ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्रआयर्लंडचे राजतंत्र मिळून ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
United Kingdom of Great Britain and Ireland
 
इ.स. १८०१इ.स. १९२२  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Dieu et mon droit (फ्रेंच) "देव आणि माझा अधिकार"
राजधानी लंडन
अधिकृत भाषा इंग्लिश
क्षेत्रफळ ३,१५,०९३ चौरस किमी
लोकसंख्या ४,२७,६९,१९६ (१९२११)
–घनता १३५.७ प्रती चौरस किमी

विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला.

आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.

बाह्य दुवे

संपादन