पितृदोष ।१।

संपादन

बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच असतो . याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो . तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ , व १२ वा एकत्र वा वेगवेगळा , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही . यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही ! परंतु या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत . या नंतर करतात तेरावा . व नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात . या वेळीही अब्दपूरीत व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करत नाहीत . 

तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तीर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या पानांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही ! 

तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ठरतात . 

पितृदोष २

संपादन

मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतु मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहिक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयाय ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते व तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते ! 

मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या ! तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच ! 

ख्रीस्ती बांधव , पारशी लोक , इस्लामिक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते . ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही ! अगदी प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतु त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात . ( हे सर्व मी नाही संशोधकांनी सिद्ध केले आहे ज्यावर डीस्कव्हरी या चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.

या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्यान आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा ! 

पितृदोष ३

संपादन

प्रथम दिनी गेलेल्या व्यक्तीचा दाह संस्कार होतो यावेळी मृतस्थानी , द्वारस्थानी , विश्रांती स्थानी काष्ठ रचनेवेळी आणि चौकात पिंड देतात यामुळे भुमीवरील , गृहवास्तु , प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करूनये यासाठी केले जाते . पुढे नवद्वारांवर पिंड ढेवून क्रव्याद नावाच्या मांस भक्षक अग्निस आवाहन करून बोलावले जाते . स्मशानात पिंडदान करताना प्रेतसखा म्हणजे त्या दिवशी आणखी कोणी गेलेली व्यक्ती असेल त्यासाठीही पिंडदान केले जाते .

नंतर प्रत्येक दिवशी स्मशानात जाऊन दहा दिवसांपर्यंत पिंड द्यावेत . नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होते . जर दररोज पिंडदान केले असेल तर दहाव्या दिनी केवळ एक पिंड देऊन काक बली द्यावा लागतो अन्यथा एकाचवेळी दशपिंड द्यावे लागतात . ही दशक्रिया विधीची संकल्पना मानवी जन्मावर अधारीत आहे . जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटासा पिंडच असतो तशीच कल्पना करून पहिला पिंड देतात . यात सम व विषम श्राद्ध अशी संकल्पना असते . विषमदिनी अवयव पिंडही देतात . पहिला पिंड मस्तक , दुसरा पिंड कान , नेत्र , आणि नाक , तीसरा पिंड गळा , खांदे , भुजा व वक्षःस्थल , चौथा पिंड नाभी , लिंग /योनि व गुदा , पाचवा पिंड जानु , जंघा , पाय , सहावा पिंड सगळी मर्म स्थाने , सातवा पिंड सगळ्या नाड्या , आठवा पिंड दात केस वगैरे , नववा पिंड विर्य व रज , दहावा पिंड संपूर्ण शरीर . अगदी हेच आईच्या पोटातही घडत असते व दहाव्या महिन्यात बाळाचा जन्म होतो . याच संकल्पनेवर देह जळाला मग पुढे गर्भात जाताना त्या जिवास सगळे शरीर अवयव मिळावे ही संकल्पना असते . त्यामुळे दहावा हा दहाव्या दिवशीच करावा . तीसऱ्या , पाचव्या दिवशी नाही कारण यात वेळ किंवा कोणी नातेवाईक यावेत म्हणून दिला जाणारा हा वेळ नाही . 

पाच बोळकी घेऊन त्यावर पाच पिंड सोबत पाच काड्यांवर पिवळ वस्त्र जे ध्वजे सारखे दिसते ते असते छत्री म्हणून . पाच पोळी पादूका जोड वगैरे असतात . पाच पिंड पहिला गेलेल्या व्यक्तीचा , दुसरा प्रेतसखा , तीसरा वैवस्वत यम , चौथा वायस म्हणजे कावळा व पाचवा प्रेताधिपती रूद्राच्या नावे द्यावा . यानंतर वायसबली म्हणजे कावळा शिवणे होते . व कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करतात . यात दर्भ , काळे तीळ , जव व पांढरी फुले , माका , तुलसीपत्र अत्यंत महत्त्वाचे असते .

पितृदोष ४

संपादन

अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून वृषोत्सर्ग विधी पूर्वी करीत असत . याच दिवशी एकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व यानंतर मलीन मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी विविध दशदाने करून समाप्ती केली जाते .

बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडील , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .

तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडे विविध सुक्ताचे पठण करतात तर बाकीकडे हवन केले जाते . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरुजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .

यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतु अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरुजींस व चालवणाऱ्या गुरुजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरुवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .

पितृदोष ५

संपादन

तेरावे वगैरे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्त्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात . काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्त्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरुजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरुजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात . 

या विधीत चार गुरुजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते . 

चारही दिशांस बसून चारही गुरुजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरुजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .

पितृदोष ६

संपादन

मागे दिलेले तेराव्या पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते अब्दपुरीत श्राद्ध . अब्दपूरीत म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध !

जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही अब्दपूरीतासाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूरीत व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतु किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरुजी बोलावून करावे असे वाटते . 

! वरील सर्व कर्मे करताना यत्किंतीतही तृटी चालत नाही जसे पुजेत एखादी वस्तू नसेल तर एेवजी अक्षता वाहतात तसे इथे चालत नाही . त्यामुळे वा गुरुजींनी दिलेली माहिती नीट न समजणे , कधी कधी गुरुजी जे सांगतात ते व घरातील काही मंडळी हे आमच्यात नसते म्हणतात त्यामुळे तो विधी केलाच जात नाही याने पत्रिकेत पितृदोष येत असतो . हे अनेक पिढ्या मागे चालत आलेले असते . जसा एखादा आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात व नंतर तो आजार जोर करतो अगदी तसेच हे असते !

१ ) घरातील कर्ता पुरूष अचानक मृत्यू पावणे . २ ) घरातील तरुण मुलाचा अचानक काहीही न घडता साध्या कोणत्याही कारणाने अचानक मृत्यू होणे .

३ ) एेन जेवणाचे वेळी घरात भांडणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे .

४ ) घरात चांगली केलेली पुण्यकृत्ये लागू न पडणे व आणखी वाईट होणे त्यामूळे श्रद्धा डळमळीत होणे .

५ ) दोन सख्य असलेले भाऊ (लग्नांनंतरही सख्य कायम ) अचानक वितूष्ट येऊन वेगळे होणे व अगदी हा मरावा इतका द्वेष वाढणे .

६ ) दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा अगदी दरीद्री बनणे व योग्य असूनही नोकरी , विवाहात नाकारले जाणे .

७ ) घरात अनेक जण किंवा काही जण अविवाहित असणे व घराण्यात संतती नसणे .

८ ) पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारपण ॲक्सीडेंन्ट यावर खर्च होणे व कर्ज काढावे लागणे .

९ ) विविध प्रकारची भितीदायक स्वप्ने पडणे ज्यात घरातील वडिलमंडळी खायला मागत आहेत असे दिसणे . १० ) तीर्थयात्रा , तेथे केलेली श्राद्धे लागू न पडणे .:

पितृदोष ७

संपादन

१) घरात पुरेसे अन्नधान्य भरूनही ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे . ( हे अन्न बाहेर टाकल्यावर कोणताही प्राणी खात नाही ).

२ ) घरात काही देवाचे कार्य वा शुभकार्य ठरले की नेमक्या अडचणी उभ्या रहाणे वा ऐनवेळी भांडणे होणे व केलेल्या कार्याचे समाधान साध्य न होणे .

३ ) घराण्यात कुटूंब विभक्त होणे व होणारी कार्ये बंद पडणे .

४ ) घरात वडिलधारी मंडळी काहीही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न रहाणे .

५ ) हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या सुरू होणे पण मध्येच खीळ बसणे.

६ ) घरातील मुलगा / मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे .

७ ) जोडप्यात कोणताही दोष नसताना व डाॅ. इलाज सुरू असूनही संतती न होणे / संतती न वाचणे / वारंवार गर्भपात होणे / संततीत व्यंग असणे / मतीमंद संतती जन्माला येणे.:

पितृदोष ८

संपादन

आपल्याला होणारी संतती ही फक्त आणि फक्त पितरांच्या आशिर्वादानेच होते ! जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा (मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात ! 

आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते . नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो . यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात .मग सुरू होते दीपावलीची धामधूम . यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो . याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . यमतर्पण करतात . 

या पितृदोषासाठी त्रीपिंडी, नारायण नागबळी, केला जातो. तसेच आणखीही काही सोपे उपाय आहेत तेही केल्याने फायदा मिळतो .  नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत . तीन दिवसात पहिले नारायण बली, दुसरी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म व नवग्रहांचे हवन केले जाते. 

त्रीपिंडी हा विधी एकाच दिवसात करता येतो .  वरील विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर , नाशिक , नरसोबाची वाडी, वाराणसी , गोकर्ण महाबळेश्वर, गया. प्रयाग, आदी ठिकाणी स्थान महात्म्यामुळे केला जातो. तसेच जेथे तुलसीची वने आहेत तेथे, वडाचे झाड, तलाव व श्री शिवमंदिर, संगमस्थान, समुद्र किनारा, पिंपळवृक्ष व शिवाचे मंदिर व नदी संगमाचे ठिकाणीही हा विधी केलेला चालतो. हल्ली हा विधी हरीहरेश्वर येथेही करतात.

नारायणबली म्हणजे नेमके काय व काय विधी होतात ते पाहू

पितृदोष ९ नारायण बली

संपादन

नारायण बली . हा विधी घरात कोणाचा अपमृत्यू , अपघाती , आत्महत्या , खून , दीर्घ आजार , पाण्यात बुडून , भाजून , चोरांनी मारून इत्यादी प्रकारे मृत्यू झाला असल्यास त्याचा दोष जाऊन आत्यास गती मिळावी यासाठी केला जातो. तसेच घरातील मागील पिढीत दशक्रियादी कार्ये नीट झालेली नसतील त्या सर्वांचा , घरातील न केल्या गेलेल्या श्राद्धांचा सर्व प्रकारचे सात पिढीतील दोष पित्या कडून व माते कडून आलेले नाहीसे होतात . तसेच हा विधी वडील आई हयात असतानाही मुलास करता येतो . 

या विधीची सुरुवात गंगा स्नानाने होते . तेथे गंगेची पुजा वगैरे करून त्या जलस्त्रोतास वंदन करून हे कर्म आज सुरू करीत आहोत हे सिद्धीस जावो असे आशिर्वाद मागून भस्म स्नान व मृत्तीका स्नान व पुन्हा गंगा स्नान केले जाते . यावेळी सफेद वस्त्र नेसायचे असते . एकट्या पुरूषानेही हा विधी केला तरी चालतो तसे समस्त कुटूंबीय तेथे हवेतच असेही काही नसते यासाठी एकटा माणूसही हा विधी जाऊन करून येऊ शकतो .

यानंतर ओलेत्यानेच शिव मंदिरास प्रदक्षिणा घालून तेथील कुंडावरून पाणी भरून स्मशानात जातात . येथे . ब्रह्मा , विष्णू , महेश , यम व प्रेत या पंच प्रतिमांचे ( या प्रतिमा अनुक्रमे सोने , चांदी , ताम्र , लोहशिसे यांच्या असतात ) पंचकलशांवर स्थापना करून षोडषोपचारे पुजन केले जाते . प्रेताचे पुजन करून यथाविधी त्याचे दहनादी कर्म केले जाते . त्या अनुषंगाने येणारे दशक्रियादी विधी केले जातात . नंतर त्या दहन केलेल्या पुतळ्याची राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात या दिवशी व पुढील तीन दिवस सुतक पाळतात . क्रमश:

पितृदोष १०

संपादन

तीन दिवसाचे सुतक संपले की चौथ्या दिवशी नागबली करतात . या दिवशी ब्रह्मा , विष्णू , महेश , काल व सर्प या पंच देवतांचे षोडषोपचारे पुजन होते . नंतर सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते . पुन्हा सायंकाळी राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात . हा विधी घराण्यात कोणी सर्प मारला असेल किंवा चुकून अपघाताने मारला गेला असेल तर त्याचे दोष जाण्याकरीता करतात . कुंडलीतील सर्प दोष ( कालसर्प ) याने जातात . 

याचे तीन दिवसांचे सुतक संपले की चौथ्या दिवशी आंघोळ वगैरे उरकून गुरुजींच्या घरी गणेशपुजन , पुण्याहवाचन , नवग्रह पुजन केले जाते याचे वैशीष्ट्य असे की जर तुमची जन्मनक्षत्र शांती झाली नसेल तर ती ही यातच होते इतके हे पुजन महत्त्वाचे असते . यानंतर भोजन वगैरे झाले की गुरुजींना ठरलेली दक्षिणा व ऐपती प्रमाणे दाने किंवा त्या ऐवजी यथाशक्ति दक्षिणा देतात . 

हल्ली हा विधी फक्त तीन दिवसात उरकला जातो परंतु ते शास्त्र संमत आहे .  पितृदोष जाण्या करीता श्री गुरूचरीत्राचा वीस आणि एकवीसावा अध्याय वाचल्याने ही श्री गुरुकृपेने पितर संतुष्ट होऊन त्यांना गती प्राप्त होते .