माँतपेलिए
अमेरिकेचे राज्य व्हरमॉंटची राजधानी याकरिता पाहा मॉंतपेलिए, व्हरमॉंट.
मॉंतपेलिए (फ्रेंच: Montpellier; लेखनभेद: मॉंपेलिये) ही फ्रान्समधील लांगूदॉक-रोसियों ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मार्सेल व नीस खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती.
मॉंतपेलिए Montpellier |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | लांगूदॉक-रोसियों | |
विभाग | एरॉ | |
क्षेत्रफळ | ५६.८८ चौ. किमी (२१.९६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८९ फूट (२७ मी) | |
लोकसंख्या (२०११) | ||
- शहर | २,६४,५३८ | |
- घनता | ४,६५१ /चौ. किमी (१२,०५० /चौ. मैल) | |
- महानगर | ५,४२,८६७ | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
montpellier.fr |
लीग १ ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगमध्ये खेळणारा मॉंपेलिये एच.एस.सी. हा क्लब येथेच स्थित आहे. येथील स्ताद देला मोसॉं ह्या स्टेडियममध्ये १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवले गेले होते.
जुळी शहरे
संपादन
|
बाहय् दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |