आव्हियों
आव्हियों हे फ्रान्समधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील व्हॉक्ल्युझ विभागामध्ये रोन नदीच्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे.
आव्हियों Avignon |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर | |
विभाग | व्हॉक्ल्युझ | |
क्षेत्रफळ | ६४.८ चौ. किमी (२५.० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ९४,७८७ | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
पोपचे शहर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आव्हियों येथे मध्य युगातील इ.स. १३०९ ते इ.स. १३७८ ह्या सालांदरम्यान पोपचे येथे वास्तव्य असे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते.
- पोप क्लेमेंट पाचवा: १३०५ - १३१४
- पोप जॉन बावीसावा: १३१६ - १३३४
- पोप बेनेडिक्ट बारावा: १३३४ - १३४२
- पोप क्लेमेंट सहावा: १३४२ - १३५२
- पोप इनोसंट सहावा: १३५२ - १३६२
- पोप अर्बन पाचवा: १३६२ - १३७०
- पोप ग्रेगरी अकरावा: १३७० - १३७८
अकरावा ग्रेगरी निघन पावल्यानंतर पुढील पोप अर्बन सहावा ह्याने रोम येथेच राहणे पसंद केले व पोपची गादी पुन्हा एकदा रोममध्ये गेली.
येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत दाखल झाले आहे.
जुळी शहरे
संपादनआव्हियोंची जुळी शहरे:[१]
- कोल्चेस्टर, युनायटेड किंग्डम. १९७२ पासून
- ग्वानाह्वातो, मेक्सिको. १९९० पासून
- द्यूर्बे, सेनेगाल. १९६१ पासून
- न्यू हेवन, अमेरिका. १९९३ पासून
- सियेना, इटली. १९८१ पासून
- तारागोना, स्पेन. १९६८ पासून
- तोर्तोसा, स्पेन. १९६८ पासून
- वेत्झलार, जर्मनी. १९६० पासून
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- पर्यटन माहिती Archived 2007-02-10 at the Wayback Machine.
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-02-11 at the Wayback Machine.
- आव्हियों महोत्सव
- विकिव्हॉयेज वरील आव्हियों पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ^ "Jumelages". avignon.fr (फ्रेंच भाषेत). Avignon. 12 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-12 रोजी पाहिले.