दे दणादण

(दे दणा दण, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

दे दना दन हा १९८७चा महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे , महेश कोठारे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. एका विस्फोटातून वाचल्यानंतर लक्ष्याला (ल. बेर्डे)ला अद्भुत शक्ती प्राप्त होते , तो अतिवेगाने धाऊ शकतो , उंचावरून उडी घेऊ शकतो. पण फक्त लाल रंग त्याला दिस्तक्षणी त्याची सर्व शक्ती जोपर्यंत लाल रंग त्याच्या समोर आहे तोपर्यंत नाहीशी होते.तो आपल्या शक्तीन बजारंगाच नाव घेऊन वाईट लोकांशी कसा लढतो ते या चित्रपटात गमतीदार पद्धतीने दर्शविलेले आहे.[]

दे दणा दण
दिग्दर्शन महेश कोठारे
कथा नारायण यशवंत देऊळगावकर
पटकथा अण्णासाहेब देऊळगावकर
प्रमुख कलाकार महेश कोठारे
लक्ष्मीकांत बेर्डे
निवेदिता जोशी
प्रेमाकिरण
दीपक शिर्के
संवाद अण्णासाहेब देऊळगावकर
संकलन एन एस वैद्य
छाया सूर्यकांत लवंदे
गीते प्रवीण दवणे
संगीत अनिल मोहिले
ध्वनी रामनाथ जठार
पार्श्वगायन सुरेश वाडकर
शब्बीर कुमार
ज्योत्स्ना हर्डीकर
उषा मंगेशकर
रंगभूषा निवृत्ती दळवी
भाषा मराठी
प्रदर्शित १९८७


कलाकार

संपादन

निर्मिती

संपादन

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.

संगित

संपादन

ह्या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • पोलीसवाल्या सायकलवाल्या ब्रेक लाऊन थांब
  • माझ्या उरात होतय धक धक रं
  • एकमुखानं करू गर्जना जय जय जय हनुमान
  • दिलाचा तोफा माझा दिला हाय गं मी तुला

कथानक

संपादन

महेश कोठारे (महेश दनके) आणि लक्ष्या (लक्ष्या टांगमोडे) हे दोघे मावसभाऊ असतात . ते पोलिसात भरती होतात.त्याची नियुक्ती श्रीरंगपुरला होते. त्यांना महेश आणि लक्ष्याच्या घरासेजारी प्रेमाकिरण (आवडाक्का ) राहत असते. महेश त्याची ओळख करून देतो. पोलीस अधिकारीची मुलगी गौरी (निवेदिता जोशी) यांना महेश चित्रपटाचे तिकीट ब्लॉक ने घेतानी पकडतो. त्यांची तेथे ओळख होते. दगड्या रामोशी (दीपक शिर्के) हा एक डकू आहे.


संदर्भ

संपादन
  1. ^ https://m.timesofindia.com/entertainment/marathi/movies/photofeatures/laxmikant-berde-superhit-comedy-films-of-the-actor-you-should-not-miss/photostory/63415265.cms