इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३

२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून सात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा करत आहे.[][] इंग्लंडचा संघ डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात परतेल.[][] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील..[][]

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख २० सप्टेंबर – २१ डिसेंबर २०२२
संघनायक बाबर आझम जोस बटलर (आं.टी२०)[n १]
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (३४८) हॅरी ब्रुक (४६८)
सर्वाधिक बळी अबरार अहमद (१७) जॅक लीच (१५)
मालिकावीर हॅरी ब्रुक (इं)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद रिझवान (३१६) हॅरी ब्रुक (२३८)
सर्वाधिक बळी हॅरीस रौफ (८) सॅम कुरन (७)
डेव्हिड विली (७)
मालिकावीर हॅरी ब्रुक

नोव्हेंबर २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी)चे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, ऑक्टोबर २०२१ मध्ये इंग्लंडचा पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर इसीबी आणि पीसीबी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला गेले.[] सकारात्मक चर्चेनंतर, पाच टी२० सामन्यांचा मूळ दौरा सात सामन्यांचा करण्यात आला.[] आधी टी२० सामने खेळवले जातील,[] तर ऑस्ट्रेलियातील २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर कसोटी सामने खेळवले जातील.[१०] एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मालिका होणार असण्याची पुष्टी केली.[११][१२] जुलै २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेरमन रमीझ राजा यांनी सांगितले की टी२० सामने लाहोर आणि कराचीमध्ये होण्याची शक्यता आहे.[१३] टी२० मालिकेचे तपशील २ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित करण्यात आले.[१४][१५][१६] कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आला.[१७][१८]

टी२० मालिकेतील कराचीमधील सामन्यांत मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती दिसली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, कराचीतील पहिल्या चार सामन्यांना १,२६,५५० लोक उपस्थित होते.[१९]

१६ डिसेंबर २०२२ रोजी, पाकिस्तानच्या अझहर अलीने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.[२०]

कसोटी आं. टी२०
  पाकिस्तान   इंग्लंड   पाकिस्तान[२१]   इंग्लंड[२२]

इसीबी ने जाहीर केले की जोस बटलर पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे टी२० मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे, त्याच्याजागी मोईन अलीकडे कर्णधारपद देण्यात आले.[२३] ॲलेक्स हेल्सला नंतर टी२०संघात समाविष्ट करण्यात आले.[२४]

आं.टी२० मालिका

संपादन

१ला आं.टी२० सामना

संपादन
२० सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
१५८/७ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१६०/४ (१९.२ षटके)
ॲलेक्स हेल्स ५३ (४०)
उस्मान कादिर २/३६ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: ल्यूक वूड (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • शान मसूद (पा) आणि ल्यूक वूड (इं) दोघांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • मोहम्मद रिझवान (पा) हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये कमीत कमी डावांमध्ये (५२) सर्वात वेगवान २,००० धावा करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला त्याने ह्याबाबतीत बाबर आझमशी बरोबरी केली .[२५]

२रा आं.टी२० सामना

संपादन
२२ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
इंग्लंड  
१९९/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
२०३/० (१९.३ षटके)
मोईन अली ५५* (२३)
हॅरीस रौफ २/३० (४ षटके)
बाबर आझम ११०* (६६)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अहसान रझा (पा) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: बाबर आझम (पा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पाकिस्तानचा आं.टी२० मध्ये एकही गडी न गमावता सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम.[२६][२७]

३रा आं.टी२० सामना

संपादन
२३ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
इंग्लंड  
२२१/३ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१५८/८ (२० षटके)
हॅरी ब्रुक ८१* (३५)
उस्मान कादिर २/४८ (४ षटके)
शान मसूद ६६* (४०)
मार्क वूड ३/२५ (४ षटके)
इंग्लंड ६३ धावांनी विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: हॅरी ब्रुक (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • विल जॅक्सचे (इं) आं.टी२० पदार्पण.

४था आं.टी२० सामना

संपादन
२५ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
१६६/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१६३ (१९.२ षटके)
मोहम्मद रिझवान ८८ (६७)
रिस टॉपली २/३७ (४ षटके)
लियाम डॉसन ३४ (१७)
हॅरीस रौफ ३/३२ (४ षटके)
पाकिस्तान ३ धावांनी विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: हॅरीस रौफ (पा)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ओली स्टोनचे (इं) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

५वा आं.टी२० सामना

संपादन
२८ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
१४५ (१९ षटके)
वि
  इंग्लंड
१३९/७ (२० षटके)
मोहम्मद रिझवान ६३ (४६)
मार्क वूड ३/२० (४ षटके)
मोईन अली ५१* (३७)
हॅरिस रौफ २/४१ (४ षटके)
पाकिस्तान ६ धावांनी विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलिम दर (पा) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • आमिर जमालचे (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण

६वा आं.टी२० सामना

संपादन
३० सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान  
१६९/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१७०/२ (१४.३ षटके)
बाबर आझम ८७* (५९)
सॅम कुरन २/२६ (४ षटके)
फिल सॉल्ट ८८* (४१)
शादाब खान २/३४ (४ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलिम दर (पा) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: फिल सॉल्ट (इं)

७वा आं.टी२० सामना

संपादन
२ ऑक्टोबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
इंग्लंड  
२०९/३ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१४२/८ (२० षटके)
फील सॉल्ट ७८* (४१)
मोहम्मद हसनैन १/३२ (४ षटके)
शान मसूद ५६ (४३)
क्रिस वोक्स ३/२६ (४ षटके)
इंग्लंड ६७ धावांनी विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अहसान रझा (पा) आणि आसिफ याकूब (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण

कसोटी मालिका

संपादन

१ला कसोटी सामना

संपादन
१–५ डिसेंबर २०२२
धावफलक
वि
६५७ (१०१ षटके)
हॅरी ब्रुक १५३ (११६)
झाहिद महमूद ४/२३५ (३५ षटके)
५७९ (१५५.३ षटके)
बाबर आझम १३६ (१६८)
विल जॅक्स ६/१६१ (४०.३ षटके)
२६४/७घो (३५.५ षटके)
हॅरी ब्रुक ८७ (६५)
मोहम्मद अली २/६४ (१० षटके)
२६८ (९६.३ षटके)
सौद शकील ७६ (१५९)
जेम्स अँडरसन ४/३६ (२४ षटके)
इंग्लंड ७४ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: जोएल विल्सन (वे इं) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: ऑली रॉबिन्सन (ऑ)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे पहिल्या दिवशी १५ षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
  • सौद शकील, हॅरीस रौफ, मोहम्मद अली, झाहिद महमूद (पा), लियाम लिविंगस्टोन आणि विल जॅक्स (इं) या सर्वांचे कसोटी पदार्पण.
  • बेन डकेट आणि हॅरी ब्रुक (इं) या दोघांचे पहिले कसोटी शतक.[२९]
  • झॅक क्रॉली चे शतक हे इंग्लिश सलामीवीराचे चेंडूंच्या बाबतीत सर्वात वेगवान कसोटी शतक होते (८६).[३०]
  • चार इंग्लिश खेळाडूंनी पहिल्या दिवशी शतके ठोकली, कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक शतके.[३१]
  • इंग्लंडने पहिल्या दिवशी ५०६ धावा केल्या, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या सर्वाधिक धावा.[३१]
  • संघांच्या एकत्रित १,७६८ धावा ह्या ५ दिवसांच्या कसोटी सामन्यातील सर्वोच्च एकूण धावा होत्या, ज्याने मागील २४-२९ जानेवारी १९६९ या कालावधीत वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड कसोटीमधील १,७६४ धावांचा विक्रम मागे टाकला. .[३२]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.

२रा कसोटी सामना

संपादन
९–१३ डिसेंबर २०२२
धावफलक
वि
२८१ (५१.४ षटके)
बेन डकेट ६३ (४९)
अबरार अहमद ७/११४ (२२ षटके)
२०२ (६२.५ षटके)
बाबर आझम ७५ (९५)
जॅक लीच ४/९८ (२७ षटके)
२७५ (६४.५ षटके)
हॅरी ब्रुक १०८ (१४९)
अबरार अहमद ४/१२० (२९ षटके)
३२८ (१०२.१ षटके)
सौद शकील ९४ (२१३)
मार्क वूड ४/६५ (२१ षटके)
इंग्लड २६ धावांनी विजयी
मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान
पंच: अलीम दार (पा) आणि मराईस इरास्मुस (द आ)
सामनावीर: हॅरी ब्रुक (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • अबरार अहमदचे (पा) कसोटी पदार्पण
  • पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात इंग्लंडने १८० धावा केल्या, कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात केलेल्या सर्वाधिक धावा.[३३]
  • अबरार अहमद कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात पाच बळी घेणारा पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३३] कसोटी पदार्पणात पाच बळी घेणारा तो तेरावा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३४]
  • अबरार अहमद पहिल्याच कसोटी सामन्यात दहा बळी घेणारा दुसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३५]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.

३रा कसोटी सामना

संपादन
१७–२१ डिसेंबर २०२२
धावफलक
वि
३०४ (७९ षटके)
बाबर आझम ७८ (१२३)
जॅक लीच ४/१४० (३१ षटके)
३५४ (८१.४ षटके)
हॅरी ब्रुक १११ (१५०)
नौमन अली ४/१२६ (३० षटके)
२१६ (७४.५ षटके)
बाबर आझम ५४ (१०४)
रेहान अहमद ५/४८ (१४.५ षटके)
१७०/२ (२८.१ षटके)
बेन डकेट ८२* (७८)
अबरार अहमद २/७८ (१२ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अहसान रझा (पा) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: हॅरी ब्रुक (इं)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
  • मोहम्मद वसीम (पा) आणि रेहान अहमद (इं.) ह्या दोघांचे कसोटी पदार्पण.
  • रेहान अहमद हा १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात कसोटी सामना खेळणारा इंग्लंडचा सर्वात तरुण पुरुष क्रिकेट खेळाडू ठरला.[३६]
  • रेहान अहमदचे पदार्पणाच्या कसोटीत पाच बळी.[३७] १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात पुरुषांच्या कसोटीत पाच बळी घेणारा सर्वात तरुण करणारा खेळाडू ठरला.[३८]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.


नोंदी

संपादन
  1. ^ मोईन अली पहिल्या चार टी२० सामन्यांसाठी इंग्लंडचे नेतृत्व करणार.

संदर्भ

संपादन
  1. ^ "एसीबी २०२२ दौऱ्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी करत इंग्लंड पाकिस्तानमध्ये सात आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंड पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये दोन अतिरिक्त टी२० सामने खेळणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पीसीबी तर्फे इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तपशिलांची पुष्टी". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड पुरुषांच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी वेळापत्रक निश्चित". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "पुरुषांच्या भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "ECB आणि PCB यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी टॉम हॅरिसन पाकिस्तानमध्ये". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "इंग्लंड २०२२ मध्ये दोन अतिरिक्त टी२० खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार". एएनआय न्यूझ. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड दौऱ्यांमुळे इंग्लंडचा २०२२-२३चा हिवाळा भरगच्च". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "२०२२ च्या पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंड दोन अतिरिक्त टी२० सामने खेळणार". Dawn. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंड, न्यू झीलंड पाकिस्तानचा दौरा करणार". क्रिकबझ्झ. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "पाकिस्तानतर्फे राष्ट्रीय संघासाठी १२ महिने व्यस्त असल्याची घोषणा". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लाहोर, कराची येथे इंग्लंडविरुद्ध टी२० सामने होण्याची शक्यता आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "कराची आणि लाहोरमध्ये इंग्लंड पाकिस्तानचा बंपर हंगाम सुरू करणार आहे". pcb.com.pk. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "इंग्लंडच्या १७ वर्षांतील पहिल्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". ICC. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "कराची, लाहोर येथे आं.टी२० चे आयोजन, इंग्लंड १७ वर्षांनी पाकिस्तानात परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ "इंग्लंड डिसेंबरमध्ये रावळपिंडी, मुलतान आणि कराची येथे कसोटी खेळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "एकूण १,२६,५५० प्रेक्षकांची कराचीतील चार टी२०साठी विक्रमी ९५.३% उपस्थिती!". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
  20. ^ "अझहर अलीची निवृत्तीची घोषणा, इंग्लंडविरुद्धची कराची कसोटी ही त्याची शेवटची ठरणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  21. ^ "२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  22. ^ "बेन स्टोक्स, मार्क वूड, ख्रिस वोक्स टी-२० विश्वचषकात परतले, इंग्लंडचा जुन्या रक्षकांवर विश्वास". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  23. ^ "टी२० विश्वचषक: इंग्लंडने जेसन रॉय ला वगळले, ख्रिस वोक्स आणि मार्क वुडला संघात". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  24. ^ "टी२० विश्वचषक: जॉनी बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्सला २०१९ नंतर प्रथमच इंग्लंडकडून बोलावणे". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ "पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड: मोहम्मद रिझवान बाबर आझमशी बरोबरी करून संयुक्तपणे सर्वात जलद २००० टी२० धावा करणारा खेळाडू". इंडिया टुडे. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  26. ^ "इंग्लंडचा पाकिस्तान दौरा: बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानला १० गडी राखून अविश्वसनीय विजय मिळवून दिला". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  27. ^ "बाबर आझम ११०*, मोहम्मद रिझवान ८८* पाकिस्तानचा दहा गडी राखून विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  28. ^ "टी२० मध्ये सर्वाधिक धावा: बाबर आझमने विराट कोहलीच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली". Inside Sport. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  29. ^ "क्रॉली, डकेट, पोप, ब्रूक यांची विक्रमी शतके". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  30. ^ "आकडेवारी - इंग्लंड आणि त्यांच्या चार शतकवीरांनी ११२ वर्षांचा कसोटी विक्रम मोडला". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  31. ^ a b "रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी विक्रम कोसळले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  32. ^ "सामन्यातील सर्वोच्च एकूण धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  33. ^ a b "आकडेवारी - अबरारचे विक्रमी पदार्पण आणि पाकिस्तानच्या फिरकीपटूंसाठी दुर्मिळ ऑल टेन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  34. ^ "अबरार अहमदची कसोटी पदार्पणात ५ विकेट्स घेऊन विक्रमी नोंद". BDCricTime. ९ डिसेंबर २०२२. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  35. ^ "पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड: रहस्यमय फिरकी गोलंदाज अबरार अहमदचे पदार्पणातच १० बळी". फर्स्टपोस्ट. १० डिसेंबर २०२२. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  36. ^ "कराची कसोटीसाठी नवोदित रेहान अहमदला इंग्लंडच्या अंतिम आकरामध्ये स्थान". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  37. ^ "फाईव्ह स्टार रेहान अहमद! फिरकीपटूचे पदार्पणातच पाच बळी!". स्काय स्पोर्ट्स. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  38. ^ "इंग्लड वि पाकिस्तान: इंग्लंडचा रेहान अहमद पुरुषांच्या कसोटीत पाच बळी घेणारा सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरला". स्पोर्टस्टार. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन