चर्चा:पद्मनाभस्वामी मंदिर


या लेख / विभाग http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/17969--10- येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(१२ जुलै २०१२)



पद्मनाभ स्वामी मंदिरातली संपत्ती 10 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्य समितीनं पुन्हा एकदा संपत्तीची मोजदाद सुरु केल्यावरचा हा प्राथमिक अंदाज आहे.

यातले अनेक अभूषण एवढी पुरातन आहेत की, यांची अंतरराष्ट्रीय बाजार मूल्य सुध्दा करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची समिती आपला अहवला ८ आँगस्टला न्यायालयाला सादर करणार आहे..

थिरुवनंतपूरमचं हे पद्मनाभ मंदिर देशातलं नव्हे जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर आहे. मंदिराच्या पाच तळघरातून गेल्या वर्षी मिळालेल्या अगणित संपत्तीमुळं देशाच्या कोप-यातलं हे शहर अचानक जगात चर्चेत आलं. तिरुपती बालाजी..शिर्डीचे साईबाबा यांना देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिराचा मान होता. तो मान पद्मनाभ मंदिरानं मिळवला.

शेकडो वर्षापासून या मंदिराच्या तळघरात संपत्ती लपलेली होती. ती बाहेर आली आणि सगळीकडं आश्चर्याचे सूर निघू लागले. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानंचं या मंदिरातल्या संपत्तीची मोजदाद जाहीर करण्यावर बंदी घातली होती. बंद असलेल्या सहाव्या कोठडीची संपत्ती मोजण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीचा अंदाज आहे की पद्मनाभाच्या मंदिराची संप्तती किमान १० लाख कोटी असावी.

पद्मनाभन मंदिर छोट्याशा केरळ राज्याच्या राजधानी असलेल्या थिरुवनंतपूरम एअरपोर्टपासून ३ किलो मीटरवर आहे. पूर्वी हे मंदिर शेषशाई विष्णुच्या मनमोहक रुपासाठी प्रसिद्ध होतचं.गेल्या वर्षीपर्यंत कोणालाचं याची कल्पना नव्हती की विष्णुच्या चरणाखाली खरोखरचं लक्ष्मीचा अधिवास आहे.

काय-काय मिळाले नाहीं या मंदिरात, दहा एकर क्षेत्रफाळावर पसरलेल्या मंदिराची पाच तळघर उघडताचं सगळ्याच्या नजरा विस्फारल्या. पहिल्या सहा दिवसात अफाट संपत्तीचे आकडे १ लाख कोटीपर्यंत पोहचले होते. आता सहा कोठडीत मिळुन हीच संपत्ती किमान १० लाख कोटींची असावी अशी चर्चा आहे.

मंदिराच्या बरोबर खाली आहे एक गूहा..या गूहेत आहेत सहा मोठी तळघर, तळघर मोठाले दगड टाकून 150 वर्षापूर्वी बुजवण्यात आली होती.. मंदिराच्या आत मधुनचं तळघराकडं जाण्यासाठी रस्ता होता. या तळघरांना सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीनं ए बी सी डी ई एफ अशी नाव दिली..

कल्पनेला कितीही ताण द्या..तरीही मंदिरातल्या 1 लाख कोटीच्या खजिन्यात काय काय असेल याचा अंदाज करता येत नाही..मंदिरात आहेत... सोन्याची 18 फूटाची लांबीची छडी. सोने आणि रत्नांनी भरलीत 7 पेटार आणि 70 पोती 17 किलोचे सोन्याचे सिक्के.1000 हून अधिक सोन्याचे हार.. तळघरात सोन्याचे तिन मुकूट मिळालेत.

त्रावणकोरचा राजा हे मूकूट घालत होते.. हे मूकूट तळघरातल्या लाँकर मध्ये सापडलेत. एका लाँकर मध्ये सोन्याची दोरी मिळाली आहे..केरळ पारंपारीक पध्दतीनं जूटची तयार करतात तशी गोल-गोल मोडून ठेवली होती सोन्याची दोरी.5-5 कोटींच्या शेकडो सोन्याच्या मोहरा पिशव्या..लाकडी पेटा-यात ठेवण्यात आल्या होत्या.

तळघरात सापाच्या आकाराच्या 1 हजार साखळ्या मिळाल्यात..राजघराण्याची ही निशाणी असावी..सगळ्यात मोठी साखळी 18 फूट लांब आहे. 2 साखळ्यांचे वजन तर 2-2 किलो आहे..एका साखळीचं वजन तर 10 किलो आहे..सगळ्या साखळ्या आणि हारांचं वजनचं 1 क्विंटल आहे.

सोने चांदीच्या नाण्यांची संख्या एक लाखाच्याही वर आहेत. जवळपास 536 किलोची नाणी भारतीय आहेत. 20 किलोची ब्रिटीश कालीन..कांही नेपोलियन बोनापार्टच्या काळातली आहेत. सोनो चांदी, रत्न, पाचू..माणिक..हिरे किती सापडले याची तर गणितचं नाही.

समितीचे सदस्य हे सगळ पाहून मोजून हैराण झालेत. तळघरात सोन्याचे अनेक पेडाँल मिळालेत..सोन्याच्या राजदंडाची तर मोजदाद सहा दिवसापासून सुरु आहे..खजान्यात एक अशी चेन मिळाली आहे जिच्यावर माणिक मोती-हि-यांच्या 12 पदर जोडलेले आहेत.

सोन्याच्या मणिबंधाची म्हणजे मनगटावर घालायच्या पट्टयांची खूप चर्चा सुरु आहे. ज्यात हिरो जोडलेले आहेत..प्रत्येक मणिबंध 2 किलोचा आहे. आता पर्यंत मोजलेल्या संपत्तीला प्लास्टिकच्या 70 पोत्यात ठेवण्यात आलं आहे. 7 पेटारातल्या संपत्तीची मोजदाद सुरुचं आहे. पद्मनाभाची संपत्ती वाढतचं चालली आहे.

आता ही संप्ती दहा लाख कोटीहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून हे मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर आहे..

मंदिरा शेजारीचं राहणारे वकील सूंदरराजन यांचा त्रावणकोर राजघराण्याच्या सदस्यांशी वादा झाला..त्यामुळ सूंदरराजनी 2009 हायकोर्टात शाही घराण्याच्या मंदिरावरच्या ताब्यावर अक्षेप घेतला. 2011 साली फेब्रुवारी महिन्यात सुनावणी दरम्यानं न्यायालयानं मंदिरातल्या सर्व संपत्तीची यादी करण्याचे आदेश दिले.त्यानंतर संपत्तीचे पहिले आकडे जाहीर झाले.

दरम्यानच्या काळात सुंदरराजन याचं निधनही झालं.पण त्यानंतरही मंदिराच्या संपत्तीची मोजणी सुरु आहे. न्यायालयानं हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती बनवली. हीच समिती सध्या संपत्ती मोजण्याचं काम करत आहे.

मंदिराच्या बांधकामाला 1566 साली सुरवात झाली. मार्तण्ड वर्मानं या राजानं हे मंदिर बांधलय..100 फूट उंचीच्या मंदिराच्या गोपूराला सात मजले आहेत. तळघर 150 वर्षापासून बंद होती..कांहीही मांडून ठेवण्यात आलेलं नव्हत.

सगळे हिरे, माणिक मोती, पाचू अस्ताव्यस्त पडलेले होते.पिशव्या फाटलेल्या होत्या, पेटारे तुटली होती. सहाव्या तळघरातही मोठी संपत्ती असावी असा अंदाज होताचं. तो खरा ठरलाय. पद्मनाभाची संपत्ती किमान दहा लाख कोटी आहे. महाराष्ट्र राज्याच्या दोन वर्षाच्या बजेट एवढी.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले

Start a discussion about पद्मनाभस्वामी मंदिर

Start a discussion
"पद्मनाभस्वामी मंदिर" पानाकडे परत चला.