इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान चार कसोटी सामने, पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामने सप्टेंबर २०२० मध्ये खेळविले जाणार होते परंतु भारतात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. डिसेंबर २०२० मध्ये बीसीसीआय ने पत्रकार परिषद घेऊन फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये भारत सरकारची परवानगी मिळताच तीन मैदानांवर सगळे सामने आयोजित केले आहेत असे जाहीर करून दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१
भारत
इंग्लंड
तारीख ५ फेब्रुवारी – २८ मार्च २०२१
संघनायक विराट कोहली ज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ट्वेंटी२०, १ला ए.दि.)
जोस बटलर (२रा, ३रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (३४५) ज्यो रूट (३६८)
सर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (३२) जॅक लीच (१८)
मालिकावीर रविचंद्रन अश्विन (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लोकेश राहुल (१७७) जॉनी बेअरस्टो (२१९)
सर्वाधिक बळी शार्दुल ठाकूर (७) मार्क वूड (५)
मालिकावीर जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२३१) जोस बटलर (१७२)
सर्वाधिक बळी शार्दुल ठाकूर (८) जोफ्रा आर्चर (७)
मालिकावीर विराट कोहली (भारत)

दौऱ्यातील अहमदाबाद येथील तिसरी कसोटी ही दिवस/रात्र आयोजित केली गेली. १ जानेवारी २०२१ रोजी भारत सरकार ने सर्व क्रीडा मैदानांवर ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी दिली. परंतु पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार असल्याने तमिळ नाडू क्रिकेट असोसिएशनने दोन्ही कसोटींसाठी मैदानांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश निषिद्ध केला.

कसोटी मालिकेतील पहिली कसोटी कर्णधार ज्यो रूटच्या उत्तम अश्या २१८ धावांच्या खेळीच्या जोरावर जिंकत इंग्लंडने दौऱ्याला धमाकेदार सुरुवात केली. पहिली कसोटी ही ज्यो रूटची १००वी कसोटी होती. तसेच कारकिर्दीतल्या १००व्या कसोटीत द्विशतक झळकवणारा ज्यो रूट जगातला पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या कसोटी भारताने ३१७ धावांनी जिंकली आणि मालिकेतील आव्हान कायम राखत पुनरागमन केले. भारताचा रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेट प्रकारात २०० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने पदार्पणातच एका डावात ५ गडी बाद करणारा भारताचा ९वा खेळाडू बनला. तिसरी कसोटी अहमदाबाद येथे पुर्नबांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिवस/रात्र पद्धतीने खेळविण्यात आली. तिसरी कसोटी ही भारताच्या इशांत शर्माची १००वी कसोटी होती. त्यावेळेस भारताचे तत्कालिन राष्ट्रपति रामनाथ कोविंद आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी इशांत शर्माला मानाची टोपी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. तिसरी आणि चौथी कसोटी भारताने जिंकली. कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवत भारतीय संघ २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. तसेच अँथनी डि मेल्लो चषकसुद्धा भारताने राखला.

ट्वेंटी२० मालिकेत इंग्लंडने विजयासह सुरुवात केली. ४ सामने झाल्यानंतरची मालिकेची स्थिती २-२ अशी होती. भारताने मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना जिंकत ५ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ अशी जिंकली. भारताचा कर्णधार विराट कोहली हा ट्वेंटी२० मध्ये ३,००० धावा करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला. तिसरा ट्वेंटी२० सामना आयॉन मॉर्गनचा १००वा ट्वेंटी२० सामना होता, १०० ट्वेंटी२० सामने खेळणारा मॉर्गन इंग्लंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. एकदिवसीय मालिकेत भारताने पहिला सामना ६६ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ६ गडी राखत पराभव केला आणि पुनरागमन केले. दोन सामन्यांनंतर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत होती. भारताने तिसरा आणि निर्णायक सामन्यात विजय संपादन करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

१ली कसोटी

संपादन
वि
५७८ (१९०.१ षटके)
ज्यो रूट २१८ (३७७)
जसप्रीत बुमराह ३/८४ (३६ षटके)
३३७ (९५.५ षटके)
ऋषभ पंत ९१ (८८)
डॉमिनिक बेस ४/७६ (२६ षटके)
१७८ (४६.३ षटके)
ज्यो रूट ४० (३२)
रविचंद्रन अश्विन ६/६१ (१७.३ षटके)
१९२ (५८.१ षटके)
विराट कोहली ७२ (१०४)
जॅक लीच ४/७६ (२६ षटके)
इंग्लंड २२७ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)


२री कसोटी

संपादन
वि
३२९ (९५.५ षटके)
रोहित शर्मा १६१ (२३१)
मोईन अली ४/१२८ (२९ षटके)
१३४ (५९.५ षटके)
बेन फोक्स ४२* (१०७)
रविचंद्रन अश्विन ५/४३ (२३.५ षटके)
२८६ (८५.५ षटके)
रविचंद्रन अश्विन १०६ (१४८)
मोईन अली ४/९८ (३२ षटके)
१६४ (५४.२ षटके)
मोईन अली ४३ (१८)
अक्षर पटेल ५/६० (२१ षटके)
भारत ३१७ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई


३री कसोटी

संपादन
वि
११२ (४८.४ षटके)
झॅक क्रॉली ५३ (८४)
अक्षर पटेल ६/३८ (२१.४ षटके)
१४५ (५३.२ षटके)
रोहित शर्मा ६६ (९६)
ज्यो रूट ५/८ (६.२ षटके)
८१ (३०.४ षटके)
बेन स्टोक्स २५ (३४)
अक्षर पटेल ५/३२ (१५ षटके)
४९/० (७.४ षटके)
रोहित शर्मा २५* (२५)
भारत १० गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: अक्षर पटेल (भारत)


४थी कसोटी

संपादन
वि
२०५ (७५.५ षटके)
बेन स्टोक्स ५५ (१२१)
अक्षर पटेल ४/६८ (२६ षटके)
३६५ (११४.४ षटके)
ऋषभ पंत १०१ (११८)
बेन स्टोक्स ४/८९ (२७.४ षटके)
१३५ (५४.५ षटके)
डॅन लॉरेंस ५० (९५)
रविचंद्रन अश्विन ५/४७ (२२.५ षटके)
भारत १ डाव आणि २५ धावांनी विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: ऋषभ पंत (भारत)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१२ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१२४/७ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१३०/२ (१५.३ षटके)
श्रेयस अय्यर ६७ (४८)
जोफ्रा आर्चर ३/२३ (४ षटके)
जेसन रॉय ४९ (३२)
वॉशिंग्टन सुंदर १/१८ (२.३ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: जोफ्रा आर्चर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

संपादन
१४ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१६४/६ (२० षटके)
वि
  भारत
१६६/३ (१७.५ षटके)
जेसन रॉय ४६ (३५)
वॉशिंग्टन सुंदर २/२९ (४ षटके)
शार्दुल ठाकूर २/२९ (४ षटके)
विराट कोहली ७३* (४९)
सॅम कुरन १/२२ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद


३रा सामना

संपादन
१६ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५६/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१५८/२ (१८.२ षटके)
विराट कोहली ७७* (४६)
मार्क वूड ३/३१ (४ षटके)
जोस बटलर ८३* (५२)
वॉशिंग्टन सुंदर १/२६ (४ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


४था सामना

संपादन
१८ मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१८५/८ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१७७/८ (२० षटके)
बेन स्टोक्स ४६ (२३)
शार्दुल ठाकूर ३/४२ (४ षटके)
भारत ८ धावांनी विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

संपादन
२० मार्च २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
२२४/२ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१८८/८ (२० षटके)
विराट कोहली ८०* (५२)
बेन स्टोक्स १/२६ (३ षटके)
डेव्हिड मलान ६८ (४६)
शार्दुल ठाकूर ३/४५ (४ षटके)
भारत ३६ धावांनी विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: भुवनेश्वर कुमार (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
भारत  
३१७/५ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२५१ (४२.१ षटके)
शिखर धवन ९८ (१०६)
बेन स्टोक्स ३/३४ (८ षटके)
जॉनी बेअरस्टो ९४ (६६)
प्रसिद्ध कृष्ण ४/५४ (८.१ षटके)


२रा सामना

संपादन
भारत  
३३६/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड
३३७/४ (४३.३ षटके)
लोकेश राहुल १०८ (११४)
रीसी टॉपली २/५० (८ षटके)
जॉनी बेअरस्टो १२४ (११२)
प्रसिद्ध कृष्ण २/५८ (१० षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)


३रा सामना

संपादन
भारत  
३२९ (४८.२ षटके)
वि
  इंग्लंड
३२२/९ (५० षटके)
ऋषभ पंत ७८ (६२)
मार्क वूड ३/३४ (७ षटके)
सॅम कुरन ९५* (८३)
शार्दुल ठाकूर ४/६७ (१० षटके)
भारत ७ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड
सामनावीर: सॅम कुरन (इंग्लंड)