सुवोन (कोरियन: 수원) ही दक्षिण कोरिया देशाच्या ग्याँगी प्रांताची राजधानी आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सुवोन शहर सोलच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे. १७ विद्यापीठांचे परिसर असलेले सुवोन दक्षिण कोरियामधील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे.

सुवोन
수원
दक्षिण कोरियामधील शहर

Hwaseong Dongbuknodae - From Dongbukgongsimdon - 2009-03-01.JPG

सुवोन is located in दक्षिण कोरिया
सुवोन
सुवोन
सुवोनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 37°16′N 127°1′E / 37.267°N 127.017°E / 37.267; 127.017

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत ग्याँगी
क्षेत्रफळ १२१.१ चौ. किमी (४६.८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ११,६०,०६२
  - घनता ८,९७५ /चौ. किमी (२३,२५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
seogwipo.go.kr


१७९६ साली चोसून साम्राज्यादरम्यान बांधण्यात आलेला ह्वासोंग हा येथील किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

२००२ फिफा विश्वचषकादरम्यान दक्षिण कोरियामधील १० यजमान शहरांपैकी सुवोन एक होते. येथील सुवोन विश्वचषक मैदानामध्ये विश्वचषकामधील ४ तर २००१ फिफा कॉन्फेडरेशन चषकामधील ३ सामने खेळवले गेले होते.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: