मी सिंधुताई सपकाळ

अनंत महादेवन यांचा २०१० मधला चित्रपट
(मी सिंधुताई सपकाळ (म‍राठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


मी सिंधुताई सपकाळ हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सिंधुताई सपकाळांच्या मी वनवासी नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. अनंत नारायण महादेवन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे.

मी सिंधुताई सपकाळ
मी सिंधुताई सपकाळ.jpg
मी सिंधुताई सपकाळ
दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन
निर्मिती बिंदिया खानोलकर
प्रमुख कलाकार तेजस्विनी पंडित
उपेंद्र लिमये
ज्योती चांदेकर
नीना कुलकर्णी
चारूशिला साबळे
संवाद संजय पवार
संगीत अशोक पत्की
पार्श्वगायन देवकी पंडित
सुरेश वाडकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित शुक्रवार, नोव्हेंबर १९ २०१०

कथानकसंपादन करा


खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते.

कलाकारसंपादन करा

चारूशिला साबळे

  • गणेश यादव
  • जयवंत वाडकर
  • प्रांजल शेट्ये

हेही पहासंपादन करा

या चित्रपटात खालील गीते आहेतसंपादन करा

  • हे भास्करा क्षितिजावरी या - देवकी पंडित, सुरेश वाडकर
  • कशी ही बोलकी झाली घरे - देवकी पंडित
  • माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार - देवकी पंडित
  • झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता - देवकी पंडित
  • इतकेच मला जाताना सरणावर कळले होते - देवकी पंडित


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.