कालका−शिमला रेल्वे

(कालका−सिमला रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते.

तारादेवी स्थानकावर थांबलेली शिवलिक डिलक्स एक्सप्रेस

इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटिश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वेनिलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन