ऐतरेय ब्राह्मण ऋग्वेदाच्या संहितेतील ब्राह्मणग्रंथांपैकी एक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद जगातल्या सर्वात जुन्या वाङ्‌मयात मोडतात. प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा असून काहींचे उपवेददेखील आहेत. ऋग्वेदाच्या २१ शाखांपैकी १९ लुप्त झाल्या असून शाकल व बाष्कल अश्या फक्त दोनच शाखा शिल्लक आहेत. ऋग्वेद संहितेत एकूण १०,५५२ मंत्र आहेत(बाष्कल शाखेत निराळे १५ मंत्र अधिक आहेत). 'संहिता' हा वेदाचा हा मुख्य भाग असतो. त्याशिवाय ब्राह्मणे आणि आरण्यके हे आणखी दोन भाग असतात. आरण्यकाचा शेवटचा उपभाग म्हणजे उपनिषद होय. आरण्यकांचे पठण अरण्यात बसून करायचे पण उपनिषदाचे गुरूच्या शेजारी बसून करतात. ब्राह्मणग्रंथ म्हणजे गद्य साहित्य होय. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ते सांगितलेले असते. यज्ञातील प्रधान आणि अंगभूत कर्मे-त्यांची विविध नावे, कर्माची साधने, यज्ञाचे अधिकारी व यज्ञाची विविध फले यात सांगितली असतात. देव, असुर ऋषी इत्यादिकांच्या कथा यात असल्या तरी या वाङ्‌मयातील बराचसा भाग रूक्ष आणि कंटाळवाणा वाटू शकतो. तरीसुद्धा वेदांपासून संस्कृतभाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहास ब्राह्मणग्रंथांवरून समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहण म्हणून याला फार महत्त्व आहे.[ संदर्भ हवा ]

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

ऋग्वेदाची ऐतरेय ब्राह्मण व कौषीतकी ऊर्फ शांखायन ब्राह्मण, त्यांची आरण्यके आणि त्यांना जोडलेली ऐतरेय व कौषीतकी ही उपनिषदे सर्वच उपलब्ध आहेत.[ संदर्भ हवा ]

वर्ण या शब्दाचा वैदिककाळी अक्षर असाच अर्थ होता. याचा पुरावा ऐतरेय ब्राह्मणात आहे. तेथे म्हटले आहे की 'त्याने तीन धातू तापवले आणि त्या अतितप्त धातूंपासून अकार, उकार आणि मकार जन्मले. त्यांना एकरूप केले तो हा ॐ. वेदवाङ्‌मयाच्या पाठांतरास अत्यंत पावित्र्य आल्यानंतर लेखनकलेचे महत्त्व पुरोहित विसरले, म्हणून फार प्राचीन बुद्धपूर्व काळातील लेखनाचा पुरावा आज सापडत नाही.[ संदर्भ हवा ]

ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा खोल परिणाम ऐतरेय ब्राह्मण (४०।५), शतपथ ब्राह्मण (१०।३।५; ११।२।३) व तैत्तरीय ब्राह्मण (२।८।८।९ व २।८।९।७) यांच्यावर झालेला दिसतो.[ संदर्भ हवा ]

वैदिककाळी भूमीची वाटणी होत नसे. राजाला सुद्धा भूदानाचा अधिकार नव्हता. विश्वकर्मा भौवन या राजाने सर्वमेध केला तेव्हा तो कश्यप ऋषीस भूमिदान करू लागला. तेव्हा भूमी त्यास सांगते, " कोणताही मर्त्य माझे दान करू शकत नाही. तू मूर्ख आहेस. तुझी मला कश्यपास दान देण्याची प्रतिज्ञा मिथ्या आहे. तू माझे दान केल्यास मी पाण्यात बुडून जाईन."--(ऐतरेय ब्राह्मण (३९।७), शतपथ ब्राह्मण (१३।७।१।१५).

'इतरा' नामक स्त्रीचे पुत्र 'महीदास ऐतरेय' हे ऋषी या ब्राह्मणग्रंथाचे कर्ते मानले जातात.

वेद
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद