भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस

भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस भुवनेश्वर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १८०० किमी अंतर २५ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.

भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसचा फलक

मार्ग संपादन

भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत:

  • 22811/22812 भुवनेश्वर ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून तीनदा अद्रामार्गे धावते.
  • 22823/22824 भुवनेश्वर ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून चारदा बोकारोमार्गे धावते.
22811 / 22812 भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
BBS भुवनेश्वर 0
CTC कटक 28
JJKR जाजपूर 100
BHC भद्रक 144
BLS बालेश्वर 206
KGP खरगपूर 324
BQA बांकुरा 439
ADRA अद्रा 492
KQR कोडर्मा 658
GAYA गया 734
MGS मुघलसराई 937
CNB कानपूर सेंट्रल 1284
NDLS नवी दिल्ली 1723

22823 / 22824 भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
BBS भुवनेश्वर 0
CTC कटक 28
BHC भद्रक 144
BLS बालेश्वर 206
KGP खरगपूर 324
TATA टाटानगर 458
BKSC बोकारो स्टील सिटी 609
KQR कोडर्मा 735
GAYA गया 811
MGS मुघलसराई 1014
CNB कानपूर सेंट्रल 1361
NDLS नवी दिल्ली 1800

बाह्य दुवे संपादन