करंजी (जिंतूर)
करंजी karanji हे गाव महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक लहान गांव आहे.
इतिहास
संपादनया गावाची स्थापना कधी व कुणी केली याचा आज रोजी कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज उपलब्ध नाही .
धार्मिक
संपादनमंदिरे
संपादनगावांत एकूण ३ मंदिरे आणि एक बौद्ध विहार असून त्या ठिकाणी आपापल्या धर्माप्रमाणे उपासना केल्या जाते.
हनुमंताचे मंदिर
संपादनगावात गावांचा उत्तर दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत हनुमंताचे मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ला पार पडले.
हे मंदिर गावाच्या दक्षिणेस असून ते फार जुने असून त्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठा कार्यक्रम होत असतो.
राजकीय
संपादनगावामध्ये ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची स्थापना १९६५मध्ये झाली. २०१७ सालापर्यंत ग्रामपंचायतचे एकूण ११ सरपंच झाले आहेत. श्रीरंग दगडूजी लांडगे हे |०२ ऑक्टोबर २०१७ रोजी सरपंच म्हणून निवडून झाले.
ग्रामपंचायत | करंजी | ता. जिंतूर | जिल्हा परभणी | सचिव/ग्रामसेवक | कालावधी |
---|---|---|---|---|---|
सरपंच नांव | कालावधी | उपसरपंच | कालावधी | ||
श्रीरंग दगडूजी लांडगे | ०२ ऑक्टोबर २०१७ पासून |
सामाजिक
संपादनगावांत सामाजिक कार्य करणारे काही मंडळे असून ते व्यसनमुक्ती, शैक्षणिक जागृतीसाठी कर करत असतात.
आर्थिक
संपादनगावाची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असून गावात शेतीशिवाय इतर कोणताही व्यवसाय केला जात नाही. शेतीसाठी पाणी सिंचनाची कोणतीही ठोस सुविधा किंवा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे गावात कोरडवाहू शेती करण्यावाचून गावकऱ्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही. गावात डांबरी रोड सुद्धा नाही.
हे करंजी गाव तालुक्याच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावर असून गावाला आजूबाजूला डोंगर आहेत. त्यामुळे सहाजिकच गावाची जमीन ही सकस नाही. ती हलक्या प्रतीची असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न निघत नाही त्यामुळे गावाची आर्थिक प्रगती फारशी चांगली नाही, त्यामुळेच गावातील अनेक परिवार काम करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्यातील काही कायमचे गावाच्या बाहेर स्थायिक झाले आहेत.
वैशिष्ठ्ये
संपादनगावातील वैशि़ष्ठ्ये म्हणजे गावात पूर्वी पखालीने दारू निघायची आणि विकली जायची परंतु आज मात्र गावात व्यसनमुक्तीचा प्रचंड काम झालेले असल्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील लोकांचा धार्मिक कार्यात प्रचंड प्रमाणात असलेल्या सहभागामुळे गावामध्ये दरवर्षी गावकरी अखंड हरिनाम सप्ताह होत असतो, या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक नामांकित वक्ते गावात येतात. त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे आणि गावकरी बांधवांनी केलेल्या निश्चयामुळे गावातील व्यसनाचे प्रमाण कमी झाले आहे
अखंड हरिनाम सप्ताहातील दैनिक कार्यक्रम
संपादन- सकाळी चार ते सहा या वेळेत वारकऱ्यांचा सांप्रदायिक काकडा
- सहा ते सात यामध्ये विष्णूसहस्त्रनामाचा पाठ
- सकाळी सात ते दहापर्यंत ज्ञानेश्वरीचे पारायण
- दहा ते बारा पर्यंत श्रीमद्भागवत पुराण कथा
- दुपारी २ ते ५ भागवत पुराण कथा (चालूच).
- संध्याकाळी पाच ते सात संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
- रात्री ८:३० ते १०:३० वारकरी कीर्तन.
त्यानंतर रात्रभर वारकरी संतांनी लिहिलेल्या अभंगाच्या भजनाचा कार्यक्रम हरिजागर या नावाने होत असतो.
भूतकाळात ज्यांची कीर्तने गावात झाली त्या कीर्तनकारांची नावे :
ह.भ.प. वै. मदन महाराज बियाणी (पंढरपूर) ह.भ.प. बापुसाहेब महाराज वालुरकर
ह.भ.प. मनोहरकाका थोरे देवनांद्रेकर (पाथरी)
ह.भ.प. शिवदास महाराज नाईक हत्ता
आजूबाजूचे गावे
संपादनबामणी, दहेगाव, अंबरवाडी, आंगलगांव, कुऱ्हाडी,
शेती
संपादनगावांत एकून ---- हेक्टर शेती असून त्या पैकी ------ शेती वहीत (पिकाखाली) आहे.
गावांतील बहुतांशी जमीन ही हलकी असून त्यात एकच पिक घेता येते. गावातील शेतीसाठी पाण्याचा कोणतीही ठोस स्रोत उपलब्ध नाही, त्या मुळे शेती उत्पन्न हे तुटपुंजे आहे.
शैक्षणिक
संपादनअंगणवाडी
संपादनप्राथमिक शाळा
संपादनगावांत १ ली ते ४थ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदची प्राथमिक मराठी शाळा असून पुढील शिक्षणासाठी अ
बाम्हणी (बामणी) या गावी ५ किलोमीटर पायी जावे लागत.