उपेंद्र लिमये

भारतीय अभिनेता

उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ - हयात) हे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[]

उपेंद्र लिमये
उपेंद्र लिमये
जन्म उपेंद्र लिमये
८ मार्च, इ.स. १९७४
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी स्वाती
अपत्ये भैरवी आणि वेद
अधिकृत संकेतस्थळ http://upendralimaye.com

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांचा उदय झाला.

नाट्यक्षेत्रातील कारकीर्द

संपादन
  • अभिनय
    • अतिरेकी
    • आम्ही जातो आमुच्या गावा
    • कोण म्हणतो टक्का दिला
    • जळाली तुझी प्रीत
    • नियतीच्या बैलाला
    • येथे चेष्टेची मस्करी होते
  • दिग्दर्शन
    • आई शप्पथ
    • एके-४७
    • न दिलेला नकार
    • नियतीच्या बैलाला
    • सखी माझी लावणी
    • सती

दूरचित्रवाणी मालिका-अभिनय (कंसात दूरचित्रवाणी वाहिनीचे नाव)

संपादन
  • किमयागार (ई टीव्ही मराठी)
  • दामिनी (सह्याद्री)
  • नकाब (नॅशनल नेटवर्क)
  • भाग्यविधाता (ई टीव्ही मराठी)
  • ह्या गोजिरवाण्या घरात (ई टीव्ही मराठी)
  • या सुखांनो या (झी मराठी)
  • समांतर (ई टीव्ही मराठी)

चित्रपट कारकीर्द

संपादन
वर्ष नाव भाषा भूमिका नोंदी
१९९४ मुक्ता मराठी कार्यकर्ता
१९९५ बनगरवाडी मराठी शेखू
कथा दोन गणपतरावांची मराठी रोहिदास
१९९८ सरकारनामा मराठी सपकाळे
२००० कैरी मराठी देशपांडे गुरुजी
२००१ ध्यासपर्व / कल का आदमी मराठी / हिंदी प्रेस मालक
२००३ चांदनी बार हिंदी गोकुल
२००४ सावरखेड: एक गाव मराठी सुरश्या
२००५ पेज थ्री हिंदी इन्स्पेक्टर भोसले
२००६ जत्रा: ह्यालागाड रे त्यालागाड मराठी रामदास माळी
ब्लाइंड गेम मराठी करमचंद
शिवा हिंदी बापू
शिवपतीकरम तमीळ इन्स्पेक्टर
२००७ डार्लिंग हिंदी इन्स्पेक्टर रेड्डी
ट्राफिक सिग्नल हिंदी मन्या लंगडा
प्रणाली हिंदी सुल्तान
२००८ उरुस मराठी महादेव
सरकार राज (हिंदी चित्रपट) हिंदी कांतीलाल वोरा
कॉंट्रॅक्ट हिंदी गूंगा
२००९ मेड इन चायना मराठी कैलाश
जोगवा मराठी टप्प्या महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
२०१० मी सिंधुताई सपकाळ मराठी श्रीहरी
२०१०-११ धूसर मराठी अर्जुन
२०१०-११ महागुरू मराठी शंकर
२०११ माय नेम इज ३४० हिंदी ३४०
२०१३ कोकणस्थ मराठी गौतम
२०१४ गुणाजी मराठी गुणाजी
येल्लो मराठी स्विमिन्ग  कोच
२०१७ तु. का. पाटील [] मराठी

पुरस्कार

संपादन

[ संदर्भ हवा ]

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्यगौरव पुरस्कार, वर्ष : १९९६, नाटकः जळाली तुझी प्रीत
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - कालनिर्णय पुरस्कार, वर्ष: १९९६, नाटकः जळाली तुझी प्रीत
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, वर्ष: २००५, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - हमलोग पुरस्कार, वर्ष: २००५, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - राष्ट्रीय रत्‍न पुरस्कार, वर्ष: २००६, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - कलारंग पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: सरकार राज / ऊरुस
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शिवाजी गणेशन पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - व्ही. शांताराम पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - बाबुराव पेंटर पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - संकृती कलादर्पण पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा

आपल्या व्यवसायातील उत्तम कामगिरी

संपादन
  • महाराष्ट्र रत्‍न पुरस्कार, वर्ष: २०१०
  • निनाद पुरस्कार, वर्ष: २०१०

संदर्भ

संपादन
  1. ^ "'जोगवा'साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार". 31 January 2010. 2010-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 July 2010 रोजी पाहिले.
  2. ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/tukapatil-coming-soon/21086

बाह्य दुवे

संपादन