भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७
भारतीय क्रिकेट संघाने जुलै आणि सप्टेंबर २०१७ दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिकेआधी, संघ कोलंबो येथे दोन दिवसीय सराव सामन्यामध्ये खेळले.[४][५][६]
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७ | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | २१ जुलै – ६ सप्टेंबर २०१७ | ||||
संघनायक | दिनेश चंदिमल (कसोटी)[n १] उपुल तरंगा (ए.दि. आणि टी२०)[n २] |
विराट कोहली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिमुथ करुणारत्ने (२८५) | शिखर धवन (३५८) | |||
सर्वाधिक बळी | नुवान प्रदीप (६) | रविचंद्रन अश्विन (१७) | |||
मालिकावीर | शिखर धवन (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲंजेलो मॅथ्यूज (१९२) | विराट कोहली (३३०) | |||
सर्वाधिक बळी | अकिला धनंजय (९) | जसप्रीत बुमराह (१५) | |||
मालिकावीर | जसप्रीत बुमराह (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिलशान मुनावीरा (५३) | विराट कोहली (८२) | |||
सर्वाधिक बळी | इसुरू उदाना (१) लसित मलिंगा (१) सेक्कुगे प्रसन्ना (१) |
युझवेंद्र चहल (३) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भा) |
महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.[७] परंतू, पहिल्या कसोटी आधी चंदिमलला न्युमोनिया झाल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[८] नंतर पहिल्या कसोटीसाठी रंगना हेराथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.[९] दुसऱ्या कसोटीसाठी चंदिमल कर्णधार म्हणून संघात परतला.[१०] भारताने कसोटी मालिका ३–० ने जिंकली. तीन किंवा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्यील हा भारताने परदेशात दिलेला पहिलाच व्हाईटवॉश.[११] तसेच १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडला ३-१ने हरविल्यानंतर हा भारतीय संघाने प्रथमच परदेशातील मालिकेत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला.[१२]
पलेकेले येथील दुसरा एकदिवसीय सामना हा श्रीलंकेचा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१३] भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसहीत, मालिका खिशात घातली हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा एकदिवसीय मालिकाविजय ठरला.[१४] आधी झिम्बाब्वे, बांगलादेश आणि नंतर भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळे, श्रीलंकेच्या निवडसमितीला राजीनामा देणे भाग पडले.[१५] भारताने एकदिवसीय मालिका ५–० अशी जिंकली आणि घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली.[१६] भारताने एकमेव टी२० सामना सुद्धा ७ गडी राखून जिंकला.[१७]
संघ
संपादनकसोटी | ए.दि. | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
श्रीलंका[१०][१८] | भारत[१९] | श्रीलंका[२०] | भारत[२१] | श्रीलंका[२२] | भारत[२१] |
- मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मालिकेआधी भारतीय कसोटी संघातून मुरली विजयला वगळण्यात आले आणि त्याची जागा शिखर धवनने घेतली.[२३]
- पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी असेला गुणरत्नेचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले.[२४]
- दुसऱ्या कसोटीसाठी लहिरु थिरिमन्ने आणि लक्षण संदाकन ह्यांचा श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला.[१०]
- दुसऱ्या कसोटी सामन्यात "धोकादायक पद्धतीने" चेंडू फेकून, एका सामन्याच्या बंदीसाठी पुरेसे दोष गुण मिळाल्यामुळे भारताच्या रविंद्र जडेजावर तिसऱ्या कसोटीसाठी बंदी घालण्यात आली.[२५] त्याच्याऐवजी अक्षर पटेलची निवड करण्यात आली.[२६]
- दुसऱ्या कसोटीदरम्यान उद्भवलेल्या पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेच्या रंगना हेराथला तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली.[२७]
- तिसऱ्या कसोटी साठी श्रीलंकेच्या संघात, दुश्मंत चमीरा आणि लहिरु गमागे यांचा समावेश करण्यात आला, तर दनुष्का गुणतिलकला वगळण्यात आले.[२८]
- एकदिवसीय मालिकेसाठी तिसऱ्या सामन्या आधी, दिनेश चंदिमल आणि लहिरु थिरिमन्ने यांची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली.[२९] त्यांची निवड दनुष्का गुणतिलक आणि उपुल तरंगा यांच्यासाठी गरज पडल्यात बदली खेळाडू म्हणून करण्यात आली.[२९]
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने तिसऱ्या आणि चवथा सामन्यातून तरंगाला वगळण्यात आले. तिसऱ्या सामन्यासाठी चामर कपुगेडेराची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली,[२९] परंतु पाठीचे दुखणे वाढल्याने उर्वरित सामन्यांतून त्याला वगळण्यात आले आणि चवथ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची सुत्रे लसित मलिंगाच्या हाती देण्यात आली.[३०]
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, दिनेश चंदिमलच्या उजव्या अंगठ्याला हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याने उर्वरित मालिकेतून त्याला वगळण्यात आले.[३१]
- चवथ्या सामन्याच्या आधी दिलशान मुनावीराची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली.[३२]
दौरा सामने
संपादनदोन-दिवसीय सामना: श्रीलंका अध्यक्षीय XI वि भारत
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२६–३० जुलै २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: हार्दीक पंड्या (भा) आणि दनुष्का गुणतिलक (श्री).
- रविचंद्रन अश्विनचा (भा) ५०वा कसोटी सामना.[३३]
- नुवान प्रदीपचे (श्री) कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[३४]
- हा भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय आणि श्रीलंकेचा कसोटी मधील धावांचा सर्वात मोठा पराभव.[३५]
२री कसोटी
संपादन३–७ ऑगस्ट २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: मालिंदा पुष्पकुमार (श्री).
- चेतेश्वर पुजाराचा (भा) ५० वा कसोटी सामना.[३६]
- रविंद्र जडेजा (भा) हा सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये १५० बळी घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला.[३७]
- श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेमध्ये भारताचा पहिल्यांदाच डावाने विजय.[३८]
३री कसोटी
संपादन१२–१६ ऑगस्ट २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- हार्दीक पंड्या हा पहिले प्रथम श्रेणी शतक कसोटीमध्ये झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. त्याने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात १०७ धावा केल्या. त्याने भारतीय फलंदाजातर्फे कसोटी क्रिकेटच्या एका सत्रातील सर्वाधिक ९९ धावांचा, विरेंद्र सेहवागने २००६ मध्ये रचलेला विक्रम मोडला.[३९]
- हार्दीक पंड्याने कसोटीमध्ये एका षटकात भारतीय फलंदाजातर्फे सर्वाधिक २६ धावा करण्याचा विक्रम केला.[३९]
- लक्षण संदाकनचे (श्री) कसोटीमध्ये प्रथमच पाच बळी.[४०]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- विश्व फर्नांडो (श्री) एकदिवसीय पदार्पण.
- लसित मलिंगाचा (श्री) २००वा एकदिवसीय सामना.[४१]
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- दोन डावांदरम्यान आलेल्या पावसामुळे भारतासमोर विजयासाठी ४७ षटकांमध्ये २३१ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- हा श्रीलंकेचा ८००वा एकदिवसीय सामना होता.[१३]
- अकिला धनंजयचे (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या पहिल्यांदाच ५ बळी.[४२]
- महेंद्रसिंग धोणी आणि भुवनेश्वर कुमारची नाबाद १०० धावांची भागीदारी ही भारतातर्फे कोणत्याही संघाविरुद्ध आठव्या गड्यासाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामधील सर्वोत्कृष्ट भागीदारी.[४२]
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- चामर कपुगेडेरा हा श्रीलंकेचा एकदिवसीय क्रिकेटमधील २०वा कर्णधार.[४३]
- जसप्रीत बुमराहचे (भा) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी.[१४]
४था एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: दिलशान मुनावीरा, मालिंदा पुष्पकुमार (श्री) आणि शार्दुल ठाकूर (भा).
- लसित मलिंगा हा श्रीलंकेचा एकदिवसीय क्रिकेटमधील २१वा कर्णधार.[३२]
- कारकीर्दीतील ३०० वा सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोणीने (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद (७३) राहण्याचा विक्रम मोडला.[४४][४५]
- एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत ३०० गडी बाद करणारा लसित मलिंगा हा श्रीलंकेचा चवथा गोलंदाज.[४६]
- हा श्रीलंकेचा घरच्या मैदानावरील धावांचा सर्वात मोठा पराभव.[४७]
५वा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० फलंदाजांना यष्टिचीत कर्णारा महेंद्रसिंग धोणी (भा) हा पहिलाच यष्टीरक्षक.[४८]
- भुवनेश्वर कुमारचे (भा) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[१६]
- विराट कोहलीचे (भा) ३० वे एकदिवसीय शतक.[१६]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादनएकमेव टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: अशन प्रियंजन (श्री).
- विराट कोहलीचा (भा) ५०वा टी२० सामना.[४९]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ मालिका सुरू होण्याआधी दिनेश चंदिमलची श्रीलंकेचा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. परंतू न्युमोनिया झाल्याने तो पहिल्या कसोटीत खेळू सकला नाही आणि त्याच्या ऐवजी रंगना हेराथकडे कर्णधारपदाची सुत्रे सोपवण्यात आली.
- ^ २र्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादली गेली. त्याच्या ऐवजी ३र्या सामन्यात चामर कपुगेडेराकडे कर्णधारपद दिले गेले, परंतू पाठीच्या दुखापतीमुळे ४थ्या सामन्यात लसित मलिंगाने संघाचे नेतृत्व केले.
- ^ "भविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत श्रीलंकेमध्ये ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना खेळणार". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताची पुढची परदेशातील कसोटी २६ जुलै रोजी गाली येथे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पंड्याची कसोटीत निवड, राहुलचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताचा श्रीलंका दौरा, २०१७". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कसोटीमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व चंदिमल करणार, तरंगाकडे एकदिवसीय आणि टी२० चे कर्णधारपद". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गाली कसोटीमधून चंदिमल बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध श्रीलंकेचे नेतृत्व हेराथकडे". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "एसएससी कसोटी साठी लाहिरु थिरिमानेचे परतला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "परदेशातील दुर्मिळ क्लिन स्विप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अश्विन, शमी लीड थ्री-डे राऊट ॲज इंडिया कम्प्लिट व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "श्रीलंकेला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी युवा खेळाडूंना प्रोत्साहन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारताचा श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा एकदिवसीय मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध पराभवानंतर श्रीलंकेच्या निवड समितीचा राजीनामा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "भुवनेश्वर, कोहलीमुळे भारताचा ५-० ने मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहली, पांडेच्या कामगिरीमुळे भारताचा ९-० स्विप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका कसोटीसाठी पंड्याचा संघात समावेश, राहुलचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय संघात थिसारा, सिरिवर्धना परतले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "श्रीलंका एकदिवसीय मालिकेतून युवराजला वगळले; अश्विन, जडेजाला विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेच्या बदललेल्या टी२० संघात व्हॅंडर्से, शनाका". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेसाठी विजय ऐवजी धवन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "गुणरत्ने भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "जडेजावर पलिकेले कसोटीसाठी बंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "जडेजाच्या जागी अक्षर पटेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पलिकेले कसोटीमधून हेराथला विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध तिसर्या कसोटी साठी चमीरा, गमागेची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "चंदिमल, थिरिमाने श्रीलंकेच्या संघात परतले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कपुगेडेरा मालिकेतून बाहेर; मलिंगा करणार नेतृत्व". इएसपीएन क्रिकइन्फो. १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चंदिमलच्या अंगठ्याला फ्रॅक्चर, भारताविरुद्ध मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "मालिका गमावली, विश्वचषकामधल्या खात्रीच्या जागेसाठी श्रीलंकेची धावपळ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आर अश्विन ५०वी कसोटी खेळणार". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "प्रदीपचे पाच बळी, परंतू भारताची धावसंख्या ५०० वर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय तर श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पुनरागमनासाठी राहुल सज्ज, मालिकाविजयाचे भारताचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "जडेजा बीट्स जॉन्सन, अश्विन बेटर्स हॅडली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताचा श्रीलंकेतील पहिल्यांदाच डावाने विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "पंड्याज स्प्रिंट बिफोर लंच" (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पंड्याज मेडन टन हेडलाईन्स १५-विकेट डे" (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लसित मलिंगा २०० व्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज, ३०० बळींपासून फक्त २ बळी दूर". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "धोनी, भुवनेश्वर धनंजयच्या ६ बाद ५४ पेक्षा सरस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेचा नवा कर्णधार, मालिका जिवंत ठेवण्याकडे लक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंडिया कूड टेस्ट बेंच स्ट्रेंग्थ इन फोर्थ ओडीआय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहली आणि रोहितची बहरणारी भागीदारी" (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीला बाद करुन लसित मलिंगाचे ३०० एकदिवसीय बळी पूर्ण". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मोठ्या विजयात कोहली, रोहितची शतके" (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि श्रीलंका: एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० फलंदाजांना यष्टीचीत करणारा धोनी पहिलाच यष्टिरक्षक". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकमेव टी२० सामन्यात भारताची सरस कामगिरी". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्यदुवे
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे | |
---|---|
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४ |