सुरेश विश्वकर्मा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सुरेश रामसिंग विश्वकर्मा हे मराठी चित्रपटअभिनेते आहेत. यांनी सैराट या चिञपटातील तात्यासाहेब ही भूमिका विशेष गाजली आहे.
सुरेश विश्वकर्मा | |
---|---|
जन्म | सुरेश रामसिंग विश्वकर्मा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
मराठी नाटक मराठी चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | चालू |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट | फँड्री, सैराट, रेगे, मुळशी पॅटर्न, |
पत्नी | सौ.विद्या |
अपत्ये | कु.ओवी,कु.सुर्वी |
शिक्षण
संपादनप्राथमिक- जि.प.प्रा.शाळा. कडा कारखाना तालुका आष्टी. माध्यमिक-जयभवानी विद्यालय, जळगांव(कडा कारखाना) महाविद्यालयीन-आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा ता. आष्टी जिल्हा बीड
बालपण
संपादनकडा कारखान्यात वडील वॉचमन या पदावर कार्यरत होते.संपूर्ण बालपण कडा कारखान्यावर व्यतीत झाले.त्यामुळे कडा कारखान्याविषयी मनात विशेष जिव्हाळा आहे.अजुनही ‛कडा कारखान्यावरचा सुरेश’ म्हणून घ्यायला त्यांना आवडते.
अभिनय व कारकीर्द
संपादन- पहिला अभिनय-जयभवानी विद्यालयात आठवीला शिक्षण घेत असताना श्रीरंग बोराडे लिखित-दिग्दर्शित ‛अंधार अंधार चोहीकडे अंधार’ ही एकांकिका केली.त्यात ‛राजा’ची भूमिका केली.सर्वांनी त्या भूमिकेमुळे खुप कौतुक केले.अभ्यासात त्यांचे मन रमत नव्हते.त्यांना सतत अभिनय करावा असे वाटायचे. त्याच कोवळ्या वयात त्यांनी निर्णय घेतला कि मोठं होऊन मला अभिनेताच व्हायचे आणि त्या निर्णयापासुन आजपर्यंत यत्किंचितही डळमळीत झाले नाही व कुटुंबीयांनी त्यांना कधीच माझा विरोध केला नाही(घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असूनही).
- पुढचा टप्पा-महाविद्यालयात गेल्यानंतर ते सतत अभिनय करण्याच्या शोधात होते.तिथे आधी त्यांनी एक एकपात्री केली ‛पण आपण रडलो नाय बुवा’. त्या एकपात्रीचं सर्वांनी खूप कौतुक केले.साहजिकच पुढचा टप्पा म्हणुन मी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते सरांकडे गेले. महाविद्यालयात स्नेहसंमेलन करण्यासाठी.सरांनीही परवानगी दिली आणि त्यावर्षी पहिलं नाटक झाले. प्रा.मधुकर तोरडमल लिखित तरुण तुर्क म्हातारे अर्क. त्यात मी ‛प्रा.बारटक्के’ ही अभिनयाच्या दृष्टीने अवघड मानली जाणारी पन्नाशीच्या प्राध्यापकाची भूमिका वयाच्या सतराव्या वर्षी केली.मग मोरूची मावशी मध्ये ‛बंड्यामावशी’,या घर आपलंच आहे,दिनुच्या सासुबाई राधाबाई,प्रेम चालु आहे,खंडोबाचं लगीन,यदा कदाचित इ.अनेक नाटकांत भूमिका केल्या,दिग्दर्शन केले.मग ‛आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवा’त सहभाग घेऊन ‛लोकनाट्य’ या कलाप्रकारात ‛प्रथम’ क्रमांक पटकावला. तिथुन पुढे चार वेळा हे बक्षीस पटकावलं. मग देवीभोयरे(पारनेर) इथे होणाऱ्या राज्यस्तरीय(ग्रामीण) नाट्य स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम व तिसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांक पटकावला.धोंडे कॉलेजनेत्यांना वेळोवेळी वेगवेगळं व्यासपीठ उघड करून दिले.एक कलाकार म्हणुन मी जास्त समृद्ध होत गेलो आणि याला कारणीभुत होता एक अवलिया,प्रा.डॉ.विजय दिनकर पोकळे. महाविद्यालयीन काळापासून ते आजपर्यंत ते पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.ना स्वतः डगमगलाना मला डगमगु दिलं.कुठल्याही मुलाला झेप घेण्याच्या तयारीत असताना ‛काळजी करू नकोस..मी आहे’ हे वाक्य बोळणार कुणीतरी हवं असतं.आणि ते काम पप्पांनी (पोकळे सर) खुप लीलया केलं.. आणि धोंडे कॉलेजचे प्राचार्य विधाते सरांपासून ते शिपायांपर्यंत सर्वांनी वेळोवेळी मला खुप प्रोत्साहित केलं.वेगवेगळे दिग्दर्शक,मार्गदर्शक या महाविद्यालयीन जीवनादरम्यान माझ्या आयुष्यात आले..या प्राध्यापकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मला अधिक समृद्ध होण्यास मदत केली. या वेळचे मित्र-मैत्रिणी..आणि भगिनींनी दिलेलं ‛भैय्या’ हे नाव कायम माझ्या काळजापाशी राहील.
तर यानंतर विद्यापीठात नाट्यशास्राला प्रवेश घेतला. तिथे बी.डी.1ला असताना टॅक्स फ्री,चाहूल,खंडोबाचं लगीन,लोककथा 78,सूर्य कि अंतिम किरणसे सूर्य कि पहेली किरण तक या नाटकांमधुन मुख्य भूमिका केल्या..बी.डी.1ला तिथे पहिला आलो.पण पुढे तिथे रमलो नाही..आणि निघालो पुण्या-मुंबईच्या दिशेने..जे स्वप्न आजवर पाहिलं ते स्वप्न जगायला..परंतु हा प्रवास सोपा नव्हता..प्रचंड खडतर प्रवास..
- मुंबई-मायानगरी..आधी मुंबईला गेलो.तिथे गेल्यावर काहीच कळेना..काय करावं,कुणाला भेटावं..?? अक्षरशः रडकुंडीला येत होतो..खेड्यातुन शहरात गेल्यावर आपलं स्ट्रगल 5 पटीनं वाढतं..आपलं राहणीमान,भाषा,व्यक्तिमत्त्व, खायचं काय,रहायचं कुठं..? या सगळ्या पातळ्यांवर झगडत असताना एका मित्राच्या सहकार्याने आयुष्यातील पहिली सिरिअल मिळाली..‛सारीपाट हा संसाराचा’..काही दिवस काम मिळालं..पण पुढे पहिले पाढे पंचावन्न...काय करावं काहीच सुचत नव्हतं..पण या दरम्यान मी सतत स्वतःला बजावत होतो ‛इथुन गावी रिकाम्या हाताने परत जायचं नाही’...[१]
पुणे-...मुंबई काही जुळली नाही..म्हणुन एका खुप जवळच्या मित्राकडे पुण्याला आलो.एका सेवाभावी संस्थेच्या पथनाट्याच्या दिग्दर्शनाचं काम करत होतो..दरम्यान आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं..‛फकिरा’ या सिनेमाचं ऑडिशन दिलं..त्यात एका छोट्याशा भुमिकेसाठी निवड झाली..मग त्यांनी कलाकारांच्या तोंडी ग्रामीण भाषा रुळावी म्हणुन वर्कशॉप घेतलं..त्यात माझी प्रगती पाहुन माझी सिनेमातला सेकंड लीड असलेल्या सावळा या भुमिकेसाठी दिपक रेगे व सुनील नाईक यांनी निवड झाली..सिनेमा अर्धवट राहिला.पण या सिनेमामुळे मला विनय आपटे,अरुण नलावडे,सुहास पळशीकर,राहुल सोलापुरकर यांसारख्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली..प्रवीण तरडे सारखा मित्र मिळाला..समर्थ अकॅडमी सारखा मित्रांचा ग्रुप मिळाला..ज्यांनी सुरेश भैय्याचा सुरेश भाई केला..प्रचंड स्ट्रगल चालुच होतं पण मित्रांच्या सोबतीने ते थोडं सुसह्य झालं..मग मिळेल ते काम करत गेलो..सिरिअल,नाटक, स्किट,पथनाट्य जे जे येईल ते..पण म्हणावी अशी संधी येत नव्हती..आली तरी पुर्णत्वाला जात नव्हती..दरम्यान महिमा खंडोबाचा,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,गोष्ट छोटी डोंगरएवढी,अजब लग्नाची गजब गोष्ट,मोहिनी,अरे आवाज कुणाचा इ. चित्रपटात तर कुंकू,अग्निहोत्र, अर्धांगिनी, कृपासिंधु,अनोळखी, बंदीशाळा,यु आर अंडरअरेस्ट इ. मालिकांमधुन छोट्या-मोठ्या भूमिका करत होतो.. मग एक दिवस नागराज मंजुळेंशी भेट झाली..पहिल्याच भेटीत चांगले विचार जुळले..मैत्री झाली.आणि ‛फँड्री’ या सिनेमात पाटील ही भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्याच दरम्यान प्रवीण तरडेमुळे अभिजित पानसे दिग्दर्शित ‛रेगे’ सिनेमात अन्या छपऱ्या ही भूमिका साकारता आली..आणि रेगे या सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक रवी करमरकर यांनी ‛होणार सुन मी या घरची’ या मालिकेत विलास माने ही भूमिका दिली..दरम्यान या कामांमुळे बऱ्यापैकी ओळख निर्माण झाली होती..त्यातुन नवे मित्र जुळत गेले (या संपूर्ण लेखादरम्यान मी एकाही मित्राच्या नावाचा उल्लेख केलेला नाही..कारण या प्रवासादरम्यान इतक्या मित्रांनी वेळोवेळी मदत केलीये कि एकाचं नाव घेणं दुसऱ्यावर अन्याय होईल..धन्यवाद मित्रांनो..)
- सैराट-आणि याच दरम्यान नागराज मंजुळेंचा फोन आला..भेटलो.सैराट बद्दल चर्चा झाली आणि मी तात्यासाहेब पाटील झालो...शुटिंग दरम्यान खुप चांगल्या गोष्टी अनुभवायला, शिकायला मिळाल्या.आज नागराजजींच्या एखाद्या सिनेमात उभं असणं किंवा त्या सिनेमाचा टेक्नीकली भाग असणं कलाकारांसाठी पर्वणी समजली जाते..तिथे त्यांच्या फँड्री व सैराट अशा दोन सिनेमात मी आहे..हि नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.सध्या सैराटने संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय.‛कुणाच्या बुडाखाली किती अंधाराय’..हा माझा डायलॉग गाजतोय.. आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालंय.मज्जा येतेय..पण जबाबदारीही वाढली आहे..आठवीला केलेल्या ‛अंधार अंधार चोहीकडे अंधार’ एकांकिकेपासुन सुरू केलेला प्रवास ‛सैराट’ पर्यंत येऊन पोहचलाय..आता खऱ्या अर्थानं प्रवासाला सुरुवात झालीये.....