जगित्याल किंवा जगतियाल हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. जगित्याल (किंवा जगतियाल) येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१६ मध्ये जगतियाल जिल्हा हा पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला.

जगित्याल जिल्हा
జగిత్యాల(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
जगित्याल जिल्हा चे स्थान
जगित्याल जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय जगित्याल
मंडळ १८
क्षेत्रफळ
 - एकूण २,४१९ चौरस किमी (९३४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,८५,४१७ (२०११)
-लोकसंख्या घनता ४०७ प्रति चौरस किमी (१,०५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २२.४६
-साक्षरता दर ६०.२६
-लिंग गुणोत्तर १०००/ १०३६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ निजामाबाद
-विधानसभा मतदारसंघ जगतियाल, कोरुटला, धर्मपुरी
संकेतस्थळ


प्रमुख शहर संपादन

  • जगित्याल
  • धर्मपुरी
  • कोरुटला

भूगोल संपादन

जगित्याल जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,४१९ चौरस किलोमीटर (९३४ चौरस मैल) आहे. जगित्याल जिल्ह्याला निजामाबाद, निर्मल, मंचिर्याल, पेद्दपल्ली आणि करीमनगर जिल्ह्याच्या सीमा आहेत.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जगित्याल जिल्ह्याची लोकसंख्या ९,८५,४१७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०३६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६०.२६% आहे. एकूण लोकसंख्येच्या २२.४६% लोक शहरी भागात राहतात.

मंडळ (तहसील) संपादन

जगित्याल जिल्ह्या मध्ये १८ मंडळे आहेत: जगित्याल आणि मेटपल्ली आणि कोरुटला ही तीन महसूल विभाग आहेत. [१]

# जगित्याल महसूल विभाग कोरुटला महसूल विभाग मेटपल्ली महसूल विभाग
1 जगित्याल शहरी कोरुटला मेटपल्ली
2 जगित्याल ग्रामीण मेडिपल्ली मल्लापूर
3 रायिकल कथलापूर इब्राहिमपट्टणम
4 सारंगापूर
5 बिरपूर
6 धर्मपुरी
7 बुग्गारम
8 पेगडापल्ली
9 गोल्लपल्ली
10 मल्याला
11 कोडिम्याला
12 वेलगटूर

पर्यटन संपादन

जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे म्हणजे सब्बितम येथील रामुनीगुंडलू धबधबा आणि रामगिरीकिला हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. धर्मपुरी मंडळाच्या मुख्यालयात गोदावरी नदीच्या काठी असलेले श्री लक्ष्मीनरसिंहस्वामींचे पवित्र मंदिर सर्वत्र लोकप्रिय आहे. वेलगटूर मंडळातील कोटिलिंगाला गावात गोदावरी नदीच्या काठावर असलेले श्री कोटेश्वरस्वामी मंदिर आणि मल्याला मंडळाच्या मुथ्यम्पेट गावातील कोंडागट्टू येथे स्थित श्री अंजनेया स्वामींचे पवित्र मंदिर हजारो भाविकांना आकर्षित करते. शहराजवळ असलेल्या जगित्याल किल्ल्याचे अतिशय ऐतिहासिक महत्त्व आहे, हा तेलंगणातील एकमेव ताऱ्याच्या आकाराचा किल्ला आहे ज्याभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे.[२]

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन


संदर्भ संपादन

  1. ^ "Mandal Offices | District Jagtial, Government of Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "History | District Jagtial, Government of Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.