मंडी
हिमाचल प्रदेशातील एक शहर
(मंडी, हिमाचल प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
मंडी हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याच्या मंडी ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. हिमालय पर्वतरांगेत बियास नदीच्या काठावर वसलेले मंडी हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलापासून ११५ किमी, मनालीपासून १०७ किमी तर चंदीगढपासून २०० किमी अंतरावर स्थित आहे. १६व्या शतात वसवले गेलेले मंडी शहर मंडी संस्थानाच्या राजधानीचे शहर होते. २०११ साली मंडीची लोकसंख्या सुमारे २६,००० होती.
मंडी | ||||||
भारतामधील शहर | ||||||
देश | भारत | |||||
राज्य | हिमाचल प्रदेश | |||||
जिल्हा | मंडी | |||||
स्थापना वर्ष | इ.स. १५२७ | |||||
समुद्रसपाटीपासुन उंची | २,४९० फूट (७६० मी) | |||||
लोकसंख्या (२०११) | ||||||
- शहर | २६,४२२ | |||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
कुलु येथील भुंतार विमानतळ हा येथील सर्वात जवळचा विमानतळ तर कांगडा खोरे रेल्वेमार्गावरील सर्वात शेवटचे स्थानक जोगिंदरनगर येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. अमृतसर ते लेहदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ३ मंडीमार्गे जातो. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मंडी (आयआयटी मंडी) ही शैक्षणिक संस्था मंडीमध्येच आहे.