झोराष्ट्रियन (झोराष्ट्रियनिझम किंवा मझदेइझम किंवा मॅजिनिझम) (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकामध्ये पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. पर्शियातील लोकांना पर्शियन म्हटले जाते, त्यामुळेच कधी कधी झोराष्ट्रियन धर्मास पारशी धर्म असेदेखील म्हटले जाते. या धर्माच्या स्थापनेनंतर पारशीइराणी लोक अनेक शतके याच धर्माचे पालन करत होते. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्य सोबत केलेल्या युद्धानंतर झोराष्ट्रियन धर्माची वाढ खुंटली. इसवीसनाच्या सातव्या शतकातील इस्लामच्या आगमनामुळे झोराष्ट्रियन धर्माच्या ऱ्हासाची सुरुवात झाली.

सध्या भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशीधर्मीय रहिवासी आहेत. पारसीइराणी हे दोन झोराष्ट्रियन धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत.

अवेस्तन भाषेमध्ये लिहिला गेलेला अवेस्ता हा झोराष्ट्रियनचा धर्मग्रंथ मानला जातो.

लोकसंख्यासंपादन करा

देश लोकसंख्या[१]
  भारत 69,000
  इराण 20,000
  अमेरिका 11,000
  अफगाणिस्तान 10,000
  युनायटेड किंग्डम 6,000
  कॅनडा 5,000
  पाकिस्तान 5,000
  सिंगापूर 4,500
  अझरबैजान 2,000
  ऑस्ट्रेलिया 2,700
इराणचे आखात 2,200
  न्यूझीलंड 2000
एकूण 137,400

तत्त्वज्ञानसंपादन करा

झोराष्ट्रियन धर्माच्या शिकवणुकीनुसार आहूर माझदा ने सृष्टी निर्माण करताना केवळ चांगलेच निर्माण केले, वाईट काहीच नाही. अशा प्रकारे झोराष्ट्रियनिझम मध्ये मंगल व अमंगल गोष्टींचे निरनिराळे स्रोत आहेत. जेव्हा अमंगल स्रोत (दरूज) माझदाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मंगल स्रोत त्याचे रक्षण करतो. जेव्हा अहूर माझदा या जगात संचार करत नसतो, तेव्हा त्याच्या निर्मितीचे रक्षण सात अमेशा स्पंद आणि इतर याझातांचे प्रमुख करतात. त्यांच्या माध्यमातून मानवतेसाठी परमेश्वराचे कार्य काय आहे, ते स्पष्ट होते व माझदाची आराधना कशी करावी याचेही मार्गदर्शन केले जाते. झोराष्ष्ट्रियन धर्मग्रंथाचे नाव अवेस्ता. या ग्रंथाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग हरवलेला आहे. हा हरवलेला भाग केवळ संदर्भांच्या माध्यमातून व ९ व्या व ११ शतकांपासून केल्या गेलेल्या काही संक्षिप्त नोंदींवरून थोडाफार समजतो.

व्याख्यासंपादन करा

मझदेइझम ही संज्ञा १९ व्या शतकात उदयास आली. अहुरा माझदा या नावातून माझदा हा शब्द घेऊन त्याच्यापुढे धर्म वा प्रणालीवर विश्वासदर्शक इझम या प्रत्यय जोडून मझदेइझम ही संज्ञा तयार करण्यात आली आहे.

या धर्माचे झोराष्ट्रियन नाव माझदायासना असे आहे. माझदा व अवेस्तान भाषेतील शब्द यासना (पूजा किंवा आराधना) या दोन शब्दांच्या संयोगातून ते तयार झाले आहे.

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा