तोलुका

(तोलुका दे लेर्दो या पानावरून पुनर्निर्देशित)


तोलुका (स्पॅनिश: Toluca) ही मेक्सिको देशाच्या मेक्सिको ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या दक्षिण भागात मेक्सिको सिटीच्या ६३ किमी नैर्ऋत्येस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली ८ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले तोलुका मेक्सिकोमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर व पाचव्या क्रमांकाचे महानगर आहे.

तोलुका
Ciudad de Toluca
मेक्सिकोमधील शहर


ध्वज
चिन्ह
तोलुका is located in मेक्सिको
तोलुका
तोलुका
तोलुकाचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 19°17′32″N 99°39′14″W / 19.29222°N 99.65389°W / 19.29222; -99.65389

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य मेक्सिको
स्थापना वर्ष १९ मे, इ.स. १५२२
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७५० फूट (२,६७० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,१९,५६१
  - महानगर १६,१०,७८६
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
toluca.gob.mx

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून दिपोर्तिवो तोलुका एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७०१९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी तोलुका हे एक होते.

जुळी शहरे

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: