ऑक्सितानी
ऑक्सितानी प्रदेशाचे नकाशावरील स्थान
ऑक्सितानी (फ्रेंच: Occitanie उच्चार ; ऑक्सितान: Occitània; कातालान: Occitània) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र तर नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. २०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर ऑक्सितानी प्रदेशाचे मुख्यालय आहे.
ऑक्सितानी Occitanie | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
ऑक्सितानीचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | तुलूझ | ||
क्षेत्रफळ | ७२,७२४ चौ. किमी (२८,०७९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५८,३९,६८७ | ||
घनता | ८० /चौ. किमी (२१० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-OCC |
विभाग
संपादनऑक्सितानी प्रशासकीय प्रदेश खालील तेरा विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- आर्येज
- अॅव्हेरों
- ऑत-गारोन
- जेर
- लोत
- ऑत-पिरेने
- तार्न
- तार्न-एत-गारोन
- ऑद (Aude)
- गार्द (Gard)
- एरॉ (Hérault)
- लोझेर (Lozère)
- पिरेने-ओरिएंताल (Pyrénées-Orientales)
प्रमुख शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |