गंजगोलाई

ऐतिहासिक स्थळ
(गंज गोलाई या पानावरून पुनर्निर्देशित)

हे लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ आणि बाजारपेठ आहे.


गंजगोलाई
स्थान लातूर, महाराष्ट्र, भारत
निर्मिती १९१६-४६
वास्तुविशारद फैजूदिन
वास्तुशैली इमारत
प्रकार सांस्कृतिक
देश भारत
खंड आशिया

गंज हा शब्द उर्दू असून याचा अर्थ बाजारपेठ असा होतो.तर रचना गोलाकार असल्याने गंजगोलाई असा नामोल्लेख केला जातो.हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादुर यांच्या हस्ते इ.स. १९१७ साली या गंजगोलाईची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.पुढे १९४६ साली नगर रचनाकार श्री. फायायुजुद्दिन ज्यांनी गंजगोलाई या ऐतिहासिक स्थळाचा सुनियोजित आराखडा तयार केला.यांनी हा आराखडा तयार करण्यासाठी देश-विदेशातील बाजारपेठांचा विचार केला होता. गंजगोलाईचा आराखडा दिल्लीमधील कॅनॉट प्लेस सारखा दिसून येतो. संपूर्ण बाजारपेठेशी सुसंगत व सर्व दिशांनी येऊन मिळणारे असे १६ रस्ते जोडणारी गंजगोलाईची रचनेत प्रत्येक रस्त्यात विशिष्ट मानाच्या बाजारपेठेची संकल्पना ठेवण्यात आली. याचा आकार सूर्य व त्याच्यापासून निघणाऱ्या सूर्यकिरणा सारखा दिसतो.मुख्य वास्तुच्या आतील बाजूस जगदंबा मातेचे मंदिर असून वास्तुच्या उत्तरेस मस्जिद आहे. शहरातील हिंदू - मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक आहे.पूर्वीच्या काळी गंजगोलाईचे पूर्वेस वास्तू कलेचा उत्तम नमुना असणारी दगडी वेस अस्तित्वात होती.स्वातंत्र्यपूर्व काळात निजामकालीन राजवटीत याच परिसरात असणाऱ्या मनोर्यावर तिरंगा फडकवला गेला. सदर वास्तुस शंभर वर्ष पूर्ण झाल्याने वास्तुची डागडूजी आणि रंगरंगोटी करण्यात आली[]

  1. ^ latur.nic.in