बिजू पटनायक विमानतळ

(बिजु पटनाईक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBIआप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.

बिजू पटनायक विमानतळ
भुवनेश्वर विमानतळ
आहसंवि: BBIआप्रविको: VEBS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा भुवनेश्वर
समुद्रसपाटीपासून उंची १३८ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक) 20°14′40″N 085°49′04″E / 20.24444°N 85.81778°E / 20.24444; 85.81778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ४,५२४ १,३७९ डांबरी धावपट्टी
१४/३२ ७,३५९ २,२४३ डांबरी धावपट्टी

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा संपादन करा

ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे.

या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात.

भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी)

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन करा

विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एअरलाइन्स चेन्नई, दिल्ली, मुंबई
इंडिगो एअरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद
जेटलाईट दिल्ली, कोलकाता
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता

संदर्भ संपादन करा

  1. ^ भा.वि.प्रा. रु. २५० करोड भुवनेश्वर विमानतळात गुंतविणार (इंग्लिश मजकूर) जुलै २२,२००६

बाह्य दुवे संपादन करा