathi. 2022-04-18 रोजी पाहिले.
- ^ "अंतिम - द फायनल ट्रुथ". Maharashtra Times. 2022-04-18 रोजी पाहिले.
- ^ "'मुळशी पॅटर्न'ने आतापर्यंत गाठला हा आकडा". 24taas.com. 2018-12-05. 2022-04-18 रोजी पाहिले.
- ^ "Mulshi Pattern to be remade in three south Indian languages - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-18 रोजी पाहिले.