चौधरी मुहम्मद अली (पंजाबी, उर्दू: چوہدری محمد علی ; रोमन लिपी: Chaudhry Muhammad Ali ;) (जुलै १५, इ.स. १९०५ - डिसेंबर २, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी राजकारणी होता व इ.स. १९५५ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान होता. त्याच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाकिस्तानाची राज्यघटना बनवली गेली व इ.स. १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. परंतु त्याच काळात मुस्लिम लीग पक्षातील मतभेद विकोपाला जाऊन त्यात फूट पडली व पाकिस्तानातील रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली. या नव्या पक्षाने पाकिस्तानी विधिमंडळात आधिक्यही मिळवले. त्यामुळे चौधरी मुहम्मद अलीवर रिपब्लिकन पक्षाला रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा त्याच्याच मुस्लिम लीग पक्षातून दबाव वाढला. पक्षांतर्गत राजकारणाची परिस्थिती चिघळल्यामुळे त्याने पंतप्रधानपदाचा व मुस्लिम लीग सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

चौधरी मुहम्मद अली

बाह्य दुवे

संपादन