नारायण यशवंत देऊळगावकर
नारायण यशवंत देऊळगावकर (ऑगस्ट २२, १९२०-जून ३, २००८) हे मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक होते.
जन्म |
नारायण यशवंत देऊळगावकर ऑगस्ट २२, १९२० पुणे, महाराष्ट्र, भारत |
---|---|
मृत्यू |
जून ३, २००८ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
इतर नावे | अण्णा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पटकथालेखन |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | दे दणा दण |
जीवन
संपादनदेऊळगावकरांचा जन्म ऑगस्ट २२, १९२० रोजी पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात झाला. अखेरच्या काही वर्षांतील नागपुरातील वास्तव्य वगळता त्यांचे वास्तव्य पुण्यातच होते. मराठी व संस्कृत या विषयांमध्ये त्यांनी एम.ए. पदवी मिळवली.
जून ३, २००८ रोजी नागपुरात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
कारकीर्द
संपादनदेऊळगावकरांनी ४० वर्षांच्या कारकिर्दीत २५हून अधिक चित्रपटांच्या पटकथा व ५०हून अधिक गीते लिहिली. 'सीता स्वयंवर' व 'माया बाजार' या गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी ग.दि. माडगूळकरांसोबत त्यांनी चित्रपट व्यवसायात पहिले पाऊल ठेवले. 'झाकली मूठ' या चित्रपटापासून अण्णांच्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरुवात झाली.
चित्रपट: पटकथालेखन
संपादन- पैशाचा पाऊस
- सतीचं वाण
- थापाड्या
- सासुरवाशीण
- धूमधडाका
- माहेरची साडी
- खट्याळ सासू नाठाळ सून
- नवरा बायको नशीबवान
- सतीची पुण्याई
- लेक चालली सासरला
- नशीबवान
- सुभद्राहरण
- दे दणा दण
संकीर्ण माहिती
संपादनप्रीती वडनेरकर या लेखिका देऊळगावकरांच्या कन्या आहेत.