आन्देस
आन्देस (प्रचलित इंग्लिश उच्चारः अँडीझ, स्पॅनिश: Cordillera de los Andes, क्वेचुआ: आन्तिस कुना) ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. मात्र, समुद्राखालील पर्वतरांगा विचारात घेतल्या तर सुमारे ६५,००० किमी लांबीची मध्य-अटलांटिक ही अटलांटिक महासागराखालील पर्वतरांग ही पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. सुमारे ७००० किलोमीटर लांबीची व सुमारे २०० किलोमीटर ते ७०० किलोमीटर रूंद असलेली अॅन्डीज ही पर्वतरांग दक्षिणोत्तर दिशेने दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला समांतर धावते. व्हेनेझुएला, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, इक्वेडोर चिली व आर्जेन्टिना ह्या सात देशांमध्ये अॅन्डीज पर्वत रांगेचा काहीना काही हिस्सा येतो.
आन्देस Cordillera de los Andes | ||||
|
||||
देश | व्हेनेझुएला कोलंबिया पेरू बोलिव्हिया इक्वेडोर चिली आर्जेन्टिना |
|||
सर्वोच्च शिखर | अॅकोनकाग्वा ६,९६२ मी (२२,८४१ फूट) |
|||
लांबी | ७,२४० किमी (४,५०० मैल) | |||
रूंदी | ५०० किमी (३१० मैल) | |||
|
आन्देस पर्वतरांगेची सरासरी उंची ४,००० मी (१३,००० फूट) इतकी असून ती आशिया खंडाच्या बाहेरील सर्वात उंच पर्वतरांग आहे. तिच्यावरील आल्तिप्लानो नावाचे पठार तिबेटच्या पठाराखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पठार आहे. अॅकोनकाग्वा हे ६,९६२ मी (२२,८४१ फूट) इतक्या उंचीवरील शिखर आन्देसमधील सर्वात उंच स्थान आहे. ला पाझ, क्वितो, बोगोता, अरेकिपा, सुक्रे, मेदेयीन ही लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाची शहरे आन्देसमध्येच वसलेली आहेत.
संदर्भ व नोंदी
संपादन
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- आन्देसचे भूविज्ञान Archived 2005-09-22 at the Wayback Machine.
- हवामान व प्राणी Archived 2007-12-14 at the Wayback Machine.
- आन्देसचे प्रदेश व हवामान