जॉन डाल्टन (६ सप्टेंबर, इ.स. १७६६ - २७ जुलै, इ.स. १८४४) हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
   जॉन डाल्टन
(जन्म : ६ सप्टेंबर, १७६६) (मृत्यू: २७ जुलै, १८४४)

जॉन डाल्टन हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता. “आधुनिक अणु सिद्धांता” मांडण्यासाठी जॉन डाल्टनची ओळख आहे. डाल्टनचा जन्म क़्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथच्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी दिनांक ६ सप्टेंबर रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मॅंचेस्टरच्या “नव महाविद्यालय” (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापर्यंत काम केले. निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले.

अर्थार्जनासाठी निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असला तरी त्याच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्याला छंद होता. हवेतील वायू घटक पृथ्थकरण करण्याच्या निमित्ताने, डाल्टनला रसायन शास्त्राची गोडी लागली.

त्या काळात, हायड्रोजन वायु हा सर्वात हलका असल्याचे ज्ञात होते. याच माहितीचा आधार घेऊन डाल्टननी इतर वायू (म्हणजे इथिलीन, मिथेन, ऑक्सिजन, अमोनिया… इत्यादी), अभ्यासाकरिता निवडले. मिथेन या वायुच्या अभ्यासादरम्यान डाल्टनला अणु कल्पना सुचली असल्याचे बऱ्याच माहिती स्रोतामध्ये आढळते. प्रयोगातील आपल्या सर्व निरीक्षण नोंदींच्या आधारे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूंचे रासायनिक वर्गीकरण केले. “हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण” या शीर्षकांतर्गत डाल्टननी ३० ऑक्टोबर १८०१ रोजी, एक पुस्तक प्रकाशित केले. डाल्टनच्या मते, पदार्थाचा लहानात लहान (ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही) घटक म्हणजे अणु. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु सारखेच असतात. दोन मूलद्रव्यांचे अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवितो. सर्व रासायनिक पदार्थांची अणु रचना स्पष्ट करण्याकरिता, डाल्टननी पुढे, अणु सिद्धांत मांडला. “अणुचे विभाजन करता येत नाही” हे एकाच तत्त्व, आधुनिक विज्ञानाला अमान्य आहे. डाल्टनच्या अणु-वादातील इतर सर्व तत्त्व, सर्वामान्य आहेत. जॉन डाल्टन, सृष्ठीचे “रासायनिक आणि भौतिक” मूळ रचना प्रस्तावित करणारा एक नवा “विज्ञान यात्री” . दिनांक २७ जुलै, १८४४ रोजी जॉन डाल्टनचे निधन झाले