ब्रिस्टल
(ब्रिस्टॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रिस्टल (इंग्लिश: Bristol ही इंग्लंड देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख लोकसंख्या असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या तर युनायटेड किंग्डममधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
ब्रिस्टल Bristol |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
लिव्हरपूलचे इंग्लंडमधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
घटक देश | इंग्लंड |
प्रदेश | नैर्ऋत्य इंग्लंड |
स्थापना वर्ष | इ.स. ११५५ |
क्षेत्रफळ | ११० चौ. किमी (४२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३६ फूट (११ मी) |
लोकसंख्या (२०१४) | |
- शहर | ४,३२,५०० |
- घनता | ३,८९२ /चौ. किमी (१०,०८० /चौ. मैल) |
- महानगर | १०,०६,६०० |
प्रमाणवेळ | यूटीसी±००:०० |
इ.स. ११५५ साली शहराचा दर्जा मिळालेले ब्रिस्टल १३व्या ते १८व्या शतकांदरम्यान लंडन खालोखाल यॉर्क व नॉरविकसोबत इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचे शहर होते. औद्योगिक क्रांतीदरम्यान मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल इत्यादी शहरांची झपाट्याने प्रगती झाली व ब्रिस्टलचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीही सध्या ब्रिस्टल इंग्लंड देशामधील एक प्रगत व सुबत्त शहर आहे.
ब्रिस्टल विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
जुळी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |