इराणशाह आतश बेहराम
इराणशाह आतश बेहराम तथा उदवाडा आतश बेहराम हे भारताच्या गुजरात राज्यातील उदवाडा गावातील पारशी तीर्थस्थळ आहे. पारशी धर्माच्या आठ पवित्र अग्निमंदिरांपैकी हे एक आहे.
या मंदिराची रचना १७४२मध्ये मोतीबाई वाडिया यांनी करवली. यासाठीची जागा मांडवी संस्थानाच्या राजाने दान केली होती.[१]
उदवाडा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आहे. येथे जाण्यासाठी उदवाडा रेल्वे स्थानक किंवा वापी रेल्वे स्थानकाचा वापर करता येतो.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Mehta, Behram (24 April 2011). "Fire temple at Udvada is central to Parsi religion". DNA India.