इराणच्या याझ्दमधील एक पारशी मंदिर

पारशी (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला.

सध्या भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे.

लोकसंख्यासंपादन करा

देश लोकसंख्या[२]
  भारत 69,000
  इराण 20,000
  अमेरिका 11,000
  अफगाणिस्तान 10,000
  युनायटेड किंग्डम 6,000
  कॅनडा 5,000
  पाकिस्तान 5,000
  सिंगापूर 4,500
  अझरबैजान 2,000
  ऑस्ट्रेलिया 2,700
इराणचे आखात 2,200
  न्यूझीलंड 2000
एकूण 137,400


संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा