माराकाना स्टेडियम

(माराकान्या या पानावरून पुनर्निर्देशित)

माराकान्या (पोर्तुगीज: Estádio do Maracanã) हे ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरो शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १९५० फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याकरिता १,९९,८५४ इतक्या प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सध्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता ८२,२३८ इतकी आहे.

माराकान्या
Maracanã Stadium in Rio de Janeiro.jpg
पूर्ण नाव Estádio Jornalista Mário Filho
स्थान रियो दि जानेरो, रियो दि जानेरो, ब्राझिल
उद्घाटन १६ जून १९५०
पुनर्बांधणी १९९२, १९९९, २००३, २००६
बांधकाम खर्च २० कोटी युरो
आसन क्षमता ८५,०००
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९५० फिफा विश्वचषक
२०१४ फिफा विश्वचषक
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

पुनर्बांधणीनंतर हे स्टेडियम २०१३ मध्ये फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी पुन्हा खुले करण्यात आले.. माराकान्यामध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जातील. तसेच रियोमध्ये घडणाऱ्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी माराकान्या हे प्रमुख स्टेडियम असेल.

२०१४ विश्वचषकसंपादन करा

तारीख वेळ संघ #1 निकाल संघ #2 फेरी प्रेक्षक
जून 15, 2014 19:00   आर्जेन्टिना 2–1   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना गट फ 74,738
जून 18, 2014 16:00   स्पेन 0–2   चिली गट ब 74,101
जून 22, 2014 13:00   बेल्जियम 1–0   रशिया गट ह 73,819
जून 25, 2014 17:00   इक्वेडोर 0–0   फ्रान्स गट इ 73,750
जून 28, 2014 17:00   कोलंबिया 2–0   उरुग्वे १६ संघांची फेरी 73,804
जुलै 4, 2014 13:00   फ्रान्स 0–1   जर्मनी उपांत्यपूर्व फेरी 74,240
जुलै 13, 2014 16:00   जर्मनी 1–0 (अतिरिक्त वेळ)   आर्जेन्टिना अंतिम सामना 74,738

बाह्य दुवेसंपादन करा