भारतीय रेल्वे इंजिने

भारतीय रेल्वे इंजिने भारतातील रेल्वेमार्गांवर प्रवासी व सामानाचे डबे ओढणारी वाहने आहेत. ही विद्युत व डीझेलवर चालणारी असतात. जागतिक वारसा जाहीर झालेल्या मार्गांवर अगदी मर्यादित प्रमाणात सोडून वाफेवरची इंजिने आता वापरली जात नाहीत.

न्यू जलपाईगुडी शेडचे WDP4 बाझ इंजिन

वर्गीकरणसंपादन करा

भारतातील रेल्वे इंजिनांचे वर्गीकरण रुळांतील रुंदी (गेज), इंधन, वापराचा प्रकार आणि शक्ती किंवा मॉडेल क्रमांकाच्या आधारवर करण्यात येतो. इंजिनांच्या वर्गनावांवरूनच ही सगळी माहिती कळून येते. ही नावे सहसा ४ किंवा ५ अक्षरांची असतात पहिले अक्षर गेज, दुसरे इंधन तर तिसरे अक्षर वापराचा प्रकार दर्शवते.

चौथे अक्षर इंजिनांचा मॉडेल क्रमांक दर्शवित असे. २००२पासून नवीन डीझेल इंजिनांच्या वर्गनावातील चौथे अक्षर त्यांची हॉर्सपॉवर क्षमता दर्शवते. विद्युत इंजिनांना तसेच काही (जुन्या) डीझेल इंजिनांना हा नियम लागू होत नाही.

काही वर्गनावांत पाचवे अक्षर असते. सहसा हे अक्षर उपवर्ग किंवा उपप्रकार दर्शवते. नवीन वर्गवारीनुसार पाचवे अक्षर इंजिनाची हॉर्सपॉवर क्षमता अधिक स्पष्ट करते - उदा. A हे मूळ हॉर्सपॉवरमध्ये १०० अधिक असल्याचे दर्शवते, B २०० ह़ॉर्सपॉवर, C ३००, इ. त्यानुसार WDM-3A इंजिनाची शक्तीक्षमता ३,१०० हॉर्सपॉवर आहे तर WDM-3Fची ३,६००.

वाफेच्या इंजिनाना ही वर्गवारी लागू होत नाही. सध्या वापरात असलेल्या काही वाफेच्या इंजिनांची वर्गवारी पूर्वी प्रमाणेच करण्यात येते. त्यानुसार M हे वाफेचे मिश्र वापराच्या इंजिनांचा वर्ग आहे तर WP हा प्रवासी सेवेतील वाफेच्या इंजिनांचा वर्ग आहे.

वर्गीकरणाची पद्धतसंपादन करा

 
एक्सप्रेस गाडी

पहिले अक्षर (गेज)

दुसरे अक्षर (इंजिन प्रकार)

 • D-डीझेल
 • C-डी.सी. विद्युत
 • A-ए.सी. विद्युत
 • CA-डी.सी. आणि ए.सी. विद्युत (वर्गीकरणात CA हे एकच अक्षर धरले जाते)
 • B-बॅटरी

तिसरे अक्षर (वापर)

 • G-सामान वाहतूकीसाठी
 • P-प्रवासी
 • M-मिश्र
 • S-शंटिंग
 • U-ई.एम.यू.
 • R-रेलकार

उदा - WDM 3A:

WAP 5:

 • "W" - ब्रॉड गेज
 • "A" - ए.सी. विद्युत
 • "P" - प्रवासी वाहतूकीसाठी
 • "5" - या प्रकारच्या इंजिनांचा मॉडेल क्रमांक ५वा होता

ब्रॉड गेज (१,६७६ मिमी, ५ फूट ६ इंच)संपादन करा

डीझेलवर चालणारी इंजिनेसंपादन करा

 
पुणे शेड[मराठी शब्द सुचवा]चे WDM3A इंजिन
 
एन्नोर येथे दिसलेले ११००८ क्रमांकाचे WDM-7 इंजिन

मिश्र कामासाठी वापरली जाणारी इंजिनेसंपादन करा

 • WDM-1 - भारतातील मुख्य प्रवासी मार्गांवर वापरले गेलेले पहिले डीझेल इंजिन. १९५७मध्ये प्रथम वापर. आता वापरात नाही. १,९५० हॉर्सपॉवर.
 • WDM 2 १९६२पासून वापरात असलेले भारतीय रेल्वेमार्गांवरील सगळ्यात जास्त वापरले जाणारे इंजिन. भारतात बनविले गेलेले पहिले डीझेल रेल्वे इंजिन. २,७००पेक्षा अधिक इंजिने तयार करण्यात आली आहेत. २,६०० हॉर्सपॉवर.
 • WDM-2A, WDM-2B - WDM-2 पासून तांत्रिकदृष्ट्या थोडे वेगळे असलेले उपप्रकार.
 • WDM-3 - हायड्रॉलिक ट्रान्समिशन [मराठी शब्द सुचवा] असलेले सध्या वापरात नसलेली इंजिने. फक्त ८ आयात केली गेली होती.
 • WDM-3A - WDM-2चा उपप्रकार. WDM-3पेक्षा वेगळा. ३,१०० हॉर्सपॉवर.
 • WDM-3C, WDM 3D - WDM-3Aचे जास्त शक्ती असलेले उपप्रकार
 • WDM 4 - जनरल मोटर्सकडून आयात केलेली इंजिने. जनरल मोटर्सने तंत्रज्ञान भारतीय रेल्वेला देण्यास नकार दिल्याने आयात व उत्पादन बंद केले गेले.
 • WDM 6 - १,२०० हॉर्सपॉवर असलेल्या या प्रकाराचे फक्त दोन नग अस्तित्वात आले. पैकी एक श्रीलंकेतील पुट्टलाम सिमेंट फॅक्टरीत वापरात आहे.
 • WDM 7

प्रवासी इंजिनेसंपादन करा

 • WDP-1
 • WDP-2 - १९९८पासून वापरात असलेले इंजिन. आता WDP-3A म्हणून पुनर्वर्गीकृत. ३,१०० हॉर्सपॉवर.
 • WDP-3 - WDP-1चे प्रोटोटाइप[मराठी शब्द सुचवा]. प्रवासी सेवेत कधीच वापरले गेले नाहीत.
 • WDP-4 - डीझेल-विद्युत इंजिन. ४,००० हॉर्सपॉवर शक्ती असलेले WDG-4चे प्रवासी सेवेसाठीचा प्रकार.

सामानवाहतूकीसाठीची इंजिनेसंपादन करा

 
हाय-टेक स्टेशन, हैदराबाद येथे दिसलेले १२०४९ क्रमांकाचे WDG-4 इंजिन
 • WDG-2 - WDM-2ची सुधारित आवृत्ती. WDG-3A म्हणून पुनर्वर्गीकृत.
 • WDG-3B, WDG 3C, WDG 3D - WDG-2/WDG-3Aच्या सुधारित आवृत्ती.
 • WDG-4 - जनरल मोटर्सकडून सुरुवातीस १९९९मध्ये आयात केलेली इंजिने. २००२पासून भारतात उत्पादन सुरू. ४,००० हॉर्सपॉवर.

शंटिंग[मराठी शब्द सुचवा]साठी वापरली जाणारी इंजिनेसंपादन करा

 
दिल्ली स्थानकात WDS-4 शंटिग इंजिन
 • WDS-1 - १९४४-४५मध्ये आयात केलेली इंजिने. आता वापरात नाहीत. ३८६ हॉर्सपॉवर.
 • WDS-2 - आता वापरात नाहीत.
 • WDS-3 - या प्रकारची सगळी इंजिने १९७६-७८मध्ये पुनर्बांधणी करून WDS-4C म्हणून पुनर्वर्गीकृत केली गेली. ६१८ हॉर्सपॉवर.
 • WDS 4,WDS 4A,WDS 4B,WDS 4D - चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळेने तयार केलेली इंजिने. ६००-७०० हॉर्सपॉवर.
 • WDS 4C - पुनर्बांधणी केलेली WDS-3 इंजिने.
 • WDS 5
 • WDS 6
 • WDS 8

नोंद: भारतात विद्युत शंटिंग इंजिने वापरली जात नाहीत.

डी.एम.यू.संपादन करा

भारतात काही मार्गांवर डीझेल मल्टिपल युनिट सेवा आहे. डीझेल-विद्युत प्रकारची इंजिने DEMU तर डीझेल-हायड्रॉलिक प्रकारची इंजिने DHMU वर्गांत मोडतात. याशिवाय काही मार्गांवर डीझेल इंजिने असलेल्या रेलबसही सेवारत आहेत.

डीसी विद्युत इंजिनेसंपादन करा

या प्रकारची इंजिने फक्त मुंबई-विरार, मुंबई-पुणे व मुंबई-इगतपुरी मार्गांवर वापरात आहेत. काही वर्षांत ही इंजिने वापरातून नाहीशी होतील.

मिश्र वापराची इंजिनेसंपादन करा

 • WCM 1 - C0-Co चाके असलेली पहिली भारतात वापरात आलेली पहिली विद्युत इंजिने.
 • WCM 2
 • WCM 3
 • WCM 4
 • WCM 5 - चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळेने बांधलेली पहिली भारतीय डीसी इंजिने. यांपैकी पहिल्या इंजिनाला लोकमान्य असे नाव दिले गेले. ३,७०० हॉर्सपॉवर.
 • WCM 6 - ५,००० हॉर्सपॉवर शक्तीचे कार्यक्षम इंजिन.

प्रवासी इंजिनेसंपादन करा

 • WCP-1,WCP-2 - पूर्वीची ग्रेट इंडियन पेनिनस्युलर रेल्वेची EA/1 आणि EA/2 वर्गातील इंजिने. भारतातील सर्वप्रथम विद्युत इंजिने. पैकी पहिल्या इंजिनाला सर रॉजर लुमनी असे नाव दिले गेले. हे इंजिन आता नवी दिल्लीतील राष्ट्रीय रेल संग्रहालयात ठेवलेले आहे. २,१६० हॉर्सपॉवर
 • WCP-3,WCP-4 - जी.आय.पी.ची EB/1 आणि EC/1 वर्गांतील इंजिने.
 
The New Delhi Metro railway

सामान वाहतूकीची इंजिनेसंपादन करा

 • WCG-1 - जी.आय.पी.ची EF/1 वर्गातील इंजिने. १९२८मध्ये स्विस लोकोमोटिव्ह वर्क्सकडून आयात केलेल्या व मगरीसारख्या दिसणाऱ्या या इंजिनांना क्रॉकोडाइल इंजिन म्हणले जाते. पैकी पहिल्या इंजिनाला सर लेस्ली विल्सन असे नाव दिले गेले व हे आता नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रेल संग्रहालयात आहे. २,६००-२,९५० हॉर्सपॉवर.
 • WCG 2 - १९७०मध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळेने तयार केलेली इंजिने.

ई.एम.यू.संपादन करा

 • WCU 1 - WCU 15 - मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये वापर.

एसी विद्युत इंजिनेसंपादन करा

 
भुसावळ येथे असलेले WAG-5A

मिश्र वापराची इंजिनेसंपादन करा

 • WAM-1 - १९५९मध्ये प्रथम वापरलेली इंजिने. आता वापरात नाहीत. ३,०१० हॉर्सपॉवर.
 • WAM-2
 • WAM-3
 • WAM 4 - १९७०मध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळेने तयार केलेली शक्तिशाली इंजिने. भारतीय रेल्वेतील सर्वाधिक वापरातील इंजिनांपैकी एक. ३,८५० हॉर्सपॉवर.

प्रवासी इंजिनेसंपादन करा

 
WAP4
 • WAP-1 - १९७०मध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळेने सुरुवातीस कोलकाता-दिल्ली राजधानी एक्सप्रेससाठी तयार केलेले शक्तिशाली इंजिन. ३,९०० हॉर्सपॉवर.
 • WAP-2 - आता वापरात नाही.
 • WAP-3 - आता वापरात नाही.
 • WAP-4 - WAP-1ची सुधारित आवृत्ती. ५,३५० हॉर्सपॉवर.
 • WAP-5 - १९९५मध्ये स्वित्झर्लंडहून आयात केलेली इंजिने. नामांकित जलद गाड्यांवर वापर. ५,४५० हॉर्सपॉवर.
 • WAP-6 - आता वापरात नाही.
 • WAP-7 - WAG-9च्या गियर रेशियो[मराठी शब्द सुचवा]मध्ये बदल केलेला वर्ग. ६,२५० हॉर्सपॉवर.

सामान वाहतूकीची इंजिनेसंपादन करा

 
व्याघ्रमुख WAG-7
 • WAG-1
 • WAG-2
 • WAG-3
 • WAG-4
 • WAG-5 - भारतात सगळ्यात जास्त वापरात असलेले विद्युत इंजिन. १,१००पेक्षा जास्त तयार करण्यात आली. ३,८५० हॉर्सपॉवर.
 • WAG-5A,WAG 5B - WAG-5मध्ये तांत्रिक बदल असलेली इंजिने.
 • WAG-6A - हिताचीकडून आयात केलेली इंजिने. ६,११० हॉर्सपॉवर.
 • WAG-6B,WAG 6c - (Variants of WAG 3A. All rated at 6110 hp)
 • WAG-7 - ५,००० हॉर्सपॉवर.
 • WAG 9 - WAP-7च्या गियर रेशियो[मराठी शब्द सुचवा]मध्ये बदल केलेला वर्ग. ६,३५० हॉर्सपॉवर.

ई.एम.यू.संपादन करा

 • WAU 1 ते WAU 4

दुहेरी विद्युत इंजिनेसंपादन करा

या प्रकारची इंजिने डी.सी. तसेच ए.सी. (एका वेळी एकच) विद्युतप्रवाहावर चालू शकतात. मुंबई व आसपासच्या परिसरात रेल्वेवर डी.सी. विद्युतप्रवाह आहे तर भारतातील इतर ठिकाणी ए.सी. इंजिन न बदलता गाड्या मुंबईच्या आतबाहेर करता याव्या हीच या प्रकारची इंजिने तयार करण्यामागची प्रेरणा होती. ही इंजिने मुख्यत्वे मुंबई-भुसावळ व मुंबई-वलसाड तसेच मुंबई-पुणे मार्गांवर वापरली जातात. डी.सी.-ए.सी. विद्युतप्रवाहातील बदल मुंबई-भुसावळ मार्गावर इगतपुरी स्थानकात तर मुंबई-वलसाड मार्गावर विरारजवळ होतो. मुंबई-पुणे मार्ग पूर्णपणे डी.सी. विद्युतप्रवाहावर आहे. काही काळाने या सगळ्या मार्गांवरील डी.सी. प्रवाह बदलून ए.सी. करण्याचा घाट घातलेला आहे.

 
WCAM3 at Kurla

मिश्र वापराची इंजिनेसंपादन करा

 • WCAM 1
 • WCAM 2


सामान वाहतूकीची इंजिनेसंपादन करा

मीटर गेज (१,००० मिमीसंपादन करा

डीझेल इंजिने (मिश्र वापर)संपादन करा

 • YDM 1
 • YDM 2
 • YDM 3
 • YDM 4
 • YDM 4A
 • YDM 5

विद्युत इंजिनेसंपादन करा

 
YAM1 प्रकारचे मीटर गेज विद्युत इंजिन
 • YCG 1 (चेन्नाई परिसरात वापरासाठी १९३० च्या सुमारास आयात)
 • YAM 1 (२००२ पर्यंत चेन्नाई परिसरात वापर. १,७४० हॉर्सपॉवर)

ई.एम.यू.संपादन करा

 • YAU class (१९२० च्या सुमारास वापरात आलेली भारतातील सर्वप्रथम ई.एम.यू. सेवा)

नॅरो गेज (मिश्र वापर)संपादन करा

डीझेल इंजिनेसंपादन करा

२ फूट ६ इंचसंपादन करा

 • ZDM 1
 • ZDM 2
 • ZDM 3 (नंतर बदल करून ZDM 4C प्रकारात आणली गेली)
 • ZDM 4
 • ZDM 4A
 • ZDM 4B, 4C, 4D
 • ZDM 5

२ फूटसंपादन करा

बॅटरी इंजिनेसंपादन करा

NBM 1 - १९८७मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडद्वारा उत्पादित.

नामांकित इंजिनेसंपादन करा

 • शक्ती : मायक्रोप्रोसेसर[मराठी शब्द सुचवा]चलित WDG-3A.
 • नवोदित: ३-फेझ[मराठी शब्द सुचवा] विद्युतप्रवाहावर चालणारे पहिले WAP-5 इंजिन.
 • नवयुग: WAP7 पैकी एक.
 • प्रबळ: लखनौ शेडचे एक WDM-3A
 • नव जागरण
 • नव शक्ती WAG-9 पैकी एक.
 • बाझ: २००११ आणि २००१२ क्रमांकाची WDP-4 इंजिने.
 • सुखसागर : BZA शेडचे २०४२० क्रमांकाचे WAM-4.
 • बाबा साहेब: GZB शेडचे WAP1.
 • गरुड: मायक्रोप्रोसेसर[मराठी शब्द सुचवा]चलित WDG-2 आणि WDG-2A इंजिने.
 • व्याघ्रमुख: दर्शनीभागावर चट्टेपट्टे असलेली WAG-7 इंजिने.

हेसुद्धा पाहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत