एफ.सी. बार्सेलोना
फुटबॉल क्लब
(एफसी बार्सेलोना या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ.सी. बार्सिलोना (कातालान व स्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.
एफ.सी. बार्सिलोना | ||||
पूर्ण नाव | फुटबॉल क्लब बार्सिलोना (Futbol Club Barcelona) | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | बार्सा (Barça) कुलेस (Culés) ब्लाउग्रानेस (Blaugranes, निळे-मरून) | |||
स्थापना | नोव्हेंबर २९, १८९९ (as Foot-Ball Club Barcelona) | |||
मैदान | कॅंप नोउ, बार्सिलोना, कातालोनिया (स्पेन) (आसनक्षमता: ९९,३५४) | |||
मुख्य प्रशिक्षक | लुइस एनरीके | |||
लीग | ला लीगा | |||
२०१४-१५ | ला लीगा, विजेता | |||
|
जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.
विजेतेपदे
संपादनदेशांतर्गत
संपादन- ला लीगा: २३ वेळा
- कोपा देल रे: २७ वेळा (विक्रमी)
- सुपरकोपा दे एस्पान्या: ११ वेळा (विक्रमी)
युरोपीय
संपादन- युएफा चॅंपियन्स लीग: ५ वेळा
- युएफा कप विनर्स कप: ४ वेळा (विक्रमी)
- युएफा सुपर कप: ४ वेळा
आंतरराष्ट्रीय
संपादन- फिफा क्लब विश्वचषक: २ वेळा (विक्रम ब्राझीलच्या कोरिंथियान्ससोबत विभागून)
सद्य संघ
संपादन- ३० जानेवारी २०१५ रोजी[१]
|
|
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Primer equipo/First team" (Spanish भाषेत). FC Barcelona. 22 January 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)